Marathi News Update : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका वाढला असून पक्षांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असले तरीही महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही स्पष्ट झालेला नाही. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने अद्यापही त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार आणि कोण कोणती आश्वासने देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 22 April 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

13:59 (IST) 22 Apr 2024
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…

नागपूर : सर्वात गजबजलेल्या सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून तेथे वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

वाचा सविस्तर…

13:13 (IST) 22 Apr 2024
मोदींच्या रुपाने नवा हुकूमशाह तयार होतोय की काय अशी चिंता”, अमरावतीतून शरद पवारांची टीका

जवाहरलाल नेहरूंचा इतिहास कोणी पुसू शकत नाही. पण मोदी त्यांच्यावर टीका करतात. मोदींच्या रुपाने नवा हुकूमशाह तयार होतोय की काय अशी चिंता निर्माण झाली आहे. मोदींची खासदारांमध्ये दहशत आहे. कुणालाही बोलू दिलं जात नाही. ते एकटेच बोलतात. मोदी कुठेही गेले तरी आधी नेहरुंवर बोलतात मग काँग्रेसवर टीका करतात – शरद पवार</p>

13:09 (IST) 22 Apr 2024
पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेची मुदत डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असली तरी या मुदतीत राज्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. यंदाच्या वर्षातील उद्दिष्टानुसार अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ झाला नसल्याची माहिती हाती आली आहे. मात्र डिसेंबर अखेरपर्यंत ही घरे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 22 Apr 2024
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी

वर्धा : वैद्यकीय सेवेला गांधीवादी विचारांच्या कसोटीवर तपासून आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

वाचा सविस्तर…

13:04 (IST) 22 Apr 2024
वा रे पोलीस! प्रेमी युगुलांची लुटमार, हफ्तावसुली…

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर रिंग रोडवर अंधारात कार उभी करून एक युवक विवाहित महिलेसोबत अश्लील चाळे करीत होता. दरम्यान कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले.

वाचा सविस्तर…

12:46 (IST) 22 Apr 2024
‘बारामती’साठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी, महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवा; अजित पवारांची सूचना

पुणे : मताधिक्य वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एक ते सात मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 22 Apr 2024
पुणे : बोहरी आळीत आग; रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले

पुणे : रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात रामसुख मार्केटमधील दुकानात सकाळी आग लागली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 22 Apr 2024
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर

डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील नांदिवली पंचानंद येथे रविवारी पुनर्विकासासाठी एक इमारत तोडताना ठेकेदाराने धुळ प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना न करता शक्तिमान यंत्रांच्या साहाय्याने दिवसभर तोडकाम केल्याने या भागात धुळीचे लोट पसरले होते.

वाचा सविस्तर…

12:10 (IST) 22 Apr 2024
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार

पुणे : महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी येत्या गुरुवारी (२५ एप्रिल) नदीपात्रात सभा होणार आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळील जागेत सभा घेण्याचे नियोजित असून त्यादृष्टीने नदीपात्रातील जागेची चाचपणी सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 22 Apr 2024
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…

नागपूर : वर्गात एकटीच अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थिनीला पाहून वासनांध शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर…

11:52 (IST) 22 Apr 2024
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

कल्याण मधील विठ्ठलवाडी, शहाड भागातून वाहत असलेल्या वालधुनी नदी पात्रात मागील दोन महिन्यांपासून मातीचे भराव टाकून बांधकामे उभी केली जात आहेत.

वाचा सविस्तर…

11:48 (IST) 22 Apr 2024
हडपसर भागात गोळीबाराची अफवा; पोलिसांची धावपळ

पुणे : हडपसर भागात आयाेजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दोन गटांत किरकोळ वाद झाले. शहरात गोळीबाराच्या सलग चार घटना घडल्यानंतर हडपसर भागात गाेळीबार झाल्याची अफवा पसरल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 22 Apr 2024
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रण तापले असताना महायुती – महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. कोल्हापुरात सुरुवातीला निश्चितपणे विजयी होणार इतपत असणारा दावा आता लाखाच्या घरात पोहोचला आहे.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 22 Apr 2024
मावळमध्ये महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सोमवारी (२२ एप्रिल) रणशिंग फुंकण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा….

11:20 (IST) 22 Apr 2024
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २६ टप्प्यांत ८२ निविदा सादर झाल्या आहेत. त्यात निवडणूक रोखे खरेदीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेघा इंजिनियरिंग कंपनीच्या आठ निविदांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 22 Apr 2024
सातारा: दगाफटका टाळण्यासाठी रात्रीत उदयनराजेंचे तैलचित्र पुसले

वाई : साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या घरालगतच्या भिंतीवर काढण्यात आलेले खासदार उदयनराजेंचे तैलचित्र लोकसभा निवडणुकीत दगा फटका बसू नये म्हणून पुसून नुकसान टाळण्याचा (‘डॅमेज कंट्रोल’)चा प्रयत्न करण्यात आला.

वाचा सविस्तर…

11:19 (IST) 22 Apr 2024
विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?

नोकरीनिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास वाहन मालकांना त्यांच्या वाहनाचा पूर्वीचा वाहन नोंदणी क्रमांक बदलून नव्या क्रमाकांची नोंदणी करावी लागत होती. सततच्या बदलीची नोकरी असल्यास वारंवार पुनर्नोंदणीचा व्याप आणि खर्च होत होता. त्यासाठी वाहनांच्या नोंदणीसाठी ‘बीएच’ मालिका सुरू केली.

वाचा सविस्तर…

11:19 (IST) 22 Apr 2024
आंतरराष्‍ट्रीय बाजारातील मंदीचा फटका कापसाला बसणार? कापूस उत्पादकांसमोर कोणते पर्याय?

आंतरराष्‍ट्रीय बाजारात कापसाच्‍या भावात गेल्‍या महिनाभरात १५ ते २० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामात देशात काय स्थिती राहणार, त्‍याविषयी…

वाचा सविस्तर…

11:17 (IST) 22 Apr 2024
मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?

यवतमाळ : विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारणे, त्यानंतर मराठवाड्यातील राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी या घडामोडींमुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून गेली १५ वर्षे शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या शिंदे गटापुढे आव्हान उभे ठाकले आहे.

वाचा सविस्तर…

11:14 (IST) 22 Apr 2024
भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका

भिवंडी, कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित पत्रकार परिषद कल्याण जिल्हा काँग्रेस समितीने आयोजित केली होती. खासदार कपिल पाटील यांच्यावर भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी सडकून टीका केली.

वाचा सविस्तर…

11:12 (IST) 22 Apr 2024
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ?

नवी मुंबईतील ऐरोली खाडी किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच जमा झाला आहे. वाढती उष्णता आणि रासायनिक प्रदूषणाने हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच माशांचे प्रमाण कमी झाले त्यात  या प्रकाराने मच्छीमार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

वाचा सविस्तर…

11:11 (IST) 22 Apr 2024
मित्राच्या हळदी समारंभासाठी गेलेल्या तरूणाचा विचित्र अपघातात मृत्यू , एकजण जखमी

ठाणे : मित्राच्या हळदी समारंभासाठी मुंबईहून आलेल्या एका तरूणाचा पूर्व द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघातात मृत्यू झाला. सैकत मोंडल असे मृताचे नाव असून या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. त्याचा साथिदार देखील या घटनेत जखमी झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:10 (IST) 22 Apr 2024
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाकडे १६ जागा, ठाणे-पालघरचा प्रश्न सुटला?

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून शिंदे गटाला १६ जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गट मुंबईतून ३ जागेवरून लढणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. परंतु, ठाणे आणि पालघरच्या जागेवरून कोणाला संधी देणार याबाबत त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं नाही.