Maharashtra Politics : देशभर सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. सर्व पक्षांकडून प्रचार, रॅल्या, जाहिरात आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रकार चालू आहेत. तसेच उद्या (१९ एप्रिल) लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भात उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे विदर्भातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. तर इतर सहा टप्प्यांमधील मतदानाला अद्याप वेळ आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार चालू आहे. दिवसभर होणाऱ्या प्रचाराच्या आणि उद्या होणाऱ्या मतदानासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 18 April 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

11:54 (IST) 18 Apr 2024
वीज पारेषण मनोरे जनहितासाठी, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मुंबई : वीज पारेषण मनोरे (टॉवर) जनहिताचे असल्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, कांजुरमार्ग येथील महेश गरोडिया यांच्या कथित मालकीच्या जमिनीवरील वीज पारेषण मनोरे हटवण्याचे आदेश देण्यास नकार दिला.

11:52 (IST) 18 Apr 2024
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार

पुणे : शहरात गोळीबारांचे सत्र कायम आहे. नऱ्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.

सवस्तर वाचा…

11:50 (IST) 18 Apr 2024
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला

मुंबई : वाहनतळावर उभी केलेली बस बाहेर काढताना पुतण्याने कोणतीही तपासणी न केल्यामुळे बस खाली चिरडून काकाचा मृत्यू झाल्याची घटना काळाचौकी येथे घडली.

वाचा सविस्तर…

11:50 (IST) 18 Apr 2024
राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास

नाशिक : महायुतीत कुठेही रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप होऊनही सांगलीत बंडखोरी झाली. त्यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात महायुतीत मात्र तसे होणार नाही, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 18 Apr 2024
हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी

ठाणे : कळवा येथील विटावा भागात हाईट बॅरियर तुटल्याने गुरुवारी ठाणे बेलापूर मार्गावरील विटावा ते साकेत मार्गापर्यंत मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत.

वाचा सविस्तर…

11:48 (IST) 18 Apr 2024
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा

ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहाणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. घोडबंदर, दिवा, कळवा आणि मुंब्रा परिसरातील बेकायदा इमारतींचे बांधकामांवर हातोडा मारण्यात आला.

वाचा सविस्तर…

11:31 (IST) 18 Apr 2024
वर्धा : भाच्यासाठी काहीही! अनिल देशमुख यांचे भाजप नेत्यांवर…

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास विरुद्ध आघाडीचे अमर काळे यांच्यातील लढत दिवसेंदिवस रंगतदार व चुरशीची होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हवे नको ते राजकारणाचे डाव फेकण्याचा प्रयत्न उभय बाजूने होत आहे. व्यवस्थापन कुशल भाजप तर उत्साहाच्या लाटेवर आघाडी विजय सोपा करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अमर काळे यांचे मामा असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तळ ठोकून प्रचार कार्याचा आढावा घेतात.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 18 Apr 2024
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 18 Apr 2024
पुण्यात मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार… पण मनसेच्या नेत्यांनी ठेवली ‘ही’ अट

पुणे : महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ताकदीने उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. मात्र, प्रचारात सक्रिय असताना मनसे नेत्यांचा योग्य सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून, भाजपनेही त्याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात मनसेकडून प्रचार केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 18 Apr 2024
नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार

नाशिक: महायुतीत नाशिकची जागा कुणाच्या पदरात पडणार, उमेदवार कोण असणार, याची स्पष्टता गुरुवारी होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेची (शिंदे गट) ही जागा असून ती आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 18 Apr 2024
“पुढच्या वेळी तुम्ही म्हणाल त्याला खासदार करू”, पंकजा मुंडे बीडच्या सभेत असं का म्हणाल्या?

पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. दरम्यान, आज (गुरुवार, १८ एप्रिल) पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचारसभेत मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे नागरिकांना उद्देशून म्हणाल्या, ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून योगदान द्या. मी लोकसभेवर गेल्यावर आपल्या मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन. त्यानंतर पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू. परंतु, जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. यावेळी मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा. ही पाच वर्षे जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत.

11:06 (IST) 18 Apr 2024
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!

मुंबई : खासदार-आमदारांच्या निधीतून लोकोपयोगी कामे करण्यासाठी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातून वितरित केली जाणारी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळविण्यासाठी कंत्राटदार कुठल्याही थराला जात असल्याचे एका प्रकरणातून उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 18 Apr 2024
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !

नागपूर : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई झाली नसल्याने हे कर्मचारी महावितरणमधील विद्युत सहाय्यक पदाचे अर्ज भरण्यास मुकले आहेत.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 18 Apr 2024
‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’ अनपेक्षित दूरध्वनीमुळे मतदार त्रस्त

नागपूर: लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला, आता मतदारांशी थेट दूरध्वनीव्दारे संपर्क साधला जातोय. त्यासाठी मोबाईल फोनचा वापर केला जातो. स्वंयचिलत भ्रमणध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून मतदारांना फोन जातो. फोन घेतला की ‘ हॅलो.. नमस्कार, मी उमेदवार बोलतो’ असा रेकॉर्डेड संदेश मतदारांना ऐकवला जातो.

सविस्तर वाचा…

10:41 (IST) 18 Apr 2024
“ध चा मा करू नका”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण

‘मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा..म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. काल (१७ एप्रिल) ते इंदापूर येथे वकिल आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. यामुळे आज त्यांनी यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार म्हणाले, कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तेथे हजर होते.

“काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं अन् मी…”, अजित पवारांचं वक्तव्य

लोकसभेच्या महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे बारामतीतली पवार कुटुंबातली लढत. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयमधला सामना रंगणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीत बोलताना प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं आणि डोक्यावर हात मारला असं म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले,“जे काही लोक माझ्या विरोधात बोलत आहेत मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांचाही फायदा करुन दिला आहे. कुणालाही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाही. त्यावेळी इतकं फिरावंही लागायचं नाही. आता माझा परिवार सोडून राहिलेला माझा सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतो आहे, बोलतो आहे. पायाला भिंगरी लागल्यासारख्या सभा घेत आहेत. काल-परवा तर प्रतिभाकाकीला प्रचारात उतरवलं मी तर डोक्यावर हात मारला. काकी पण १९९० पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिल्या नाहीत मी पण पाहिल्या नाहीत.”