Maharashtra Breaking News Update : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. जागा वाटपातील तिढा सुटत नसल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत वाद होत आहेत. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील नेतृत्त्वांच्या नाकी नऊ येत आहेत. तर, काहींनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरून राजकीय इंगा दाखवला आहे. एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा असताना दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, रामदास तडस यांच्या सून पूजा तडसही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर महायुतीचा नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Today, 16 April 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा
बुधवार पेठेतील भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृष्टी ठेवून २०३६ च्या ऑलिम्पिकची तयारी आतापासूनच सुरू केली आहे, असे पी.टी. उषा यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत विद्यमान विरुद्ध नवख्यांच्या सामन्यात कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोन्ही भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हात मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात येऊन दोन्ही उमेदवारांना बळ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे कोणी वाकडे करू शकत नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
कोणी पक्ष चोरलेला नाही. एकनाथ शिंदेंनीही नाही आणि अजित पवारांनीही नाही. आज ८० टक्के लोक त्यांच्याबरोबर आहेत. म्हणून निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव त्यांना दिलं. काहीजण भावनिक करतात की पक्ष चोरला म्हणून. पण आम्ही चोऱ्या करणारे वाटलो?आम्ही काय दरोडेखोर आहोत? आम्ही कडक बोलत असू, पण आम्ही चोरटे किंवा दरोडेखोर नाही. आम्ही काम करणारी माणसं आहोत- अजित पवार</p>
मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती कामानिमित्त ९ मे रोजी बंद राहणार आहेत.
डोंबिवली : खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात स्थानिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी केली आहे.
पालघर : समाजमाध्यमावरून प्रसारित होणाऱ्या कशावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच पालघर मतदारसंघात चक्क उमेदवारी मिळाल्याचे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले. नक्की काय प्रकार आहे हे संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही समजेनासे झाले. शेवटी हे पत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. पण यातून नेतेमंडळींची काही काळ चांगलीच फसगत झाली.
धुळे – धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ग्रामसेविकेस १५ हजार रुपयांची तर, साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या दोन्ही कारवाया सोमवारी सायंकाळी झाल्या.
आता लाभार्थ्यांना जनावरे खरेदी करून द्यायची की नाही, असा प्रश्न पशुसंवर्धन विभागाला पडला आहे.
खारघर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने इंस्टाग्राम सहज म्हणून पाहत असताना त्यांना स्टोक लॉस रिकव्हरी नावाची लिंक दिसली.
वर्धा जिल्ह्यात ज्येष्ठ नेते दत्ता मेघे व त्यांचा परिवार असाच आब राखून आहे. १९९८ पासून दत्ता मेघे हे जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी झालेत.
ठाकरे गटाकडून आज नवं गाणं सादर करण्यात आलं. या गाण्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “शिवसेनेचं नवीन गीत आपल्या सर्वांसमोर सादर केलं आहे. मशाल या निशाणीने विजयी सुरुवात अंधेरीच्या पोटनिवडणुकीने झाली आहे. सरकारविरोधातील असंतोष मशालीच्या रुपाने भडकणार आहे. हुकूमशाही आणि जुमलेशाही राजवट जाळून भस्म होईल – उद्धव ठाकरे</p>
टिपेश्वर जंगलाची सम्राज्ञी ‘आर्ची’ नामक वाघिणीने दर्शन दिल्याने रविनाची टिपेश्वर अभयारण्य सफारी सफल झाली. वाघिणीच्या दर्शनाने ती आनंदून गेली.
वसई/ पालघर: लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने लढविण्याची घोषणा केली असून प्रचाराला सुरवात केली आहे. मागील निवडणुकीत बविआसोबत असलेले डाव्या पक्षे यंदा मात्र महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे डाव्यांच्या निर्णायक मतांचा फटका हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला बसणार आहे.
पाच वर्षात पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली. याची विचारणा तक्रारदाराने केली आहे.
उद्योगाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या या जिल्ह्यात अद्याप स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहू शकलेले नाही, अशी अवस्था आहे.
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात वारंवार गैरप्रकार घडत आहेत. मात्र, केवळ समित्या नेमण्याचा सोपस्कार केला जात आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी राजकीय वरदहस्त वापरून मोक्याच्या नियुक्त्या मिळवित असल्यामुळे एकाच जागी वर्षानुवर्षे राहतात. त्यामुळे सामान्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यातही हयगय केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून म्हाडा अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.
पारंपरिक पद्धतीने निवडणुकीचा माहोल नको, तर नियोजन ठेवून काम करण्याचा सल्ला वरिष्ठ पातळीवरून भाजप गोटात झिरपला आहे.
महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली.
ठाणे : ठाणे महापालिकेचा कचरा डायघर येथे आणला जात असल्याने येथील ग्रामस्थांनी आणि गृहसंकुलांतील रहिवाशांनी बैठका घेऊन लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी सुरू केली आहे. भांडार्ली येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर मागील नऊ महिन्यांपासून डायघर येथे ठाणे महापालिकेने कचरा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाविरोधात विविध आंदोलने, निवेदन देऊनही निर्णय होत नसल्याने नाइलाजाने हा निर्णय घेतला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सुरुवातीला वाघ अस्वलावर हल्ला करून त्याची शिकार सहजपणे करेल असे वाटते. मात्र, तसे काहीच घडत नाही.
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) April 16, 2024
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ,
मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ,
थोडी थोडी न थोडकी लागली फार,
याकूबच्या कबरीला साज आणि
हिंदू द्वेषाचा विखार…!
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!
शाखा शाखा गरागरा फिर फिर फिरे
गद्दार.. गद्दार.. बालिश ढोल बडवे…
रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून गर्दीचे नियोजन केले जात नसल्याने स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
एमएमओपीएलच्या कर्जाची परतफेड करण्याची हमी एमएमआरडीएने दिली असून मेट्रो १ मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
ईव्हीएम एक यंत्र असल्याने त्याला माहिती तंत्रज्ञान कायदा लागू होतो. मात्र या कायद्याची पायमल्ली करून ईव्हीएम उपयोगात आणली जाणार आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्णाघाताचे १३ रुग्ण नोंदवण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी हे खोटं बोलतात. मी पंतप्रधानांना बोलत नसून भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलत आहे. भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी केलेल्या घोषणा भंपक आणि खोट्या आहेत. निवडणूक रोखेंच्या माध्यमातून भाजपाने केलेला घोटाळा हा भयंकर आहे, हे जर अन्य देशात घडलं असतं तर त्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्याविरोधात खटला चालवला असता. निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे. दहशत आणि धमकीच्या माध्यमातून हे पैसे गोळा केले. निवडणूक रोखे ही संकल्पना वाईट नसावी. पण त्याचं भ्रष्टाचाराचं रुपांतर भाजपाने केलं. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामं देऊन त्यांच्याकडून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले – संजय राऊत</p>
पंतप्रधान भ्रष्टाचाराचं समर्थन करतात. १० हजार कोटींचं निवडणूक रोखे भाजपाच्या खात्यात जमा झाले. चंदा लो धंदा लो या नितीने सरकारने अशा ठेकेदारांना काम दिलं जे ब्लॅकलिस्टेड होत्या, त्यांच्यावर सीडीआय, सीबीआय, इन्कम टॅक्सची कारवाई सुरू होती. ही कारवाई थांबवण्यासाठी देणगी घेतल्या जातात आणि या देणग्यांचं मोदी समर्थन करतात. या भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याकरता मोदी निवडणुकीआधी इंटरव्ह्यु देतात – संजय राऊत
अजित दादांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी आम्हाला बोलावलं आहे. जाण्या येण्याची सोय केली आहे – छगन भुजबळ