Marathi News Live Update: लोकसभा निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी राजकीय नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यात जातनिहाय जनगणनेचा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे विरोधकांचे जाहीरनामे प्रकाशित होत असलाना सत्ताधारी गटाकडे नाशिकच्या जागेवर अद्याप सर्वमान्य उत्तर सापडलेलं नाही. त्यावरून सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Marathi News Live Today, 25 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात जनमत भाजप विरोधात गेले आहे. त्यामुऴे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अलिबाग- रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे दिवंगत नेते बॅरीस्टर ए. आर. अंतुले असल्याचे दिसून येत आहे. महायुती आणि इंडीया आघाडी दोन्हींच्या सभामध्ये अंतुलेच्या नावाचा वापर केला जात आहे. अंतुले यांच्या नावाचे वलय निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे.
पहिल्या टप्प्यात जनमत भाजप विरोधात गेले आहे. त्यामुऴे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुंबई : ‘वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिच्युअल ट्रस्ट’द्वारे मुंबई महानगरपालिकेच्या १२ उद्यानांचा १६ वर्षे गैरवापर केला जात असताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल आहे. त्या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांंनी प्रवास करावा, असे प्रवाशांंचे म्हणणे आहे.
राज्यातील पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या (शुक्रवार) सुरुवात होत असली तरी महायुतीत मतदारसंघाचे वाटपच अंतिम झालेले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत मुंबईतील उमेदवार काँग्रेसने अद्यापही निश्चित केलेले नाहीत.
अमित शाहांनी अमरावतीतच भाषण केलं – २००१ ते २०१३ या काळात अमरावतीत दरवर्षी आत्महत्यांचं प्रमाण १६८ होतं. आता २०१४ ते २०२२ या काळात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण ३५३ आहे. अकोल्यात १०९ होतं, ते १७१ झालं. यवतमाळमध्येही ही परिस्थिती २१४ वरून ३२४ झालं. बुलढाण्यात ११७ वरून २८९ वर आकडा गेला. वाशिममध्ये ८१ वरून १०१ झालं. यावर अमित शाहांचं काय उत्तर आहे? – जयंत पाटील.
संजय राऊत यांच्यासोबत राहिल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संयम ठेवावा, असा मोलाचा सल्ला शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिला आहे.
मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली.
पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
‘आकाशाची सावल’ ही स्वरचित मराठी कविता सादर करून त्यांनी दिदींना आदरांजलीही वाहिली.
मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत तृतीय वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) पाचव्या सत्राची परीक्षा ही ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती.
दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क मैदानात पोलिसांची परेड आयोजित केली जाते.
देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत पुणे देशात नवव्या स्थानी आहे, मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत पुण्याचा पहिला १० विमानतळांमध्येही समावेश नाही.
महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. “देशभरात ३० लाखाच्या आसपास रिक्त जागा आहेत. आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू. महिलांचं शासकीय नोकरीतलं आरक्षण ५० टक्के ठेवण्याचा आग्रह केला जाईल. जीएसटी देशातल्या लोकांना लुबाडण्याचं काम करतोय. त्याला मानवी चेहरा देण्याचं काम आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
आज सकाळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख केला. “शपथपत्रात समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं म्हणणं मांडलं आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून ५०० रुपयांपर्यंत आणल्या जातील. गरज पडली, तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल, जसं पूर्वी यूपीएच्या काळात व्हायचं. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मर्यादेत आणण्याचं काम होईल”, असं म्हणत जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील दोन प्रमुख तरतुदींचा उल्लेख केला आहे.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह