Maharashtra Breaking News Updates, 01 August 2024 : शिवसनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडवीसांवर जोरदार टीका केली होती. यापुढे राजकारणात एकतर ते राहतील नाही तर मी राहीन, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपाच्या सोशल मीडिया खात्यावर देवेंद्र फडणवीसांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. याशिवाय राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच यशश्री शिंदे हत्या प्रकरणदेखील चर्चेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Today, 01 August 2024 : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन
धाराशिव : ठेकेदाराने रस्त्याचे काम केल्यानंतर मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी शाखा अभियंत्याला सात वर्षांचा कारावास झाला आहे. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी लाचखोर अभियंता शंकर विश्वनाथ महाजन याला चार वर्षे कारावास आणि ५० हजार रूपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
पनवेल : राज्य सरकारने १७ हजार ८०० कोटी रुपये खर्च करुन २१ किलोमीटर अंतराचा समुद्रावर अटलसेतू बांधला परंतू अटलसेतूवरुन मुंबई पूणे या मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या ५० हजार वाहनांना सध्या पनवेलमधील कोळखे गाव ते कोन गावापर्यंत मंदगतीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कोळखे ते कोन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उन्नत मार्ग बांधणार असून यासाठी सूमारे एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड या रस्त्यावर मोठे खड्डे झाले असून चालकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
नागपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने आम्हाला दिले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने कसा सोवडवावा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत, असे विधान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.
अकोला : आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहन तोडफोड प्रकरणात सहभागी मनसैनिक जय मोलाकार यांचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. अमित ठाकरे आल्यावर कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी कुटुंबाला धीर दिला. यावेळी त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी पाहता नाशिकसह इगतपुरी, पेठ येथून जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी नाशिक येथील मेळा बस स्थानकातून बस सोडण्यात येणार आहेत.
श्रावणात त्र्यंबकेश्वरला भाविकांची महिनाभर गर्दी होत असली तरी सोमवारी ही गर्दी अधिक असते. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. या भाविकांच्या सुविधेसाठी नाशिकसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ३३ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.
पाच ऑगस्ट, १२ ऑगस्ट, २६ ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवारनिमित्त ही जादा बससेवा आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी २५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय इगतपुरी-म्हसुर्ली-वैतरणामार्गे त्र्यंबकेश्वर पाच आणि पेठ-अंबोलीमार्गे त्र्यंबक तीन जादा बस भाविकांच्या सेवेत सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका सी – विभाग वाशी कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई पालिकेने केली आहे. वाशी विभागातील जवळजवळ २५० हून अधिक घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नवी मुंबईत झोपडपट्टी हा मुद्दा नवी मुंबईतील महायुतीत कळीचा मुद्दा बनला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन साठी आजपासून शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. चिंचपाडा गावाच्या वेशीवर ते उपोषणास बसले असून जोपर्यंत सर्वेक्षण सुरु केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.
धाराशिव : राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यालाच कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सक मिळेना झाला आहे. मागील दहा महिन्यांपासून कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सकाविना आरोग्य यंत्रणेचा गाडा हाकला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिघीमध्ये बुधवारी दुपारी लहान मुलं खेळत असताना घडली आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर दिघीतील गणेश नगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गिरिजा गणेश शिंदे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
चंद्रपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.
नवी मुंबई शहरात आजही अवैधपणे रिक्षा चालविल्या जात आहेत. अशाच अनधिकृतपणे रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उरगला आहे. मुजोर रिक्षाचालक मनमानीपणे जादा भाडे आकारणी, मीटरवर न चालावून प्रवाशांना वेठीस धरले जाते. तसेच विना परवाना, कालबाह्य परवाने असतानाही रस्त्यावर रिक्षा चालवितात. तीन दिवसांत अशा १५६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात आजही काही मुजोर रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करून प्रवाशांवाच्या माथी नाहक आर्थिक भुर्दंड मारत असतात. नोकरदार वर्ग कामाच्या वेळेत घाईत असल्याने रिक्षांकडे मोर्चा वळवीतात, काही रिक्षाचालक भाडे नाकारतात तर काही अतिरिक्त भाडे घेतात तर काही मीटरवर नेण्यास नकार देतात. वाहन परवाना नसणाऱ्या ५७ तर कालबाह्य परवाना ४५, विमा संपलेल्या ३० तर वाहन फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या १५ आणि पीयुसी ९ अशा १५६ अवैध रिक्षाचालकांवर कारवाई करीत ३ लाख ७० हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती आरटीओ उपप्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.
वर्धा : सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने आज दुपारी आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिकणाऱ्या पूजा हिने याच महाविद्यालयच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
Attack on Jitendra Awhad Vehical : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. संभाजीरांजेंच्या अंगात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहेत का? हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ त्वरित वितरित करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार समाजविकास विभागाच्या वतीने लाभ वितरणास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात पात्रता निश्चित झालेल्या ३१७४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २ कोटी १५ लाखांहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम डिबीटीव्दारे जमा करण्यात आली आहे.
तसेच या आठवड्यात पात्रता निश्चित केलेल्या २५ हजार ४१७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात १९ कोटी ६७ लाखांहून अधिक रक्कम डिबीटी व्दारे जमा करण्यात येत आहे.
नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत कडक धोरण स्विकारले असून शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक मोहिम राबवा तसेच या कामात हलगर्जी करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.
नवी मुंबई शहरातील विभागवार बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत असून आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरात धडक कारवाई सरू आहे. नगररचना विभागाकडून ओसी व सीसी नसलेल्या जवळजवळ ६०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांची माहिती मिळाली असून त्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. – डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग
CM Eknath shinde On Uddhav Thackeray : मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यापुढे राजकारणात एक तर तू राहशील, नाहीतर मी राहील, असं म्हणत त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाष्य करत त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नागपूर : सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसने केली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे.
नाशिक : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास रात्री नाशिकहून कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यासाठी रेल्वेने नेण्यात आले. या कार्यवाहीसाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर आणि रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कैदी पार्टीत ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बरोबर वैद्यकीय पथकही आहे.
पुणे : मागील दोन वर्षाच्या कालावधीत भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहेत. आता थेट ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर हल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी उभारा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. या विधानानंतर भाजप नेत्याकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक बातम्या मला माध्यमातू कळतात. ही बातमी सुद्धा मला माध्यमातून समजली आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील, तर त्याचा आनंदच आहे. राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, असे सगळे गुण त्यांच्यात आहेत. जर केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असेल तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर आहे. संजय राऊतांची संघावर बोलायची पात्रता नाही, असे ते म्हणाले.
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील ५० ते ६० गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याचे बुधवारी सायंकाळी उघडकीस आले. १५-१६ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर संभाव्य धोका लक्षात घेता नवेगावबांध येथील पाणीपुरवठा आज गुरूवार १ ऑगस्टपासून बंद ठेवण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी अद्यापही कोणावर कारवाई केली नसल्याचा आरोप आता अमोल मिटकरी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यात गरजू रुग्णांच्या तुलनेत अद्यापही मेंदूमृत रुग्णांच्या अवयवांचे दान होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ७०० रुग्ण हे विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणारा राजकीय पक्ष, अशी भाजपची ओळख दिल्या जाते. लोकसभा निवडणुकीनंतर मंडळ व अन्य स्वरूपातील बैठका आटोपल्या. आता पक्षाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडल्या जात आहे. सविस्तर वाचा…
राज्यात १९५५-५६ पासून राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, गेल्या ४० वर्षांत कुष्ठरोगाचे प्रमाणात लक्षणीय घट झाली असून राज्याची वाटचाल कुष्ठरोग निर्मूलनाकडे होत आहे. ऐंशीच्या दशकात कुष्ठरोगाचे जे प्रमाण दर दहा हजारी ६२.६४ होते ते २०२३ मध्ये १.०२ एवढे झाले असल्याचे आरोग्या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सविस्तर वाचा…
शरीरसौष्ठवासाठी आणि दिवसभर प्रफुल्लीत राहण्याच्या हव्यासाने अनियंत्रित पद्धतीने प्रोटीन पावडरचा वापर केल्यास तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर अकोला पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ते पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर आंदोलनही करत आहेत.
राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.
Anshuman Gaekwad Died: क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही विपरीत असली तरी हार न मानणारे भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू-फलंदाज अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी मात्र झुंज अपयशी ठरली. रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी व १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याशिवाय अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजावली.