Maharashtra Breaking News Update : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला लोकसभेच्या ३० जागा तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असतानाच महायुतीच्या काही जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीमधील पक्षात रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही बिघाडी होण्याचे चित्र आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 17 April 2024 : महायुतीचे जागावाटप का रखडले? नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन रस्सीखेच

16:14 (IST) 17 Apr 2024
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत. पहिल्या टप्यातील निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा-गोंदिया, रामटेक आणि चिमूर या मतदारसंघाचा पहिल्या टप्यात समावेश असून येथील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी ६ वाजेनंतर या मतदारसंघातील उमेदवारांना आपला प्रचार करता येणार नाही.

16:05 (IST) 17 Apr 2024
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सहा लाख ६४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे.

वाचा सविस्तर…

16:01 (IST) 17 Apr 2024
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?

संशोधनाधिष्ठित उद्योगच आजच्या काळात अर्थकारणाचे प्रमुख स्तंभ होत आहेत. मात्र, या क्षेत्रातही भारताचे स्थान नगण्य असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सविस्तर वाचा…

15:58 (IST) 17 Apr 2024
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उन्हाचा पारा वाढत असताना उष्णतेचा फटका नागरिकांसह भटक्या प्राण्यांनाही सहन करावा लागत आहे. १० ते १६ एप्रिल या सहा दिवसांत भटक्या प्राण्यांच्या निर्जलीकरणाची ३१६ प्रकरणे मुंबई, ठाणे जिल्ह्यात समोर आली आहेत.

वाचा सविस्तर…

15:51 (IST) 17 Apr 2024
पिंपरी: मावळमध्ये उमेदवारांची दमछाक

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांचा गाठीभेटींवर भर आहे.

सविस्तर वाचा…

15:43 (IST) 17 Apr 2024
ट्रक चालकांकडून अल्पवयीन; मुलीचे अपहरण, तीन तासांत छडा

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या युवकाने प्रेयसीच्या १२ वर्षीय मुलीचे ट्रक चालकाने अपहरण करुन जंगलात नेले. मुलीच्या मोठ्या बहिणीने अपहरणाची माहिती पोलिसांना दिल्यावर एकच खळबळ उडाली. हुडकेश्वर, बेलतरोडी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपीला तीन तासांत अटक केली व अपहृत मुलीला सुखरुप पालकांच्या स्वाधीन केले.

वाचा सविस्तर…

15:43 (IST) 17 Apr 2024
निवडून आल्यास भाजपमध्ये जाणार का? महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे म्हणाले, “मी भाजपमध्ये…”

वाघेरे म्हणाले की, संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे.

सविस्तर वाचा…

15:41 (IST) 17 Apr 2024
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण

कल्याण : उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच कल्याण पू्र्व, पश्चिम भागात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. विजेच्या सततच्या लपंडावामुळे कल्याण मधील नागरिक दोन दिवस हैराण आहेत.

वाचा सविस्तर…

15:27 (IST) 17 Apr 2024
बीएसएनएलला अजूनही ४जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई

पुणे : बीएसएनएलच्या ४ जी, ५ जी सेवेची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून या सेवेसाठी आवश्यक उपकरणे बीएसएनएलला अद्याप मिळालेली नाहीत. यामुळे बीएसएनएल देशाच्या नागरिकांना ४ जी, ५ जी सेवा देण्यास कमी पडत आहे.

वाचा सविस्तर…

15:26 (IST) 17 Apr 2024
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?

विद्यार्थ्यांना प्रश्नांचे नीट आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका दोन भाषांत करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला.

सविस्तर वाचा…

15:19 (IST) 17 Apr 2024
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या महिलांच्या डब्यातून पुरूष प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाचा सविस्तर…

15:16 (IST) 17 Apr 2024
पुणे : महापौर बंगल्यातील जलमापक शोभेसाठी?

महापौर बंगल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीवर जलमापक बसविण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

15:07 (IST) 17 Apr 2024
कळंबोलीत चार किलो गांजासह एकाला अटक

पनवेल : कळंबोली परिसरात एक लाख रुपये किमतीचा चार किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थासह एकाला पोलीसांनी अटक केली. नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी आसूडगाव येथे राहत असलेल्या ३४ वर्षीय दिनेश जाधव याला अटक करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

14:54 (IST) 17 Apr 2024
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी

पनवेल : तळोजा येथील सेक्टर ३४ व ३६ येथील महागृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनी बुधवारी सकाळी बेलापूर येथील सिडको भवनासमोर एकत्र येऊन त्यांची व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

वाचा सविस्तर…

14:51 (IST) 17 Apr 2024
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य

जळगाव : माझ्यामुळे झाले, मी होतो म्हणून झाले, मीच सर्वकाही आहे, अशी भाषा अनेक जण करतात. पक्षाच्या पुढे कोणीच मोठा नाही. भाजपमध्ये ३०-३५ वर्षे मंत्री होते, २०-२२ वर्षे लाल दिव्याची गाडी होती. एकदा पराभूत होताच पक्ष सोडून गेले. माझ्यामुळे भाजप आहे, असे म्हणणारे अनेक मातब्बर आज थप्पीला लागले आहेत, अशी टीका करत नामोल्लेख टाळत भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले.

वाचा सविस्तर…

14:40 (IST) 17 Apr 2024
‘साऊथ मे भाजप साफ, नॉर्थ मे भाजप हाफ’, खासदार इमरान प्रतापगडी म्हणतात…

न्यू इंग्लिश हायस्कूलचे क्रीडांगणावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगडी यांची सभा झाली.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 17 Apr 2024
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी

पुणे शहरातील मेट्रो कोणामुळे झाली, यावरून महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मंगळवारी खडाजंगी झाली.

वाचा सविस्तर…

14:28 (IST) 17 Apr 2024
पुणे: सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 17 Apr 2024
गोकुळचे संचालक चेतन नरके यांची कोल्हापूरच्या निवडणुकीतून माघार

गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारीदेखील केली होती. मात्र, त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे समजते.

13:51 (IST) 17 Apr 2024
विधानपरिषदेसाठीच आबा बागुल यांची भाजप बरोबर जवळीक ?

माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सोमवारी भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली होती.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 17 Apr 2024
रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकारण्यांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून हात आखडता घेतला आहे. परिणामी, रक्तपेढ्यांसमोर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

वाचा सविस्तर…

13:20 (IST) 17 Apr 2024
फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा

मेहनत आणि जिद्द असली की कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे धुळ्याच्या हिमांशू टेंभेकर याने दाखवून देत ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात ७३८ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

सविस्तर वाचा…

13:14 (IST) 17 Apr 2024
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर

गेल्या वर्षभरात मुंबईतील चार आरटीओ कार्यालयात २.५४ लाख वाहनांची नोंदणी झाली असून मुंबईतील एकूण वाहनांची संख्या ४६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. एप्रिल २०२४ च्या अखेरपर्यंत ही आकडेवारी ४७ लाखांपार होण्याची चिन्हे आहेत.

वाचा सविस्तर…

13:10 (IST) 17 Apr 2024
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल

मुंबई नाशिक महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जातो. या मार्गावरून उरण जेएनपीटी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने वाहतूक करतात.

सविस्तर वाचा…

13:03 (IST) 17 Apr 2024
फ्लेमिंगो क्षेत्रातील राडारोडा दूर, अधिकाऱ्यांची पाहणी; पामबीच मार्गालगत लोखंडी कठडा उभारण्याचे आदेश

नवी मुंबईच्या पामबीच मार्गाजवळ लाखो फ्लेमिंगो पक्षी विहार करतात.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 17 Apr 2024
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन; तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा

महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 17 Apr 2024
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर

जळगाव : शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेक्टर डीमधील मौर्या केमिकल कंपनीमध्ये बुधवारी सकाळी मोठा स्फोट झाला. त्यामुळे कंपनीला आग लागली आहे. या भीषण आगीत २० पेक्षा अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा…

12:24 (IST) 17 Apr 2024
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव

नागपूर : फेसबुक मित्रासोबत बायको पळून गेल्याने तिला परत आणण्यासाठी नवऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 17 Apr 2024
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला आहे.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 17 Apr 2024
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…

टर्मिनलच्या चाचणी पूर्ण करून ते १५ एप्रिलला सुरू करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे नियोजन होते.

सविस्तर वाचा…

महाविकास आघाडी

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला लोकसभेच्या ३० जागा तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.