Mumbai Pune Updates Today, 26 September 2024: बुधवारी संध्याकाळी उशीरा हवामान विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत रेड अलर्ट दिल्यामुळे अनेक भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हा रेड अलर्ट होता. मात्र, पावसानं झोडपल्यामुळे मुंबईकरांना बुधवारी रात्री मनस्तापाचा सामना करावा लागला. रात्री बराच काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. पावसाळा ओसरताच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लवकरच त्यासंदर्भात आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today, 26 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
PM Modi Pune Maharashtra Visit Cancelled due to Heavy Rain : पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण,तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार होता.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली.
नागपूर : राम झुला अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बुधवारी मध्यरात्री उशिरा तिच्या वर्धमान नगर येथील देशपांडे लेआउट येथील निवासस्थानातून अटक केली.
मुंबई : जंगली रमी आणि रमी सर्कल हा ऑनलाइन गेमिंग खेळ नशिबाचा की कौशल्याचा भाग आहे ? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि संबंधित गेमिंग ॲपला दिले.
नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावाॅटच्या दोन नवीन संच उभारणीला पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पावरून सरकार आणि पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास चारोटी नजीक रसायन वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये टँकर मधून रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
सांगली : खानापूर, तासगाव, आटपाडी तालुक्यातील ५४ गावांची सिंचनाची भूक भागविण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विस्तारित टेंभू प्रकल्पाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे तरुण नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. या वेळी जिल्हा बँकेेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील उपस्थित होते.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यामधून खानापूर व तासगाव तालुक्यातील गावांना, तर कामथ वितरिकेमधून आटपाडी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना आणि सातारा जिल्ह्यातील माण-खटाव वितरिका आटपाडी पश्चिम भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे.
PM Narendra Modi’ Pune Visit Cancelled due to Heavy Rain: मोदींचा कार्यक्रमासाठी पुण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले होते, पण आता…
सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, टिळक रस्त्यावरील पूरम चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. वाहनचालकांनी सिंहगड रस्त्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे असं आवाहन करण्यात आलं होतं. मित्रमंडळ चौकातून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून डावीकडे वळून सिंहगड रस्ता चौकातून इच्छितस्थळी जावे असं सांगण्यात आलं होतं. देशभक्त केशवराव जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचंही सांगितलं होतं. जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी जेधे चैाकातून डावीकडे वळून शंकरशेठ रस्त्याने सेव्हन लव्हज चौकात यावे असं पुणेकरांना स्पष्ट केलं होतं. गुलटेकडी, वखार महामंडळ चौक, मार्केट यार्डमार्गे सातारा रस्त्याकडे येण्याबाबतही नमूद करण्यात आलं होतं. शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातून जेधे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. या भागातील वाहनचालकांनी गुलटेकडी, मार्केट यार्डमार्गे इच्छितस्थळी जावे, असाही पर्याय देण्यात आला होता.
पण आता मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे हे बदल लागू नसण्याची शक्यता आहे.
PM Narendra Modi's visit to Pune, Maharashtra cancelled due to the heavy rain situation in the city.
— ANI (@ANI) September 26, 2024
(File photo) pic.twitter.com/VJlrBepmzM
PM Narendra Modi’ Pune Visit Cancelled due to Heavy Rain: मोदींचा कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी…
मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. तसेच आज सकाळपासून शहरातील अनेक भागात पावसाने सुरुवात केली आहे. आज पुणे शहरासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यावर मोदींचा पुणे दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे.

कोकणात माकडांनी मोठा उच्छाद मांडला आहे. या माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतक-यांने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणार आहे.
PM Narendra Modi Pune Visit Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द
पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार होतं. मात्र, त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. शहरात कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं एएनआयनं आपल्या सोशल पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते येक नंबर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा पार पडला, यावेळी केलेल्या छोट्या भाषणात राज ठाकरेंनी खास किस्सा सांगितला.
PM Narendra Modi Pune Visit Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून यादरम्यान काही विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
Mumbai Rain Live Updates: मध्य रेल्वेवर आज काय परिस्थिती?
मध्य रेल्वेवर आज सर्व लोकल गाड्या नियोजित वेळेनुसार धावत असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
#CRUpdates at 8.30 am on 26.09.2024.
— Central Railway (@Central_Railway) September 26, 2024
Local trains on all corridors of the Mumbai Suburban network of Central Railway are running normally.
Maharashtra News Today, 26 September 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर