Maharashtra Breaking News Update : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला लोकसभेच्या ३० जागा तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असतानाच महायुतीच्या काही जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीमधील पक्षात रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही बिघाडी होण्याचे चित्र आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.
Marathi News Live Today, 17 April 2024 : महायुतीचे जागावाटप का रखडले? नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन रस्सीखेच
अकोला : लोकसभा निवडणुकीची कधी नव्हे ती उत्सुकता मतदारसंघात बघायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचारात उमेदवारांकडून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतजोडणीवर भर आहे. यंदा लोकसभेच्या प्रचारादरम्यान समाजातील विविध घटकांच्या गठ्ठा मतपेढीला एकत्रित करून जेवणावळी उठवल्या जात आहेत.
वर्धा : शरद पवार यांच्या रॅलीने आघाडीचे उमेदवार अमर काळे चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी व प्रमुख नेते यांच्यात उत्साह संचारला. हा उत्साह कायम असावा म्हणून ठिकठिकाणी छोट्या सभा व गावात प्रचार यात्रा सुरु झाल्यात.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग करण्याच्या प्रकरणामध्ये आरोपी जनार्दन गुलाबराव मून आणि जावेद गफूर पाशा यांना नागपूर सत्र न्यायालयाने अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. तपासाला सहकार्य करावे, अशा सूचना देत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीनाचा अर्ज मंजूर केला.
नागपूर : एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती नसल्याचे महामंडळाने माहिती अधिकारात कळवले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले आहे.
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी आज अभिजित अडसुळ यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट घेण्यात आली आहे.
महाविकास आघाडी
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला लोकसभेच्या ३० जागा तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.