Marathi News Update : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका वाढला असून पक्षांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असले तरीही महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही स्पष्ट झालेला नाही. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने अद्यापही त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार आणि कोण कोणती आश्वासने देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर वाचा.

Live Updates

Marathi News Live Today, 22 April 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:32 (IST) 22 Apr 2024
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या पौर्णिमा यात्रेचा उद्या मंगळवार हा मुख्य दिवस असून सोमवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा...

20:19 (IST) 22 Apr 2024
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही

नजिकच्या काळात विदर्भात १०० नवे लघुद्योग सुरू व्हावे यासाठी संघटनेचे प्रयत्न राहतील, अशी माहिती विदर्भ इकॉनॉमिक डेव्हल्पमेंट (वेद) कौन्सिलच्या नवनियुक्त अध्यक्ष रिना सिन्हा यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

सविस्तर वाचा...

20:07 (IST) 22 Apr 2024
रायगड मतदारसंघातून आठ उमेदवारांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात, तीन अनंत गीतेंचा समावेश

गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी, सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका उमेदवारानी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे.

सविस्तर वाचा...

20:01 (IST) 22 Apr 2024
सोलापुरात २१ तर माढ्यात ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

सोलापूर लोकसभा मतदारसंघात ३२ पैकी ९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सविस्तर वाचा...

19:48 (IST) 22 Apr 2024
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग

२१ एप्रिलला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला भामरागड तालुक्यातून संशयास्पद स्थितीत फिरताना अटक केली.

सविस्तर वाचा...

19:39 (IST) 22 Apr 2024
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत

नांदगाव आणि मनमाड बाजार समितीत बंद लिलाव लवकरच सुरू होतील, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

सविस्तर वाचा...

19:14 (IST) 22 Apr 2024
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर

सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले हाेते. त्याच दरम्यान, हल्ला झाला.

सविस्तर वाचा...

19:13 (IST) 22 Apr 2024
नूरा लढतीसाठी प्रयत्नात असणाऱ्यांचा माझ्या उमेदवारीने अपेक्षाभंग – विशाल पाटील

भाजपचा पराभव करणे आवश्यक असल्याने मी जनमताच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 22 Apr 2024
“महायुती बुलढाण्यासह राज्यात ४५ जागा जिंकणार”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; तुपकरांवर टीकास्त्र

महायुती महाराष्ट्र राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकणार असून त्यात बुलढाण्याचाही समावेश असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 22 Apr 2024
सांगली: कायदेशीर पूर्तता नसल्याने शेडबाळ मठाचा हत्ती वन विभागाने घेतला ताब्यात

रविवारी नांद्रे येथील धार्मिक मिरवणुकीसाठी आणलेला शेडबाळ मठाचा हत्ती वनविभागाने ताब्यात घेऊन माहुतावर वन गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

18:15 (IST) 22 Apr 2024
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प

डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे ग्रहणे अशी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना समजणार आहे.

सविस्तर वाचा...

18:01 (IST) 22 Apr 2024
सांगली: राजकीय दबाव झुगारुन विशाल पाटलांची बंडखोरी

विशाल पाटील यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.

सविस्तर वाचा...

18:01 (IST) 22 Apr 2024
अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनावर विजयाचा कौल? अंतिम टप्प्यात समाज माध्यमांवर प्रचारयुद्ध

बुलढाणा : बुलढाणा मतदार संघात येत्या २६ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रचार अंतिम टप्यात आला आहे़. अंतिम टप्प्यात महायुतीने प्रचार सभांचा धडाका लावला असून आघाडीचा थेट संपर्कावर भर आहे. दुसरीकडे स्वतःच स्टार प्रचारक असलेल्या अपक्षांनी ‘रोड शो’ वर भर दिला असून त्याला मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित आहे.

वाचा सविस्तर...

18:00 (IST) 22 Apr 2024
उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधण्यासाठी काँग्रेसची घाई, पण भाजपची बाजी

नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेअकरा ते १२ हा मुहूर्त साधण्याकरिता भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची लगबग दिसून आली. भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी शक्तीप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला, तर, दुसरीकडे मुहूर्ताची औपचारीकता साधण्यासाठी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी अवघ्या पाच कार्यकर्त्यांसमवेत गावित यांच्याआधीच जिल्हाधिकारी कार्यालयत पोहचले.

वाचा सविस्तर...

17:54 (IST) 22 Apr 2024
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे.

सविस्तर वाचा...

17:43 (IST) 22 Apr 2024
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके

रोहित पवारांनी लक्षात ठेवावं अजित पवारांमुळेच त्यांना कर्जत - जामखेडची उमेदवारी मिळाली आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 22 Apr 2024
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन

डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस या भागात तैनात राहत नसल्याने प्रवासी एक ते दीड तास मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात अडकून पडतात.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 22 Apr 2024
नाशिक : चौक मंडईतील आगीत ४० पेक्षा अधिक वाहने खाक

नाशिक : जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत ४० ते ५० वाहने खाक झाली. कुठलीही जिवीतहानी झाली नाही. चौक मंडई हा वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणी चप्पल, बूट गोदाम आणि अनेक वस्तूंच्या सुट्या भागांची दुकाने आहेत.

वाचा सविस्तर...

16:33 (IST) 22 Apr 2024
सोलापुरात ‘वंचित’ची उमेदवारी मागे; भाजपविरोधी मतविभागणी टळणार ?

२०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाची मदत घेऊन उभे राहून एक लाख ७० हजार मते घेतली होती.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 22 Apr 2024
“मोदी म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान, ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण…”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका

अमरावती : नरेंद्र मोदी आता देशाचे काळजीवाह‍ू पंतप्रधान आहेत. ते सध्‍या त्‍यांच्‍या पक्षाची काळजी घेत आहेत. त्‍यांना परत सत्‍तेवर येणार नाही, याची भीती भेडसावत आहे. राज्‍यात प्रचारासाठी वारंवार येत आहेत, गल्‍लीबोळात फिरत आहेत, अशी टीका माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली.

वाचा सविस्तर...

16:27 (IST) 22 Apr 2024
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…

यवतमाळ : कापूस आणि सोयाबीनचे दर घसल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच कापूस आणि सोयाबीनमधील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी चार हजार कोटी रूपयांची तरतूदही केली. मात्र अचारसंहितेमुळे ही रक्कम वाटप करता आली नाही.

वाचा सविस्तर...

16:18 (IST) 22 Apr 2024
रायगडात काँग्रेसची वाताहत सुरूच

अलिबाग- माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील जनाधार असलेला आणखी एक नेता पक्ष सोडून गेला. या साऱ्या घडामोडींमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आघाडीच्या राजकारणात जिल्ह्यातील पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष करण्याचे पक्षश्रेष्टींचे धोरण संघटनेच्या मुळावर आले आहे.

सविस्तर वाचा....

15:59 (IST) 22 Apr 2024
“मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती”, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी

ट्रिपल इंजिनचे सरकार असले तरी या इंजिनमध्ये खरे इंजिन हे मनसेचे मूळ इंजिन आहे, याची जाणीव ठेवावी असे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

15:37 (IST) 22 Apr 2024
लोकसभा निवडणुकीमुळे कल्याण-डोंबिवलीत चोरट्या मद्याची उलाढाल वाढली, ३०० लिटर गावठी आणि विदेशी मद्य जप्त

टिळकनगर पोलीस आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करून ३०० लिटरहून अधिक साठ्याची हातभट्टीची नवसागरयुक्त आणि विदेशी मद्य जप्त केले आहे.

सविस्तर वाचा...

15:37 (IST) 22 Apr 2024
“देशात नवीन पुतिन…”, शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले…

राज्‍यघटना बदलली पाहिजे, अशी इच्‍छा बाळगणाऱ्या लोकांच्‍या हाती सत्‍ता आली तर, देशाची संसदीय लोकशाही अस्‍ताला जाईल, अशी भीती शरद पवार यांनी व्‍यक्‍त केली.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 22 Apr 2024
मोदी म्हणजे, “काळजीवाहू पंतप्रधान”; ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका

अमरावती : नरेंद्र मोदी आता देशाचे काळजीवाह‍ू पंतप्रधान आहेत. ते सध्‍या त्‍यांच्‍या पक्षाची काळजी घेत आहेत. त्‍यांना परत सत्‍तेवर येणार नाही, याची भीती भेडसावत आहे. राज्‍यात प्रचारासाठी वारंवार येत आहेत, गल्‍लीबोळात फिरत आहेत, अशी टीका माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली.

वाचा सविस्तर...

15:11 (IST) 22 Apr 2024
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही

मुंबई : महारेराकडे जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेल्या २१२ प्रकल्पांबाबत महारेराच साशंक आहे. हे प्रकल्प सुरु झाले आहेत का? या प्रकल्पांची सद्यस्थिती काय याबाबतची कोणतीही माहिती या प्रकल्पांतील विकासकांनी महारेराकडे सादर केलेली नाही.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 22 Apr 2024
‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…

नागपूर : अवकाळी पावसाने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. तीन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर अवकाळी पावसाने ते पुन्हा कमी झाले आहे. दरम्यान, उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने उपराजधानीसह काही शहरांना आज अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

वाचा सविस्तर...

14:11 (IST) 22 Apr 2024
राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, विविध घोषणांचा पाऊस
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार,
  • यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळण्याकरता प्रयत्न करणार
  • शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थित असली पाहिजे,
  • आपरंपरिक वीजनिर्मिती, खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर पर्यावरणाचं संकट थोपवायचं असेल तर वीजनिर्मिती युनिट, उद्योगांना प्राधान्य,
  • कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ
  • जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावणार
  • उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा,
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा.
  • 14:00 (IST) 22 Apr 2024
    ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला

    भाईंदर : ठाणे लोकसभा जागेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे भाजप- शिवसेना पक्षांअंतर्गत संभ्रम वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी मिरा भाईंदर शहरातील प्रचार थंडावल्याचे दिसून आले.

    वाचा सविस्तर...

    Marathi News Live Today, 22 April 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

    Story img Loader