Maharashtra Breaking News Live Update: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून एकमेकांवर परखड शब्दांत टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यातच जागावाटप व त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंना निर्माण होणाऱ्या नाराजीवर सर्वपक्षीय चर्चा-बैठकांमधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Live News Updates 15 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!

14:13 (IST) 15 Apr 2024
प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय

कोल्हापूर : एकदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार अशी गर्जना दोन दिवसापूर्वी करणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन प्रचारात सक्रिय होण्याबाबत मनधरणी केली.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 15 Apr 2024
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट

कल्याण – भिवंडी लोकसभेचे खासदार केंद्रीय मंत्री कपील पाटील यांंनी सोमवारी सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांंचे आभार मानले.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 15 Apr 2024
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विविध ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 15 Apr 2024
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटलांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील जी. के. वाईन्स या मद्य विक्री दुकानातील महागड्या मद्याच्या बाटल्या चोरून बाहेर मध्यस्थांच्या मार्फत ढाब्यांना विकून पैसे कमविणाऱ्या चार जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. यामध्ये दुकानातील एका कामगाराचा सहभाग आढळून आला आहे.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 15 Apr 2024
माढ्यात मोहिते- पाटलांच्या प्रवेशाने राजकीय गणिते बदलली

पंढरपूर : माढा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षात धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतर राजकीय गणिते बदलली आहेत. सातारा जिल्ह्यातील खासदार रणजितसिंह निंबाळकर-जयकुमार गोरे या दोघांच्या विरोधातील नाराज मंडळी एकत्र येऊ लागल्याने भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 15 Apr 2024
जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार

जालना – जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवे आणि भाजपने केलेल्या मतदारसंघाच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असणार असल्याचे म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 15 Apr 2024
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या

मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 15 Apr 2024
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवली – डोंबिवली जवळील पलावा-खोणी गृहसंकुलातील जॅस्मिन सोसायटीत दोन भावांनी बांगलादेशमधून घर सांभाळण्यासाठी ठेवलेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने राहत्या घरात अत्याचार केले.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 15 Apr 2024
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार अमोल कोल्हे रविवारी भोसरी विधानसभेतील इंद्रायणीनगर भागात गाव भेट दौऱ्यावर होते. यावेळी निओ रिगल सोसायटीत मतदारांना भेटत असताना त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 15 Apr 2024
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण

जुना वाद किंवा मिरवणुकीत झालेल्या खडाजंगीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 15 Apr 2024
Maharashtra Political News Live Updates: श्रीकांत शिंदेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

यावर हसायचं की रडायचं हे कळत नाहीये. आजकाल पत्राचाळीचे आरोपीही पत्र लिहायला लागले आहेत. मी पत्र वाचलं नाही. पण काहींनी मला सांगितलं की त्यात वैद्यकीय सेवा कशी केली जाते? कुणाला मदत केली जाते? याची माहिती दिली आहे. त्यांच्या तोंडून शिव्यांशिवाय दुसरं काही येत नाही. पण आज फाऊंडेशनच्या कामाबाबत चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. त्यांनी मोदींना पत्र लिहिलंय. म्हणजे त्यांचा मोदींवरचा विश्वास वाढला आहे – श्रीकांत शिंदे

11:42 (IST) 15 Apr 2024
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले, सनदी लेखापालाची ‘अशी’ केली कोट्यवधींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सनदी लेखापालाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 15 Apr 2024
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

संपूर्ण विश्वाने नेता मानलेले नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारणे किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांच्या इंडिया आघाडीला देशाचे तुकडे करू देणे, असे दोनच पर्याय आता आपल्याकडे शिल्लक राहिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 15 Apr 2024
Maharashtra Political News Live Updates: देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

श्रीकांत शिंदेंच्या संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करणारं पत्र संजय राऊतांनी लिहिल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत? असा सवाल केला. “कोण संजय राऊत? तुम्ही दर्जा असणाऱ्या लोकांबद्दल प्रश्न विचारा. माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा”, असं ते म्हणाले.

11:08 (IST) 15 Apr 2024
महाराष्ट्र अंनिसने निवडणुकीतील उमेदवारांवर कारवाईची मागणी का केली ?

अघोरी प्रकार करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 15 Apr 2024
Maharashtra Political News Live Updates: मोदी संविधान बदलणार का? फडणवीस म्हणतात…

मोदींनी स्पष्टपणे सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींची एनडीएचे प्रमुख म्हणून निवड झाली, तेव्हा मोदींनी संविधानाची पूजा केली आणि मग पद स्वीकारलं. गेल्या १० वर्षांपासून मोदींकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्यांनी संविधानाचं रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचारही केला नाही.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की संविधानाची मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. जेव्हा विकास, जनहिताचं काम करता येत नाही, विश्वासार्हता संपलेली असते तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे – देवेंद्र फडणवीस</p>

10:50 (IST) 15 Apr 2024
“केवळ सभेत दिसू नका, व्यक्तिगत नाराजी दूर ठेवा”, भाजप आमदारांना मिळाला सल्ला

कसलेला राजकीय मल्ल म्हणून ओळख असणारे रामदास तडस हे पण कसलीच कसर राहू नये म्हणून दक्ष झाल्याचे दिसून येते.

सविस्तर वाचा…

10:37 (IST) 15 Apr 2024
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना अनेक आश्वासने दिली होती. वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही, असे कन्हैयाकुमार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

10:34 (IST) 15 Apr 2024
Maharashtra Live News Updates: श्रीकांत शिंदेंच्या संस्थेवर संजय राऊतांचा गंभीर आरोप!

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या खात्यात गेल्या ४० वर्षांत फक्त ४०-५० लाखांची उलाढाल झाली आहे. पण त्यांनी केलेला खर्च काही कोटींमध्ये आहे – संजय राऊत</p>

10:33 (IST) 15 Apr 2024
Maharashtra Live News Updates: संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल!

हे लोक कोट्यवधींची उलाढाल करत आहे असं त्यांच्या व्यवहारांवरून दिसतंय. गणेशोत्सव स्पर्धेदरम्यान त्यांनी कोट्यवधी रुपये वाटले. गणपतीसाठी ५००-६०० एसटी गाड्या बुक करण्यात आल्या. याचा सरळ अर्थ सरकारच्या बाळराजेंच्या फाऊंडेशनकडून कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. बाळराजे मुख्यमंत्री कार्यालयात बसून चंदा लो, धंदा दो याच पद्धतीने पैसे कमावत आहेत – संजय राऊत</p>

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Maharashtra Live News Updates 15 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!