Marathi News Update : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहे. आज अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडणार आहे. तर अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावरुन प्रहारचे नेते बच्चू कडू आणि रवी राणा, नवनीत राणा यांच्यात वाद सुरु आहे. याबरोबरच महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली असली तर राष्ट्रवादीने या जागेचा दावा सोडला नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Marathi News Live Today, 24 April 2024 : अमरावतीत अमित शाहांच्या सभेआधी राजकारण तापलं; बच्चू कडू रॅली काढणार

12:53 (IST) 24 Apr 2024
आमदार बच्चू कडू यांच्या रॅलीला सुरुवात, शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या रॅलीला सुरुवात झाली आहे. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर काल बच्चू कडू यांना पोलिसांनी अडवले होते. सायन्सकोर मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी रद्द केल्यानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. यानंतर प्रहारच्यावतीने आज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीनंतर बच्चू कडू कार्यकर्त्यांना संबोधित करत आपली भूमिका मांडणार आहेत.

12:49 (IST) 24 Apr 2024
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही

मुंबई : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा दावा करून सक्तवसुली संचालनालयाकडून एकीकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली जात आहे.

वाचा सविस्तर…

12:48 (IST) 24 Apr 2024
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा ‘हार्टअटॅक’ आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २३ एप्रिलरोजी उघडकीस आली. सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी असे मृत युवकाचे नाव आहे.

वाचा सविस्तर…

12:25 (IST) 24 Apr 2024
मुंबई, ठाण्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटेना

मुंबई : ‘अबकी बार, ४०० पार’च्या घोषणा महायुतीने दिल्या असल्या तरी मुंबई-ठाणेसह काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 24 Apr 2024
नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम

नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा महिनाभराचा कालावधी उलटूनही सुटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. छगन भुजबळ हे स्पर्धेतून बाजूला झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते.

वाचा सविस्तर…

12:06 (IST) 24 Apr 2024
पुणे : साडेचार दशकांनंतर रेसकोर्सवर पंतप्रधानांची सभा, भाजपतर्फे नियोजन सुरू, पोलिसांकडूनही स्थळाची पाहणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुणे रेसकोर्स हे नवे स्थळ जवळपास निश्चित झाले आहे. येथे सभा झाली, तर या ठिकाणी तब्बल साडेचार दशकांनंतर पंतप्रधानांची सभा होईल. यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, त्यांची जानेवारी १९७२ मध्ये आणि नंतर १९७७ मध्ये पुणे रेसकोर्सवर सभा झाली होती.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 24 Apr 2024
अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य; उद्धव ठाकरेंचा टोला

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. ‘अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.

11:58 (IST) 24 Apr 2024
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाने घेतलेल्या विषाचा प्रकार शोधणारी सुविधाच नाही!

नागपूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने विषबाधेचे रुग्ण उपचाराला येतात. परंतु, एकाही रुग्णालयात या विषाचा प्रकार शोधणारी ‘टॉक्लिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ तपासणी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांना उपचारात अडचणी येतात. ही तपासणी उपलब्ध झाल्यास विषबाधेच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणे शक्य आहे.

वाचा सविस्तर…

11:23 (IST) 24 Apr 2024
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

ठाणे : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे कामानिमित्तने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असताना सोमवारी रात्री मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील रेल्वे पूलावरून जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 24 Apr 2024
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत

सांंगली : सांगलीमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या बंडखोरीने उबाठा शिवसेना अडचणीत आली असली तरी खरी गोची लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदारांची झाली आहे.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 24 Apr 2024
अमित देशमुख लातूर जिल्ह्यावर पकड निर्माण करण्यासाठी सक्रिय

लातूर : निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची, लातुरातील देशमुख कुटुंबीय मन लावून प्रचारात उतरतात. यावेळची लोकसभेची निवडणूक देशमुख कुटुंबीयांनी अगदी मनावर घेतली आहे.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 24 Apr 2024
सातारा: सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे यांचे निधन

वाई : आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड सातारा या कंपनीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे ( ८१) यांचे दुर्धर आजाराने सांगली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा मुलगी असा परिवार आहे.

वाचा सविस्तर…

11:09 (IST) 24 Apr 2024
अजितदादांनी सांगूनही कारवाई नाही! मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांना घातले पाठीशी

पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून वाभाडे काढले होते. मद्य पार्टीप्रकरणी १० ते १२ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यास रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

11:08 (IST) 24 Apr 2024
विद्यापीठांमध्ये पुन्हा पुन्हा झुंडशाही का अनुभवाला येते आहे?

हैदराबाद विश्वविद्यालयात १७ एप्रिलच्या रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने दोन विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केला. अर्थशास्त्र विभागात विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभात सांप्रदायिक गाणी लावण्यावर या दोन विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता.

वाचा सविस्तर…

11:08 (IST) 24 Apr 2024
पंकजा मुंडे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. तसेच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.

प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांना अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावर सभा घेण्याची परवानगी नाकारल्यानंतर ते थोड्या वेळात कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच दुपारी ते रॅली काढणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. याबरोबरच त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

आमदार बच्चू कडू (फोटो-संग्रहित छायाचित्र)