Today’s Latest News Updates : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली आहे. यावरही राजकीय विधान करण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रेने आज ( २४ जानेवारी ) जम्मू-काश्मीरमधील नागरोटा येथून आपला प्रवास सुरु केला आहे. ही यात्रा रात्री डोमेल चौक येथे जाऊन थांबणार आहे. यासह देश, विदेश आणि महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घ्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…

Live Updates

Maharashtra Live Updates : देश, विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर….

11:57 (IST) 24 Jan 2023
कात्रज उद्यानातील फुलराणी रुळावर, “एकदा ठरविले ना की मी…!” असे म्हणत वसंत मोरेंचा विरोधकांना चिमटा

राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेत फुलराणी नव्या दमात रूळावर आणली आहे.

सविस्तर वाचा

11:37 (IST) 24 Jan 2023
घराची ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्या, बाळकुम प्रकल्पातील विजेत्यांची म्हाडा कोकण मंडळाकडे मागणी

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या बाळकुम प्रकल्पातील वाहनतळाच्या इमारतीचे काम संथगतीने सुरू असून या प्रकल्पातील १९४ घरांना मार्चपर्यंत निवासी दाखला मिळणे अशक्य आहे. त्यामुळे घराची ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बाळकुममधील १९४ पात्र विजेते / लाभार्थ्यांनी कोकण मंडळाकडे केली आहे.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 24 Jan 2023
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेनेने विरोध केला – देवेंद्र फडणवीस
  • समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाडा विदर्भात वळवणार
  • सत्तांतरात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा
  • मराठवाडा ग्रीड प्रकल्पाला महाविकास आघाडीने तिलांजली दिली
  • मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेनेने विरोध केला
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते.

    11:03 (IST) 24 Jan 2023
    “उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली”; मनपाच्या ठेवींवरून आशिष शेलारांचं टीकास्त्र; म्हणाले, “आमचे बापजादे…”

    मुंबई दौऱ्यावर असताना बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. यावरून मुंबई महापालिकेचे हजारो कोटींच्या ठेवी या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ठेवता आल्या आहेत, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान मोदी यांना दिलं. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

    10:41 (IST) 24 Jan 2023
    शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचा सुकाणू समितीकडून आढावा सुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिली बैठक

    आर. डी. कुलकर्णी समितीच्या अहवालानुसार राज्यातील प्रत्येक विद्यापीठात शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत काय कार्यवाही झाली, विद्यापीठांच्या अडचणी आहेत, अंमलबजावणी समितीची स्थापना, समितीचे कामकाज या अनुषंगाने बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

    सविस्तर वाचा

    10:40 (IST) 24 Jan 2023
    कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसाठी १७२० ईव्हीएम दाखल

    कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून पूर्व तयारी सुरू आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाला १७२० मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन – ईव्हीएम) प्राप्त झाली असून या यंत्रांच्या प्राथमिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

    सविस्तर वाचा

    10:36 (IST) 24 Jan 2023
    पुण्यात हुक्का पार्लरवर छापे, कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्त्यावर कारवाई

    शहरातील बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापे टाकले. बंडगार्डन रस्त्यावरील राजा बहाद्दुर मिल परिसर तसेच कोरेगाव पार्क भागातील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला.

    सविस्तर वाचा

    10:34 (IST) 24 Jan 2023
    पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल

    शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पूल उभारण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून सल्लागाराच्या अहवालानंतर कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

    सविस्तर वाचा

    10:31 (IST) 24 Jan 2023
    पुणे : बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी शुक्रवारी संपावर

    अधिकारी, कर्मचारी भरती करावी, पाच दिवस काम, नव्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, निवृत्तिवेतन योजना अद्ययावत करावी अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (२७ जानेवारी) संपाची हाक दिली आहे.

    सविस्तर वाचा

    10:31 (IST) 24 Jan 2023
    ठाणे : मीनाताई उड्डाणपूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू

    ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. प्रतिक मोरे (२१) आणि राजेश गुप्ता (२६) अशी मृतांची नावे आहेत.

    सविस्तर वाचा

    10:28 (IST) 24 Jan 2023
    भीमा केसरी कुस्ती स्पर्धा : उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख कुस्तीच्या मैदानात

    खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर कुस्तांचं आयोजन करण्यात आलं आहे. भीमा केसरी स्पर्धेसाठी उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, पैलवान सिकंदर शेख यांच्यासह अन्य राज्यातील पहिलवान कुस्तीच्या फडात उतरणार आहेत.

    10:24 (IST) 24 Jan 2023
    हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं स्क्रीनिंग; प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश

    ‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या माहितीपटावरून देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली असली तरीही हैदाराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचं स्क्रीनिंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

    वाचा सविस्तर…

    महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…