Marathi News Live Update: लोकसभा निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी राजकीय नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यात जातनिहाय जनगणनेचा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे विरोधकांचे जाहीरनामे प्रकाशित होत असलाना सत्ताधारी गटाकडे नाशिकच्या जागेवर अद्याप सर्वमान्य उत्तर सापडलेलं नाही. त्यावरून सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Marathi News Live Today, 25 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननाम्याची घोषणा केली आहे.
म्हैसूर येथील काँग्रेसचे नेते डॉ. शुश्रथ गौडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते म्हैसूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा होती. यानंतर अखेर डॉ. शुश्रथ गौडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
महिला उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल संजय राऊत इतक्या आक्षेपार्ह आणि अर्वाच्च पद्धतीने बोलले की बोलू शकत नाही. त्यांनी फक्त आता शिव्या द्यायचे बाकी ठेवले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर ते बोलले. सविस्तर वाचा…
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी गुरुवारी अर्ज भरण्यापूर्वी सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खडसे यांनी सून नव्हे; मुलगी रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा…
महापालिका क्षेत्रातील खिडुकपाडा या गावामध्ये राहणाऱ्या एका नराधम काकाने आपल्या पुतणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून पोलीसांनी या नराधम काकाला अटक केली आहे. सविस्तर वाचा…
मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन वेगवेगळ्या केलेल्या तपासणी मोहीमेमध्ये दोन वेगवेगळ्या मोटारींमध्ये ३५ लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन प्रवास करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. सविस्तर वाचा…
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. शुक्रवारी लग्नाचा मोठा मुहूर्त आहे. शिवाय तापमानही ४० अंशाच्या वर असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सगळं होऊन शेवटी काय झालं? लहानपणी आम्ही सापशिडी खेळायचो. या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला. पण या खेळात तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय आमचा राहील - विश्वजीत कदम
एकतर्फी उमेदवारी जाहीर कशी झाली? महाविकास आघाडीनं मिळून उमेदवारी जाहीर करायला पाहिजे. पण एकतर्फी निर्णय झाला. आम्ही पोटतिडकीनं ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केले. दीड महिने काय काय करावं लागलं माझं मला माहिती आहे - विश्वजीत कदम
पत्नीनेच आपल्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे.
मुंबई: समाजमाध्यमांवर मैत्री करून एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दीड लाखांची फसवणूक केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबई : ॲन्टॉप हिल येथे एका जुन्या मोटरगाडीत दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.
काँग्रेसनं जाहीरनामा नव्हे, माफीनामा प्रसिद्ध करायला हवा. ५० वर्षांत काय केलं त्यांनी? २०१४ नंतर देशात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांचा छुप्या व अंतर्गत प्रचारावर जोर आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशा अनेक ऑडिओ क्लिप आहेत. एका वेळी मोदींची स्तुती करणं आणि काही वेळात त्यांच्यावर टीका करणं असा हा बेगडी प्रकार आहे. ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. लोकांना काम करणारं सरकार हवंय, घरी बसणारं सरकार नकोय. संविधान बदलणार हा अपप्रचार सुरू आहे. पण संविधान बदललं जाणार नाही - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले.
मुंबई : महिन्याभरापूर्वी मुलुंडमध्ये वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना उल्हासनगर येथून अटक केली.
NVS अंतर्गत देशभरातील ६५० जवाहर नवोदय विद्यालयांत तसेच NVS चे मुख्यालय, ८ रिजनल ऑफिसेस, ७ नवोदय लिडरशिप इन्स्टिट्यूट्समध्ये पुढील नॉन-टिचिंग पदांची भरती.
दोन दिवसांत हा खुराडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.
मुंबई : वडाळा येथील ॲन्टॉप हिल नजीकच्या जय महाराष्ट्र नगरमधील एका किराणा दुकानाला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये स्वयंपाकाच्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पन्नालाल वैश्य (७०) यांचा मृत्यू झाला.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. खरे तर ‘शपथनामा’ नाव देणे हीसुद्धा जनतेची फसवणूकच असून त्यांना या जाहीरनाम्यावर मत मिळणार नाहीत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू परस्परांना जोडणारा बहुप्रतिक्षित तुळई अखेर बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान वरळीत दाखल झाली. प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तुळई वरळीत आणण्याचे काम रखडले होते. मात्र, अखेर ही तुळई वरळीत दाखल झाल्यामुळे सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग मिळणार आहे.
हिंगाेली : विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची कसोटी लागली आहे. शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन गटांमध्येच चुरशीची लढत होणार आहे. मागील चार दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची एक खास परंपराही हिंगाेली मतदारसंघाने यंदाही जपली आहे, हे विशेष !
नागपूर : नागपूरसह देशभरात गेल्या काही महिन्यांपासून सतत सोन्याच्या दरात वाढ होत आहे. बघता बघता सोन्याचे दर विक्रमी स्तरापर्यंत वाढले. परंतू गेल्या दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २० एप्रिलच्या तुलनेत नागपुरात २५ एप्रिलला हे दर सुमारे दोन हजारांनी कमी झाले आहे.
घरफोडीचे १५० हून जास्त गुन्हे दाखल असलेला चोरटा जयवंत उर्फ जयड्या गायकवाडला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात कुणबी मताचे प्राबल्य असले तरी मागासवर्गीय, आदिवासी व मुस्लिमांची मते निर्णायक ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी रात्री भाजपमधून बाहेर पडलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मोटारीवर दगडफेक झाली.
प्रियांका गांधीनी अतिशय योग्य प्रकारे मोदींना प्रत्युत्तर दिलंय. ज्या व्यक्तीला स्वतःच्या बायकोच्या मंगळसूत्राचा आदर राखता आला नाही, ती व्यक्ती इतर महिलाच्या मंगळसूत्राबद्दल खोट्या बाता करतेय. ज्या व्यक्तीने देशातील महिलांवर साठवलेलं सोनं कोरोना काळात विकण्याची वेळ आणली ती व्यक्ती सोन्याबद्दल बोलतेय. अरे किती खोटं बोलाल आणि किती विष पेराल याची काही मर्यादा राहिलेली नाही. पण तुम्ही जे पेराल तेच उगवेल. काळ तुम्हाला याची शिक्षा देईल. मतदार धडा शिकवतील - जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह