Lok Sabha Election 2024 Updates : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील साह मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईवर आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत रोड शो करून शक्तीप्रदर्शन केलं. २० मे रोजी कल्याण, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी आणि मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. महाविकास आघाडीने महायुतीविरोधात कंबर कसली आहे. तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्ल़ॉगद्वारे घेणार आहोत. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा.

Live Updates

Lok Sabha Election 2024 Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

17:42 (IST) 16 May 2024
मुंबई : वडाळा ‘आरटीओ’च्या तिजोरीत ४८३ कोटी

मुंबई : नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, नवीन अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, वाहनांचा कर, वाहनांवरील बिनबोजा उतरविणे व चढविणे, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र व त्याचे नूतनीकरण, वाहनांना जारी केलेले शुल्क आणि दंड वसुली यातून वडाळा आरटीओला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४८३.७७ कोटी रुपये महसूल मिळाला.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 16 May 2024
मुंबई : दर महिन्याला सरोगसीसाठी १० ते १२ जोडप्यांचे अर्ज

मुंबई : बदलत जाणारी जीवनशैली, शारीरिक व मानसिक ताणतणाव, आजारपण अशा अनेक कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे कृत्रिम गर्भधारणेची (आय. व्ही. एफ) प्रक्रिया व उपचार होण्याचे प्रमाणही चांगले आहे.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 16 May 2024
सावधान ! उपराजधानीत वाढला बिबट्याचा वावर

नागपूर : शहरात पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी वाडी, अंबाझरी, आयटी पार्क, महाराजबाग परिसर आणि एवढेच नव्हे तर शहराच्या आत तब्बल आठ दिवस बिबट्याने मुक्काम ठोकला होता. तर आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाजवळील निवासी भागात बिबट्याने दर्शन दिले.

सविस्तर वाचा

16:59 (IST) 16 May 2024
नागपुरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय.. महावितरणने हे काम हाती घेतले..

नागपूर: नागपूरसह परिसरात मागील काही दिवसांपासून एकीकडे अ‌वकाळी पाऊस तर दुसरीकडे उन्हाचा तडाखाही बघायला मिळत आहे. वादळामुळे  बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित होतो. ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणकडून वेगवेगळे कामे हाती घेतले गेले आहे.साधारणत: मे महिन्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात चांगलाच उकाडा असतो.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 16 May 2024
नागपुरातील महामेट्रोचा “सेव्हन वंडर्स” प्रकल्प वादात…… लाखो रुपये खर्चून उभारलेले “वंडर्स” तोडण्याचा खर्च…..

नागपूर : तलावाच्या ३० मीटर हद्दीत विकासकामे करण्यास मनाई असतानाही क्रेझी केसलच्या जागेवर “सेव्हन वंडर्स” प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी परवानगी देखील घेण्यात आली नाही. आता येथे झालेली कामे तोडण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 16 May 2024
संघाकडून प्रशिक्षण वर्गात बदल…..आता तृतीय संघ शिक्षा वर्ग नव्हे तर…….

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला जातो. परंतु, यावर्षीपासून मात्र संघाकडून तृतीय संघ शिक्षा वर्ग अशा नावाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग -२ असे नाव असणार आहे.

सविस्तर वाचा...

15:19 (IST) 16 May 2024
अपहरण करून एक कोटीच्या खंडणीचा डाव फसला, अकोल्यातील अपहृत व्यावसायिक सुखरुप परतले

अकोला : शहरातील रायलीजीन भागातून व्यावसायिक अरुण वोरा यांचे अपहरण केल्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा अपहरणकर्त्यांचा डाव फसला आहे. दोन दिवसानंतर व्यावसायिक बुधवारी मध्यरात्री घरी सुखरूप परतले.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 16 May 2024
ऑलिवंट, ऑर्थर, एस पुलांच्या पुनर्बांधणीची गरज नाही, रेल्वे प्रशासनाचे मुंबई महानगरपालिकेला पत्र

मुंबई : माझगाव येथील ऑलिवंट पूल, आर्थर पूल, भायखळा येथील एस पूल या तीन पुलांच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नसल्याचे रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेला कळवले आहे. रेल्वेमार्फत १० ते १५ वर्षांनंतर या पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन करण्यात येईल. त्यामुळे तूर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

वाचा सविस्तर...

14:24 (IST) 16 May 2024
सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी महारेराची नियमावली लागू

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि ज्येठांच्या दृष्टीने आवश्यक अशा सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते.

वाचा सविस्तर...

14:17 (IST) 16 May 2024
मतदानावरून काँग्रेस नेते साजिद खान यांची मौलवींना शिवीगाळ, ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयीही अपशब्द; वंचितच्या तक्रारीवरून...

अकोला : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ करून ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सविस्तर वाचा

13:52 (IST) 16 May 2024
केसपेपरसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश

मुंबई : केईएम रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बाह्यरुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नियुक्त करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

वाचा सविस्तर...

13:47 (IST) 16 May 2024
नंदुरबार : शाळेजवळ दारु दुकान सुरु करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्याकडून लाच

नंदुरबार : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही लाचखोरीची कीड लागल्याने हे क्षेत्रही आता लाचखोरीने ग्रस्त झाल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही असाच प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर...

13:15 (IST) 16 May 2024
मोदींच्या कल्याणमधील सभेसाठी मुरबाड भागात बस न पाठविल्याने कथोरे समर्थक नाराज

कल्याण : भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे हातात हात घालून एकत्रित प्रचार करत असताना पाटील समर्थक काही पदाधिकारी कथोरे समर्थकांना लोकसभा निवडणूक वातावरणातही दुजाभावाची वागणूक देत असल्याने कथोरे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाचा सविस्तर...

13:07 (IST) 16 May 2024
संस्थापक-शिक्षकाच्या वादात लिपीकाची हत्या; गोंदियातील सिद्धार्थ विज्ञान महाविद्यालयातील घटना

गोंदिया : इतरांच्या वादात मध्यस्थी करणे किती महागात पडू शकते, हे देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयातील झालेल्या घटनेवरून देवरीकरांना अनुभवास आले. शाळा संस्थापक व शिक्षकाचा सुरू असलेला वाद शमविण्यासाठी मध्यस्थी करून पुढाकार घेणार्‍या लिपीकाला जीव गमवावा लागला. वादात मध्यस्थी करणार्‍या लिपीकालाच शिक्षकाने जब्बर मारहाण  केली.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 16 May 2024
अकरावीच्या विद्यार्थिनीचे वडिलांच्या मित्रासोबत पलायन; अपहरणकर्त्याला गोंदियातून अटक

नागपूर : वडिलासोबत कामावर सहकारी मजूर असलेल्या व्यक्तीचे घरी येणे-जाणे होते. दरम्यान, त्याच्याशी मुलीची ओळख झाली. काही दिवसांतच अकरावीत शिकणाऱ्या मुलीला तो आवडायला लागला. दोघांनीही प्रेमविवाह करण्यासाठी घरातून पळ काढला. मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदियातून ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 16 May 2024
…आणि नाईक आनंदाश्रमात फिरकलेच नाहीत

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकी निमित्त बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे बोलविलेल्या विशेष बैठकीसाठी नवी मुंबईतील भाजपाचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक आणि संजीव नाईक आनंद आश्रमाच्या दिशेने गेले खरे मात्र आनंद मठात प्रवेश न करताच ते पुन्हा माघारी परतले.

वाचा सविस्तर...

12:35 (IST) 16 May 2024
नोटीशीनंतरही महाकाय जाहिरात फलक कायम; पालिकेच्या नियमावलीस मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा हरताळ

मुंबई : घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबई रेल्वेच्या हद्दीत उभारलेले महाकाय जाहिरात फलक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महालक्ष्मी स्थानकालगत असलेले महाकाय फलक हटविण्यासाठी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने रेल्वे प्रशासनाला गेल्यावर्षी नोटीस पाठवली होती.

वाचा सविस्तर...

12:34 (IST) 16 May 2024
Video: बिबट्याने झाडावर झेप घेतली अन्... पेंच व्याघ्र प्रकल्पात आक्रितच घडले

नागपूर  : वाघ आणि बिबट आसपास असतील तर सर्वात आधी माकडांना चाहूल लागते आणि मग ते आपल्या सहकाऱ्यांना ‘अलर्ट’ करतात. मात्र, मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात आक्रितच घडले. अवघ्या ६० मीटरवरुन बिबट झाडावर बसलेल्या माकडांना हेरत होता, पण त्या माकडांना त्याची भणकही लागली नाही. अवघ्या काही सेकंदात बिबट्याने रस्ता ओलांडून झाडावर झेप घेतली आणि क्षणार्धात त्या माकडाचा जीव घेतला.

सविस्तर वाचा

12:33 (IST) 16 May 2024
बुलढाण्यात परिचारिकेवर अत्याचार; बदनामीची धमकी देत...

बुलढाणा: बुलढाणा शहरातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या ३२ वर्षीय परिचारिकेवर २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा  संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्याने वेळोवेळी धमक्या देत तिच्या अब्रूचे लचके तोडले. याप्रकरणाची तक्रार पीडितेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी परिचारक असलेल्या २३ वर्षे तरुणावर अट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

12:33 (IST) 16 May 2024
काय सांगता? ‘टीसी’ काढण्यासाठी द्यावे लागताहेत पाचशे रुपये; जिल्हा परिषद शाळेतही पालकांची आर्थिक पिळवणूक

गोंदिया : खासगी आणि नामांकित शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे आजपर्यंत ऐकिवात होते. मात्र आता चक्क जिल्हा परिषद शाळेतही अशाप्रकारे वसुली सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यात जि. प. शाळांचे निकाल जाहीर झाले असून अनेक शाळांमधून आता विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी घेण्यासाठी शाळेत जातात.

सविस्तर वाचा

12:07 (IST) 16 May 2024
शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्धच झाला नाही!

मुंबई: राजकीय पक्षांची भविष्यातील भूमिका स्पष्ट करणारे जाहीरनामे महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी जाहीर केलेले असताना शिवसेना शिंदे गटाने जाहीरनाम्याला बगल दिली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्यापही जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही.

वाचा सविस्तर...

12:07 (IST) 16 May 2024
मुंबईत गुरुवारीही उष्मा आणि पावसाचा अंदाज

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईतील तापमानात बुधवारी झालेली वाढ गुरुवारीही कायम होती. त्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा सोसावा लागत आहे. तसेच गुरुवारी दुपारनंतर काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वाचा सविस्तर...

11:49 (IST) 16 May 2024
"लोकसभेनंतर वर्षभराने मोदी निवृत्त होणार, शाह पंतप्रधान तर योगी…’, केजरीवाल यांचा मोठा दावा

Arvind Kejriwal on Amit Shah : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. केजरीवाल यांनी दावा केला आहे की, "भाजपा यंदाची लोकसभा निवडणूक जिंकली तर अमित शाह यांना पंतप्रधान बनवलं जाईल. मोदी हे सध्या अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. तसेच लोकसभेनंतर दोन महिन्यात योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाईल." केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपाच्या पुढील नियोजनावर भाष्य केलं.

11:39 (IST) 16 May 2024
नागपूर : शहरातील दहन घाटांची दयनीय अवस्था, नागरिक त्रस्त

नागपूर : स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असताना शहरातील विविध भागातील दहन घाटांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.विशेषत: घाटावरील सरण रचण्याची जागा, पिण्याच्या पाण्याचे ठिकाण आणि घाटावरील शोकसभा घेण्यासाठीचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो.

सविस्तर वाचा

11:15 (IST) 16 May 2024
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट; अमरावती शहरात...

अमरावती : शहरातील बाजारपेठेत पाचशे रुपयांच्‍या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्‍याने व्‍यापारी आणि ग्राहकांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे.गेल्‍या पंधरा दिवसांत पाचशेच्‍या तब्‍बल २८ बनावट नोटा चलनात आल्‍याचे निदर्शनास आले आहे.येथील जयस्तंभ चौक परिसरातील एका बँकेत ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्या. 

सविस्तर वाचा

11:02 (IST) 16 May 2024
उमेदवारांची भूमिका- निष्ठावान विरुद्ध गद्दार लढाई: राजन विचारे

आम्ही बाळासाहेबांचे, मातोश्रीचे एकनिष्ठ शिवसैनिक होतो, आहोत आणि यापुढे ही राहणार. ज्या पक्षाने सर्व काही दिले, त्या पक्षाच्या विरोधात गद्दार गटाचे बोलण्याचे धाडस होतेच कसे ? त्यामुळे आता ही आमची खरी लढाई आहे..

वाचा सविस्तर...

10:59 (IST) 16 May 2024
५ हजार ९०० कुटुंबांचे विस्कटलेले धागे पुन्हा गुंफले!

नागपूर : कौटुंबिक कलह, अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक तक्रारी सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या भरोसा सेलला गेल्या सात वर्षांत १५ हजारांवर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ हजार ८०० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. ५ हजार ९०० जणांचा विस्कळीत झालेला संसार भरोसा सेलने पुन्हा रुळावर आणला.

सविस्तर वाचा

10:58 (IST) 16 May 2024
राष्ट्रीय डेंग्यू दिवस विशेष: राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यू मात्र नियंत्रणात

नागपूर : राज्यात मागील वर्षीच्या (१ जानेवारी ते ७ मे २०२३) तुलनेत चालू वर्षात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, मृत्यू नियंत्रणात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

सविस्तर वाचा

10:53 (IST) 16 May 2024
रायगडमधील १०३ गावांना दरडींचा धोका, दरडग्रस्त गावांचे भुवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण

अलिबाग : भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य दरडग्रस्त गावांना पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

10:47 (IST) 16 May 2024
मृत व्यक्ती, स्थलांतरितांची नावे मतदार यादीत, भाजपने दिले पुरावे

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान पहिल्या टप्प्यातच पार पडले. मतदान अपेक्षेप्रमाणे न झाल्याने त्यासाठी राजकीय पक्षांनी मतदार यादीला दोष देणे सुरू केले. त्यावरील चर्चा अद्यापही संपली नाही. पूर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काही वस्त्यांचे सर्वेक्षण करून मतदार यादीतील त्रूटी सप्रमाण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

सविस्तर वाचा

नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

बईत २० मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल (१५ मे) मुंबईला भेट दिली. कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन घाटकोपरमध्ये रोड शो केला. या रोड शोमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आणि नोकरदारवर्गाचं जनजीवन ठप्प झालं. अचानक मेट्रो मार्गिका बंद केल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती झाली होती. परिणामी संतप्त झालेल्या नागरिकांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला.

मुंबईत बुधवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींचा रोड शो झाल्याने या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले होते. पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद केली होती. परिणामी कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड फटका बसला.

Story img Loader