Maharashtra Breaking News Today, 17 October 2023: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांसह अजित पवार व सुप्रिया सुळेंवर टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातील लांडगा कोण आहे? हे सगळ्यांना माहीत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या विधानावर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानाच्या अपडेट्ससह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात…

Live Updates

Mumbai News in Marathi: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर..

17:28 (IST) 17 Oct 2023
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून ३ ऑक्टोबर २०२३ रोजी केली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील मुदत सकाळी ११ ते दुपारी ३ ऐवजी आता सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान ५ नोव्हेंबर रोजी होईल.

17:16 (IST) 17 Oct 2023
बुलढाणा: ना ‘सन्मान’ ना ‘हफ्ता’! शेतकऱ्यांचे खडकपूर्णामध्ये अर्धनग्न आंदोलन

वारंवार गाजावाजा  करीत असलेल्या पंतप्रधान शेतकरी सम्मान योजनेचा लाभ तब्बल एक वर्षापासून मिळाला नाही! अर्ज केले, विनवण्या केल्या, मात्र ना सन्मान ना हफ्ता मिळाला. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी खडकपूर्णा धरणात आज अर्धनग्न ठिय्या आंदोलन सुरू केले.

सविस्तर वाचा…

17:03 (IST) 17 Oct 2023
संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते - शिवसेना राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

आपसात भांडणे लावून संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. सविस्तर वाचा…

16:37 (IST) 17 Oct 2023
शवागारामुळे पनवेल शहरात दुर्गंधी

पनवेल: दुर्गाष्टमीचा उत्सव पनवेल परिसरात सर्वत्र सूरु असताना महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरुपनकार नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील शवागारामधील दर्पामुळे पनवेलचे रहिवाशी हैराण झाले आहेत. ही दुर्गंधी असह्य करणारी आहे.

सविस्तर वाचा...

16:37 (IST) 17 Oct 2023
"बालेकिल्ला कुठल्या एका नेत्याचा नसतो", रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी शड्डू ठोकला आहे. बालेकिल्ला हा एकट्याचा नसतो, तो नागरिकांचा असतो. शहरातील नागरिकांचे प्रेम जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सविस्तर वाचा

16:20 (IST) 17 Oct 2023
जागा मिळवण्यासाठी दोन दिवस आधीच भाविक सभामंडपात! कोण आहे पंडित प्रदीप मिश्रा?

८० एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून दोन ते अडीच लाख लोक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

16:19 (IST) 17 Oct 2023
बारामतीतून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा; रोहित पवार म्हणाले, ‘चर्चेला महत्व द्यायचे…’

गडकरी वगळता भाजपच्या उमेदवाराचा पराभव होईल अशी तिथे चर्चा असल्याचे आमदार पवार म्हणाले.

सविस्तर वाचा...

16:04 (IST) 17 Oct 2023
भंडारा : संतप्त प्रवाशांचा बस स्थानकासमोर राडा, तब्बल तासभर बसेस स्थानकावर अडविल्या

भंडारा : एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांचे नियोजन बस स्थानक प्रशासनाकडून व्यवस्थित करण्यात येत नसून बस स्थानक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दररोज प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. आज सकाळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली ज्यामुळे प्रवाशांची ऐन वेळी गैरसोय झाली. बस स्थानक प्रशासनाने त्यांची पर्यायी सोय किंवा प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी हात वर केले.

सविस्तर वाचा...

16:03 (IST) 17 Oct 2023
ऑक्टोबरच्या उन्हात अंगाची काहिली शमविणारे ताडगोळे उरणच्या बाजारात; आगमनाला दर चढे

उरण: ऑक्टोबर मधील कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. ती शमविण्यासाठी उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. मात्र ताडगोळ्यांच्या आगमनाची सुरुवात असल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे १२० डझनावर पोहचली आहे.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 17 Oct 2023
अंमली पदार्थ कारखान्याला कोणाचे राजकीय आशीर्वाद ? पाळेमुळे खोदून काढण्यासाठी ठाकरे गट आग्रही

अंमली पदार्थांच्या तस्करीला सत्ताधारी पक्षातील मंत्री जबाबदार असल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने २० ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा…

16:02 (IST) 17 Oct 2023
उरणमध्ये शारदोत्सवात गावदेवींचा जागर तर घरोघरी पारंपरिक घटस्थापना

उरण: नवरात्रोत्सवात उरण परिसरातील गावोगावी असलेल्या देवींच्या मंदीरात जागर सुरू झाला आहे. तर अनेक ठिकाणी घटस्थापना केली आहे. तालुक्यात पुरातन काळातील करंजा येथील द्रोणागिरी देवी, उरण शहरातील शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील एकविरा देवी आणि नवीन शेवा गावची शांतेश्वरी, डोंगरीची आंबादेवी जसखार ची रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 17 Oct 2023
नुकसानीमुळे नागपूरकर हताश आणि ‘विकास पुरुष’ गडकरी !

नागपूर: २२ हजाराहून अधिक कुटुंबांना बाधित करणाऱ्या नागपूरच्या महापुराचे महत्व, शासनाच्या लेखी फक्त सानुग्रह अनुदान वाटप करण्या ऐवढेच असले तरी पुरात सर्वस्व वाहून गेलेल्या हजारो पूरबाधितांच्या हालअपेष्टा अद्याप कायम आहे. सविस्तर वाचा…

15:59 (IST) 17 Oct 2023
अकोल्यातील मोर्णा, विद्रूपा नदीच्या पूरनियंत्रण रेषेला स्थगिती

शहरातून वाहणाऱ्या मोर्णा, विद्रूपा नदी काठी अन्यायकारक पद्धतीने आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूरनियंत्रण रेषेला स्थगिती देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सविस्तर वाचा…

15:57 (IST) 17 Oct 2023
ठाणे, डोंबिवलीत मनसेची चहूबाजूंनी कोंडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यातील महायुती सरकारमधील प्रमुख नेत्यांचा वरचेवर संवाद होताना नेहमीच दिसतो. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे येताच राज यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमीत्त वर्षा निवासस्थानी जाणेही वाढले.

सविस्तर वाचा

15:52 (IST) 17 Oct 2023
चंद्रपूर : गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने प्रभावी संरक्षण व संवर्धन करा, राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वनमंत्री मुनगंटीवारांचे निर्देश

चंद्रपूर: राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे या दृष्टीने बीएनएचएस या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी तसेच जंगली म्हैस आणि लांडगा यांचेही संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा असे निर्देश राज्य वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 17 Oct 2023
उरणमधील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, उपाययोजना कागदावरच

उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक, पेन्शनर्स पार्क (वैष्णवी हॉटेल) वळणावर नागरिक आणि विद्यार्थ्यांना भर दुपारी कडक उन्हात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी उरण नगर परिषद व उरण वाहतूक विभाग यांनी मागील वर्षी बैठकही घेतली होती. आणि काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा एकदा या कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाचा सविस्तर...

15:34 (IST) 17 Oct 2023
धुळे न्यायालयीन लिलावातून प्राप्त दागिने एकविरा देवीला अर्पण

जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे झालेल्या लिलाव प्रक्रियेतून मिळालेले ३० तोळे सोने आणि चांदीचे दागिने मंगळवारी विश्वस्तांच्या उपस्थितीत येथील कुलस्वामिनी श्री एकविरा देवीला अर्पण करण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 17 Oct 2023
बंजारा समाजाला खुश करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर

मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघात आणि राज्यातल्या किमान साठ विधानसभा मतदारसंघात निर्णायक असलेल्या बंजारा समाजाने एका मेळाव्याद्वारे आपल्या प्रमुख मागण्यांचा उच्चार गंगाखेड येथे केला.

सविस्तर वाचा

14:55 (IST) 17 Oct 2023
चंद्रपूर : सरपंचाचा मनमानी कारभार, ग्रामस्थांनी कोलारा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप; बरखास्तीची मागणी

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील चिमूर तालुक्यातील कोलारा (तुकूम) गावातील नागरिकांनी सरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. रात्रीपासून ग्रामपंचायत कुलूपबंद असून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 17 Oct 2023
सरन्यायाधीशांचे सॉलिसिटर जनरल यांना निर्देश

मागच्या सुनावणीत आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला वेळापत्रक दिले नाही, तर आम्ही वेळापत्रक निश्चित करण्याचा आदेश देऊ. आम्ही तसं करण्यासाठी सकारात्मक आहोत. जोपर्यंत तुम्ही कोर्टाला आश्वासन देत नाही, तोपर्यंत तुम्हाला विधानसभा अध्यक्षांबरोबर बसून वेळापत्रक तयार करून घ्यावं लागेल. - सरन्यायाधीश

https://twitter.com/LiveLawIndia/status/1714202723846152537

14:45 (IST) 17 Oct 2023
‘ससून’मधील कैदी रुग्णांची सगळी ‘प्रकरणे’ बाहेर येणार; चौकशी समितीने हजार रुग्णांचे अहवाल मागविले

समितीने २०२० सालापासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाचे अहवाल मागविले आहेत.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 17 Oct 2023
भाजपाच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच, बावनकुळे यांच्या समोर कार्यकर्त्यांची मन की बात

२०२४ मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय, असा प्रश्न विचारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी एखमुखी घेतले. सविस्तर वाचा

14:42 (IST) 17 Oct 2023
३० ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक सादर करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सुनावणीच्या वेळापत्रकावर आम्ही समाधानी नाही. त्यामुळे दसऱ्यांच्या सुट्ट्यादरम्यान सॉलिसिटर जनरल हे विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात राहतील, जेणेकरून एक निश्चित वेळापत्रक तयार केलं जाईल. आता आम्ही अंतिम संधी देत आहोत. विधानसभा अध्यक्षांनी ३० ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात नवीन वेळापत्रक सादर करावं.- सर्वोच्च न्यायालय

https://twitter.com/LiveLawIndia/status/1714205035704557633

14:39 (IST) 17 Oct 2023
सशक्त युवापिढीसाठी ‘नशामुक्त पहाट’, यवतमाळ पोलिसांचा उपक्रम

तरुण पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे.

सविस्तर वाचा...

14:38 (IST) 17 Oct 2023
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ पदभरतीत स्थानिकांवर अन्याय, शैक्षणिक कागदपत्रांमध्ये त्रुटी असतानाही विदर्भाबाहेरील उमेदवारांच्या निवडीचा आरोप

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने ३० जागांकरिता पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत स्थानिक आणि विदर्भातील उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक उमेदवारांना डावलून विदर्भ व राज्याबाहेरील उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रामध्ये त्रुटी असतानाही निवड करण्यात आल्याने भरतीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:36 (IST) 17 Oct 2023
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावलं

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीस विलंब लावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. लवकरत लवकर वेळपत्रक जाहीर करा अथवा आम्ही आदेश देऊ अशा शब्दांत न्यायालयाने खडसावलं आहे.

14:29 (IST) 17 Oct 2023
ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईतून जोड मार्गिका; ५० कोटींचे कंत्राट बहाल, लवकरच कामाला सुरुवात

नवी मुंबई: मुंबईतून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरांच्या दिशेने ये-जा करण्यासाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत आखण्यात आलेल्या बहुचर्चित ऐरोली-काटई मार्गावरून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या जोड मार्गिकेचा विषय अखेर निकाली निघाला आहे.

सविस्तर वाचा...

14:26 (IST) 17 Oct 2023
शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठीच शाळा दत्तक योजना; खासगीकरणाचा संबंध नसल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

केवळ शाळांमधील पायाभूत, शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठीच घेतलेला असून त्यात खासगीकरणाचा काहीही संबंध नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 17 Oct 2023
पुण्यात सातबारा उताऱ्यांत बदल करून जमिनी हडप; राज्य सरकारने दिले ‘हे’ आदेश

मूळ सातबारा आणि संगणकीकृत करण्यात आलेला सातबारा उतारा यांमध्ये अनेक ठिकाणी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 17 Oct 2023
कोल्हापूर : वकील रणजीतसिंह घाटगे याची सनद रद्द, १४ लाख दंड देण्याचाही हुकूम

कोल्हापूर : येथील वकील रणजितसिंह घाटगे यांची वकिलीची सनद पाच वर्षांसाठी काढून घेण्याचा निर्णय भारतीय वकील परिषदेच्या शिस्तपालन समितीने घेतला आहे. त्यामुळे रणजीतसिंह घाटगे वकील म्हणून पुढील पाच वर्षांसाठी कोणत्याही न्यायालयात काम करू शकणार नाही.

सविस्तर वाचा...

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे... अशा शब्दांत पडळकरांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

Story img Loader