Mumbai Maharashtra News Today : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचे कळते. शिंदे गटाने हिंगोलीसाठी हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र आता येथील उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे. तसेच अद्याप नाशिक, यवतमाळ आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. हे मतदारसंघ भाजपाकडे जाणार की शिंदे गट याठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून इतरांना उमेदवारी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अकोला येथून काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आंबेडकर काय भूमिका घेणार, हेही पाहावे लागेल.
Maharashtra News Live Updates 02 April 2024
पुणे लोकसभे साठी महायुतीकडून भाजपचे नेते माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवार जाहीर झाली आहे.त्यानंतर हे दोन्ही उमेदवार शहरातील विविध भागातील नेते,नागरिक यांच्या भेटीगाठी घेत आहे.त्याच दरम्यान भाजपचे नेते नारायण राणे हे आज पुणे दौर्यावर होते.त्यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली आणि त्या दोन्ही नेत्यामध्ये बराच काळ चर्चा देखील झाली
त्या भेटी दरम्यान नारायण राणे म्हणाले की,पुण्याला केशवराव जेधे,विठ्ठलराव गाडगीळ,आण्णा जोशी या पुण्याच्या खासदारांनी संसदेत पुण्याच प्रतिनिधित्व केले आहे.त्याची एक विशेष परंपरा राहिली असून मुरलीधर मोहोळ दिल्लीत येऊन ही परंपरा नक्की जोपासतील, तसेच मुरलीधर मोहोळ हे या निवडणुकीत १०० टक्के विजयी होणार आहेत.मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या असून विजयानंतर ते दिल्लीला आमच्या सोबतच असतील,असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा शेतकरी शेती पर्यावरण व समाज उध्वस्त करणार आहे. तो मार्ग केवळ भांडवलदारांच्या विकृत डोक्यातील संकल्पना आहे. महामार्गाचा निर्णय हाणून पाडण्यासाठी, सर्व छोट्या-मोठ्या संघटना गटातटांचे एकत्रीकरण करून पुढील दिशा ठरवण्यासाठी ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार आहे. यास ५९ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.
४ एप्रिल रोजीच्या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.राजू शेट्टी, विधान परिषद गटनेते आ. सतेज पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, डॉ. भारत पाटणकर,माजी आ. संपत बापू पाटील, माजी आ. के पी पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, महादेव धनवडे, एम पी पाटील, गिरीश फोंडे,सम्राट मोरे यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
यवतमाळ : देशात भाजप मित्रपक्षांना ‘वापरा आणि फेका’ या नीतीने वागवत आहे. केंद्रातील महाशक्ती आता तानाशाहीत बदलली आहे. त्यामुळे देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून, महाराष्ट्रातही गद्दारांना घरी बसवून महाविकास आघाडीचे अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना (उबाठा) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केला.
नागपूर: भाजपचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्टातील विदर्भातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. १० एप्रिलला त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली.
पनवेल : सासू व सूनेचा वाद अगदी विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या व पाहिल्या असतील मात्र दोन दिवसांपूर्वी खांदेश्वर पोलीस ठाण्यात एका सूनेने केलेल्या फौजदारी तक्रारीत सासूच्या विकृतपणाचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
चंद्रपूर : शहरातील एक अल्पवयीन मुलगा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादाकडे वळवित असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
सविस्तर वाचा...
स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत, अशी टीका धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघांवर दावा करत महायुतीच्या जागा वाटपात थेट मुख्यमंत्र्यांची कोंडी करू पाहणाऱ्या भाजपावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आता शिंदे सेनेत सुरू झाला आहे. सविस्तर वाचा
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढतीची शक्यता असताना आता वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ २०० गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईला गेले असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर धडकणार आहेत. सविस्तर वाचा
रामटेक लोकसभा मतदार संघात काँग्रेसची कोंडी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रथम त्या पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राची तक्रार केली. त्यात यश आल्यावर आता या पक्षाचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. सविस्तर वाचा
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघातील प्रमूख पक्षाचे उमेदवार घोषित झाले आहेत तर चार लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला उमेदवार ठरविता आलेले नाहीत. सविस्तर वाचा
पुसदचे नाईक घराणे म्हणजे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचा समृद्ध सामाजिक, राजकीय वारसा लाभलेले कुटुंब. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत नाईक घराणे राजकारणात सक्रिय आहे. सविस्तर वाचा
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची मागणी शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस<a href="https://www.loksatta.com/about/ajit-pawar/"> अजित पवार गटाने केलेली नसताना भाजपने अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा केलेली नाही. भाजपसाठी सर्वात कठीण असलेल्या या मतदारसंघात पराभवाचा फटका बसू नये, यासाठी भाजप सावध भूमिकेत असून चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. सविस्तर वाचा
उमेदवारी जाहीर केली असली तरी ती बदलली जाण्याची शक्यता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णवेळ हजेरी लावून एक अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे बोलल्या जात आहे. विदर्भात त्यांच्या पक्षासाठी मिळालेली ही एकमेव जागा ते सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनाच पक्षात घेत त्यांनी उमेदवारी बहाल केली.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग हे दोनदा लोकसभेवर निवडून गेले आणि राज्यमंत्रीही झाले. मात्र ती संधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांना लाभलेली नाही. गेल्या वेळी ते हरले.
मुंबई : उत्तर मध्य मुंबईतील सांताक्रुझ आणि विर्लेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या मालकीची अशी विमानतळाची आणि संरक्षण दलाची मोठ्या प्रमाणावर जागा असून या जागेवरील झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे.
'परिवर्तनाच्या या लढाईची सुरुवात कोल्हापुरातून करू. महाविकास आघाडीच्या पाठीशी जनतेने भक्कमपणे उभे राहून विजयी करावे’, असे आवाहन उमेदवार शाहू छत्रपती यांनी केले.
मुंबई : एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर एचआयव्ही संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये १ एप्रिल २००४ रोजी पहिले एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला २० वर्ष पूर्ण झाली असून, या २० वर्षांमध्ये जे.जे. रुग्णालयामध्ये ४३ हजार ८० रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
पिंपरी- चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला इतर अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रीसिटीकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या मोनोरेल, मेट्रोसाठी टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बनावट मतदार ओळख पत्र तयार करुन शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात धुळे लाचलचुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती.
मेट्रो ६ च्या कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र त्याचवेळी सात हेक्टर जागेची एमएमआरडीएला प्रतीक्षा आहे.
बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह बुलढाणा मतदारसंघातही राजकीय स्थित्यंतराचा नवा नमुना पहायला मिळाला. एकेकाळी एकमेकांविरोधात लढलेले दोन नेते आज एकत्र आले अन् तेही या दोघांपैकी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ३९ आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वर्धा : आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवार हजर झाले. प्रथम शरद पवार यांचे सभास्थळी स्वाध्याय मंदिर येथे आगमन झाले. भाषण आटोपल्यावर ते गर्दीतून वाट काढत निघाले. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना त्यांच्या कारकडे वाट दाखविली. मात्र त्यात बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील संशयितास गुंडाविरोधी पथकाने गोव्यातून अटक केली.