Mumbai Pune Updates Today, 26 September 2024: बुधवारी संध्याकाळी उशीरा हवामान विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत रेड अलर्ट दिल्यामुळे अनेक भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हा रेड अलर्ट होता. मात्र, पावसानं झोडपल्यामुळे मुंबईकरांना बुधवारी रात्री मनस्तापाचा सामना करावा लागला. रात्री बराच काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. पावसाळा ओसरताच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लवकरच त्यासंदर्भात आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Today, 26 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

19:14 (IST) 26 Sep 2024
अक्षयचा मृतदेह दफन केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, मनसेचा पोलिसांना इशारा लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवा येथे अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करू नये यासाठी कळवा पोलिसांना पत्रव्यवहार केला आहे.

सविस्तर वाचा...

19:13 (IST) 26 Sep 2024

MVA Seat Sharing Formula: जयंत पाटलांनी जागावाटपाबाबत केलं मोठं विधान!

महाविकासआघाडीच्या जागावाटपावर सध्या चर्चा चालू आहे. ३० किंवा १ तारखेला त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर आपल्या वाट्याला ज्या जागा येतील त्यावर आपण उमेदवारांची घोषणा करणार - जयंत पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसमोर मोठं विधान

18:00 (IST) 26 Sep 2024
नागपूर : ‘पोलिसच माझ्या हत्येचा कट रचत आहेत’; न्यायालयातच…

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने थेट पोलिसांवर आरोप करायला सुरुवात केली. मी भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे उघडकीस आणले. सध्या न्यायालयात मी दाखल केलेले ३२ खटले आहेत. सविस्तर वाचा…

17:54 (IST) 26 Sep 2024
ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरु

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा गुरूवारी रोजी प्रवाहित झाला आहे. त्यामुळे किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

वाचा सविस्तर...

17:31 (IST) 26 Sep 2024
भंडारा : दांडेगाव जंगल शिवारात अज्ञात महिलेचा सांगाडा; विविध तर्क वितर्कांना उधाण

भंडारा : साकोली तालुक्यातील दांडेगाव जंगल शिवारात एका विवाहित महिलेचा सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा घातपात, वन्य प्राण्याचा हल्ला की अन्य काय अशा विविध तर्क वितर्कंना उधाण आले आहे.

सविस्तर वाचा....

17:30 (IST) 26 Sep 2024

Jayant Patil NCP: जयंत पाटलांसमोरच अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी!

अहमदनगरमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील यांच्यासमोरच अजित पवारांच्या नावाने काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा भाषण मध्येच थांबवून जयंत पाटील यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. "कोण आहे? हात वर कर... मी भाषणच संपवतो, तुम्ही चर्चा करा", असं जयंत पाटील म्हणाले. नंतर व्यासपीठावरील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर जयंत पाटील पुन्हा भाषणाला उभे राहिले. "असं आहे की असा पोरकटपणा जर तुम्ही करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झाली आहे, मला भाषण करण्यात फार रस नाही. मी वेळ वाचवण्यासाठी लगेच पुढच्या सभेच्या ठिकाणी जातो", असं जयंत पाटील म्हणाले. नंतर कार्यकर्ते शांत झाल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांचं भाषण पूर्ण केलं.

17:29 (IST) 26 Sep 2024
१.४५ टन प्लास्टिक जप्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत सर्व विभागीय कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी तपासणी आणि धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा...

16:56 (IST) 26 Sep 2024
शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा, भरपाई नाकारुन डॉक्टरची महिलेला धमकी

नाशिक : पित्ताशयातील खड्यांच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरने महिलेची रक्तवाहिनी आणि पित्तनलिकेला दुखापत केल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 26 Sep 2024
भोर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयातून देवऋषीचा खून, मृतदेह नदीपात्रात टाकून अपघाताचा बनाव

पुणे : जादूटोण्याच्या संशयातून एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोर तालुक्यातील हातवे खुर्द गावात घडली. खून केल्यानंतर मृतदेह गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपात्रात फेकून देण्यात आला होता.

वाचा सविस्तर...

16:36 (IST) 26 Sep 2024
भाजपशी युती नको पण, त्यांची माणसे चालतात, रायुकाँ प्रदेशाध्यक्षांची विरोधकांवर टीका

नाशिक : विरोधकांना भाजपबरोबर युती केलेली चालत नाही, परंतु त्यांची माणसे चालतात. विरोधक हे फक्त जाती-धर्माचे राजकारण करीत असून राष्ट्रवादी फक्त विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जात आहे. त्यामुळे महायुतीचेच सरकार येणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

येथे घड्याळ युवा संवाद आणि मानवी साखळी अभियानाप्रसंगी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. महायुती सरकारमधील काही जण विरोधी पक्षात प्रवेश करणार असल्याचे तेच सांगतात. म्हणजेच मटण खात नाही पण रस्सा चालतो, या म्हणीप्रमाणे विरोधकांची अवस्था झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

16:36 (IST) 26 Sep 2024

Jitendra Awhad: बदलापूरला मालवणची पुनरावृत्ती?

बदलापूरला मालवणची पुनरावृत्ती? छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी प्रकल्पात घोटाळा..! सगळ्यात कमी देकार (L-1)रू.६३लाख १३ हजार असूनही राज एंटरप्राइजेस, ज्याचा अनुभव २८ वर्षे असून ज्यांनी सुमारे ३०० पुतळे उभारले आहेत त्या शिल्पकाराला डावलले… आणि काम दिले कोणाला दिले? ज्यानं जादा दराने निविदा भरली आहे त्या कराहा स्टूडियोला! निविदा रक्कम(L-2) रु.९५लाख २८ हजार ६००. या शिल्पकाराचे वय आहे सुमारे २८ वर्षे आणि एकही पुतळा उभारणीचा अनुभव नाही. वरचे ३२ लाख १५ हजार ६०० रुपये कोणाच्या घश्यात? - जितेंद्र आव्हाड</p>

https://x.com/Awhadspeaks/status/1839241166539125165

16:26 (IST) 26 Sep 2024
डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डेब्रिजचे,भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, माणकोली उड्डाण पूल भागात खाडी किनारी शहरातील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींचा मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत.

सविस्तर वाचा...

15:55 (IST) 26 Sep 2024
बकरी पालन व्यवसायासाठी माहेरहून २० लाख आणले नाही म्हणून डोंबिवलीत विवाहितेचा छळ

बकरी पालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून २० लाख रूपये आणत नाही म्हणून डोंबिवलीतील एका विवाहितेचा तिच्या सासरच्या सासू, सासरे आणि पती यांनी छळ केला असल्याची तक्रार विवाहितेने रामनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 26 Sep 2024
‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांना ‘पीएफसी’चे अर्थबळ , ३१,६७३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

मुंबई : मुंबईसह मुंबई महानगरातील कोट्यवधींचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कर्जरुपाने निधीची उभारणी करीत आहे. नव्याने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतील निधीपूर्ततेसाठी आता एमएमआरडीएला मे. पॉवर फायनॅन्स कॉर्पोरेशनने (‘पीएफसी’) मदतीचा हात दिला आहे. या वित्तीय संस्थेने एमएमआरडीएला कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१,६७३.७९ कोटी रुपयांचे कर्ज ‘पीएफसी’ने मंजूर केले आहे. पीएफसी आणि एमएमआरडीएमध्ये बुधवारी करार करण्यात आला. या कर्जाच्या माध्यमातून ठाण्यातील नऊ महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावणे आता एमएमआरडीएला सोपे होणार आहे.

15:52 (IST) 26 Sep 2024
House Wall Collapse In Bhandup : भांडुपमध्ये घराची भिंत कोसळून तिघे जखमी

भांडुप (प.) येथील तुळशीपाडा परिसरातील गायत्री विद्या मंदिरनजिकच्या चाळीतील एका घराची भिंत बुधवारी रात्री कोसळली. या दुर्घटनेत दोन महिलांसह तिघे जखमी झाले. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. सविस्तर वाचा…

15:50 (IST) 26 Sep 2024
पत्राचाळीत म्हाडाची ७२ दुकाने; ई-लिलावाद्वारे विक्री होणाऱ्या दुकानांच्या बांधकामाला सुरुवात

मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअतंर्गत उभारण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतींच्या तळमजल्यावर दुकाने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंडळाने ७२ दुकानांच्या बांधकामाला नुकतीच सुरुवात केली.

सविस्तर वाचा…

15:49 (IST) 26 Sep 2024
Medha Somaiya Defamation Case : संजय राऊत यांना न्यायालयाचा अंशत: दिलासा, 30 दिवसांसाठी….

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. सविस्तर वाचा…

15:49 (IST) 26 Sep 2024
मुंबई : चाकूने हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना १२ तासांत अटक

वर्सोवा येथे रिक्षाचालकावर चाकूने हल्ला करून त्याला लुटणाऱ्या टोळीला १२ तासांमध्ये अटक करणाऱ्या पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी अशा प्रकार आणखी गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. सविस्तर वाचा…

15:27 (IST) 26 Sep 2024
धुळे: मसाल्यांमध्ये ही भेसळ करुन लोकांच्या आरोग्याशी खेळ

धुळे: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा घालून खाद्य मसाल्यांमध्ये हानिकारक रंग आणि रसायन भेसळ करणारी साखळी उघडकीस आणली.

सविस्तर वाचा...

15:15 (IST) 26 Sep 2024

Sanjay Raut Convicted: संजय राऊतांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी न्यायालयाने संजय राऊत यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. तसेच, राऊत यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे, राऊत यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1839239003322593327

14:48 (IST) 26 Sep 2024
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात

र्धा : समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथील पुलावरून प्रवास करीत असताना पाण्याच्या प्रवाहाने दुचाकी वाहनावरून प्रवास करणारे दोघे नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू असताना लालनाला प्रकल्पात आज त्या दोघांसोबत आणखी एकाचा मृतदेह आढळून आला.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 26 Sep 2024
ऑनलाईन शेअर्स खरेदी : चंद्रपूरच्या उच्चशिक्षित महिलेची ७४.५० लाखांनी फसवणूक

चंद्रपूर: चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) चे महाव्यवस्थापक अविनाश बोडेले यांच्या पत्नी जया बोडेले यांची ऑनलाईन शेअर खरेदी प्रकरणात ७४.५० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा....

14:18 (IST) 26 Sep 2024
नवी मुंबई : वरच्या मजल्यांवरील घरे महाग? सिडको महागृहनिर्माण सोडतीमधील अंतिम धोरण लवकरच, खासगी विकासकांप्रमाणे निर्णय

नवी मुंबई : नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत २५ हजार घरांच्या महागृहनिर्माणाची सोडत २ ऑक्टोबरला सिडको महामंडळ काढणार आहे.

सविस्तर वाचा...

13:51 (IST) 26 Sep 2024
आमचे पैसे परत द्या! वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी

मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एका वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, तर अतिरिक्त रेक उपलब्ध नसल्याने वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसी लोकलच्या सुमारे १० फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. सविस्तर वाचा…

13:50 (IST) 26 Sep 2024
धक्कादायक... ८ महिन्यांत नागपुरातून १३०० वर महिला बेपत्ता; प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधांतून पलायन...

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील महिला-तरुणींचे पलायन किंवा बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरातून १ हजार ३०० पेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या. तब्बल १४८ महिलांचा अद्यापही थांगपत्ताही लागला नाही.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 26 Sep 2024
नवी मुंबई :माथाडी मंडळातील बनावट संघटनांच्या गुंडगिरीला चाप लावा,माथाडी संघटनेचे नरेंद्र पाटील यांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर

नवी मुंबई : माथाडी संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी फळ बाजारात बांगलादेशी नागरिक काम करत असून आता वादही होत आहेत.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 26 Sep 2024
नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार या माथाडी कामगारांच्या शिखर संघटनेमार्फत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या माथाडी मेळाव्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी फिरवलेली पाठ

सविस्तर वाचा...

13:13 (IST) 26 Sep 2024
सासू, पत्नीसह चौघांच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

सोलापूर : पत्नी नांदण्यासाठी सासरी परत येत नाही, सासूनेही उद्धार केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या जावयाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. याप्रकरणी सासू व पत्नीसह तिची सख्खी बहीण असलेली भावजय आणि विवाह जुळविणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे ही घटना घडली.

वाचा सविस्तर...

12:58 (IST) 26 Sep 2024

Jitendra Awhad on CM Eknath Shinde: ...तर तुम्हाला कळवा-मुब्र्याचा अभिमान वाटेल - जितेंद्र आव्हाड

'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र खड्डे विरहीत करणार. खड्डे विरहितचे उदाहरण पहायचं असेल तर मी त्यांना माझ्या कळवा-मुंब्र्यात यायचं नम्र निमंत्रण देतो. ह्या सरकारनी मुद्दाम सूड बुद्धीपोटी १ रुपया सुद्धा निधी दिला नाही तरी माझा कळवा-मुंब्रा खड्डे विरहित आहे. मुख्यमंत्री दिलदार आहेत पण माझ्या बाबतीत हा दुजाभाव का? हे कळले नाही. २-४ वेळा जाऊन आलो पण 'करतो' ह्या शिवाय काहीच नाही. तरी पण कळवा मुंब्र्याचे रस्ते अतिशय उत्तम आहेत. थोडा निधी द्या तुम्हाला अभिमान वाटेल कळवा मुंब्र्याचा!

https://twitter.com/Awhadspeaks/status/1839158911582019947

12:54 (IST) 26 Sep 2024
Sanjay Raut Convicted: संजय राऊत दोषी, 'ही' सुनावली शिक्षा

मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेसंदर्भात ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना मुंबई कोर्टानं दोषी मानून शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार १५ दिवसांचा कारावास सुनावण्यात आला आहे.

https://x.com/LiveLawIndia/status/1839200654566269132

Maharashtra News Live Update in Marathi

मोदींचा आज मुंबई दौरा

Maharashtra News Today, 26 September 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर