Lok Sabha Election 2024 Updates : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील साह मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईवर आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत रोड शो करून शक्तीप्रदर्शन केलं. २० मे रोजी कल्याण, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी आणि मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. महाविकास आघाडीने महायुतीविरोधात कंबर कसली आहे. तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्ल़ॉगद्वारे घेणार आहोत. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Lok Sabha Election 2024 Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

10:46 (IST) 16 May 2024
दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

मुंबईः दुचाकीच्या धडकेत २४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव सुनील राजपूत असून तो एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा. अपघातानंतर आरोपी दुचाकीस्वार पळून गेला असून  विक्रोळी पोलिसांनी त्याच्याविरूद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

10:45 (IST) 16 May 2024
धक्कादायक: पोलीसांच्या ताब्यातील आरोपी रेल्वेतून उडी मारून पसार

पुणे : मुंबईहून रेल्वेने पुण्याकडे येत असताना आरोपी  रेल्वेतून उडी मारून पसार झाल्याची घटना देहूरोड परिसरात घडली. विशाल हर्षद शर्मा असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  विशाल शर्मा हा एका गुन्ह्यातील आरोपी असून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत  होता.

सविस्तर वाचा

10:45 (IST) 16 May 2024
डेंग्यूचा धोका वाढला! जाणून घ्या रोगाची लक्षणे अन् प्रतिबंधाविषयी…

पुणे : डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने १६ मे  रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्यानिमित्ताने केले आहे.

सविस्तर वाचा

10:36 (IST) 16 May 2024
घाटकोपर दुर्घटना : तीन दिवसानंतर मदतकार्य स्थगित, १६ जणांचा मृत्यू

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून फलकाखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता. ही शोध मोहीम गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. मात्र हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले असून सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

वाचा सविस्तर…

10:36 (IST) 16 May 2024
मतदारसंघाचा आढावा : वायव्य मुंबई – ‘ईडी’ची चौकशी सुरू असलेल्या दोन शिवसैनिकांत चुरशीची लढत!

मुंबई : कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणारे रवींद्र वायकर व अशा चौकशीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे अमोल किर्तीकर अशा ‘ईडी’ची चौकशी सुरू असलेल्या दोन शिवसैनिकांत यंदा वायव्य मुंबईत चुरशीची लढत होत आहे.

वाचा सविस्तर…

10:14 (IST) 16 May 2024
“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”, मोदींच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, “मी सुचवलेलं की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१५ मे) दिंडोरी येथे जाहीर प्रचारसभेला संबोधित केलं. या प्रचारसभेत मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची योजना विरोधकांनी आखली आहे. विरोधी पक्षांनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन करून मजबूत विरोधी पक्ष बनवण्याचा मनसुबा बनवला आहे.”

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते की, आगामी काळात अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरून मोदी यांनी शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसमध्ये विलीन होईल असं वक्तव्य केलं होतं. मोदी यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, मीच असं सुचवलेलं की, काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, त्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत… मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय… काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरले आहेत… त्या पक्षांबाबत मी एक सल्ला दिला होता. सारख्या विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही.

नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

बईत २० मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल (१५ मे) मुंबईला भेट दिली. कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन घाटकोपरमध्ये रोड शो केला. या रोड शोमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आणि नोकरदारवर्गाचं जनजीवन ठप्प झालं. अचानक मेट्रो मार्गिका बंद केल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती झाली होती. परिणामी संतप्त झालेल्या नागरिकांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला.

मुंबईत बुधवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींचा रोड शो झाल्याने या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले होते. पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद केली होती. परिणामी कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड फटका बसला.