Maharashtra Breaking News Today, 17 October 2023: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांसह अजित पवार व सुप्रिया सुळेंवर टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातील लांडगा कोण आहे? हे सगळ्यांना माहीत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या विधानावर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानाच्या अपडेट्ससह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात…

Live Updates

Mumbai News in Marathi: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर..

13:57 (IST) 17 Oct 2023
बुलढाणा : काय सांगू भाऊ, मजुरीचे दर वाढले, पण मजूरच मिळेना! हजारो सोयाबीन उत्पादकांची दैना

बुलढाणा : चोहोबाजूंनी समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांना यंदा पारावर उरला नाहीये. सोंगणीसाठी चढ्या दराने मजुरी देण्याची तयारी असतानाही मजूर मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 17 Oct 2023
पुण्यातील चार दस्त नोंदणी कार्यालये कात टाकणार

राज्य सरकारला वर्षाला ४० हजार कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाची दस्त नोंदणी कार्यालये बकाल आहेत.

सविस्तर वाचा…

13:51 (IST) 17 Oct 2023
उत्तरेकडील राज्यात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र उन्हाचे चटके

नागपूर : महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला. परतीच्या पावसाच्या सरीदेखील राज्याची वेस ओलांडत आहे. मात्र उन्हाचा दाह चांगलाच वाढला आहे. एकीकडे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली असताना महाराष्ट्रात उन्हाचे चटके बसत आहेत.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 17 Oct 2023
निसर्गदत्त नियमांचे पालन करतो तो हिंदू – शरद पोक्षे

वर्धा : येथील बजाज वाचनालयात कुंदा ठोंबरे स्मृती कार्यक्रमात अभिनेते शरद पोक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 17 Oct 2023
नागपूर : भारतीय दागिने विक्री महोत्सव सराफा व्यवसायाला देणार बळ, ३०० शहरांतील ३ हजार किरकोळ विक्रेत्यांचा सहभाग

नागपूर : ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलतर्फे (जीजेसी) देशातील ३०० शहरांमध्ये ३ हजार किरकोळ सराफा व्यावसायिकांना बरोबर घेत भारतीय दागिने विक्री महोत्सव (आयजेएसएफ) सुरू करण्यात आला आहे. त्यात १.२० लाख कोटींच्या व्यवसायाचा अंदाज ‘जीजेसी’तर्फे व्यक्त केला गेला.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 17 Oct 2023
बाणगंगा तलाव परिसरातील अकराव्या शतकातील रामकुंडाचा शोध लावण्यात यश

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव  पुनरुज्जजीवित करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. अकराव्या शतकातील रामकुंड पुनरुज्जीवित करणे आणि त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

सविस्तर वाचा

13:29 (IST) 17 Oct 2023
“…तर पुढील कारवाई कशी काय होऊ शकते”, सुनावणीआधी राहुल नार्वेकरांचं विधान

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, “आपल्या सर्वांना माहीत आहे की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. काही वेळातच यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय आहे? हे सर्वोच्च न्यायालयात मांडली जाईल. सर्वप्रथम आपल्याला नेमकं घटनाबाह्य कृत्य काय झालंय? ते आपल्याला समजलं नाही तर पुढील कारवाई कशी काय होई शकते? त्यामुळे सुनावणीनंतर याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल.”

13:01 (IST) 17 Oct 2023
“गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, काय म्हणाले फडणवीस?

नागपूर : गडकरी यांचे व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध अभिनेता राजकपूरसारखे आहे. राज कपूर कधी छोटे स्वप्न बघत नव्हते. गडकरीसुद्धा छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात. त्यांच्यावरील चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहोचतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 17 Oct 2023
आधार कार्ड सेवेत पुणे टपाल विभाग प्रथम, सहा वर्षांत १० लाख ७४ हजार आधारकार्ड अद्ययावत

पुण्यामध्ये आधार कार्ड नोंदणीसाठी २४६ केंद्रे कार्यरत आहेत. गेल्या सहा वर्षांत पोस्टाने १० लाख ७४ हजार ८६१ कार्ड अद्ययावत (अपडेट) करून दिली आहेत.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 17 Oct 2023
खासगी जागेत मोबाइल मनोरे उभारणाऱ्या कंपन्यांना नोटीस… ‘ही’ होणार कारवाई

हे मनोरे उभारणाऱ्या कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांत बुडविलेले मुद्रांक शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 17 Oct 2023
नागपूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजेवर कारागृहातून सुटला अन् फरार झाला, पण…

नागपूर : कोविड काळामध्ये ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेला खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी फरार झाला होता. दरम्यान नुकतेच लकडगंज पोलिसांनी त्याला छत्तीसगड येथून अटक करून पुन्हा कारागृहात दाखल केले.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 17 Oct 2023
नागपूर : कारने भरधाव जाताना टोकल्याने केले तिघांचे अपहरण, कुख्यात सुमित ठाकूरवर गुन्हा दाखल

नागपूर : कारने भरधाव जाताना तीन युवकांनी हटकल्यामुळे चिडलेल्या सुमित ठाकूरने पिस्तुलाच्या धाकावर तिघांचेही कारने अपहरण केले. त्यांना गोदामात कोंडून मारहाण करीत लुटमार केली. त्या युवकांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी सुमित ठाकूरसह त्याच्या सहा साथिदारांवर गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 17 Oct 2023
गोंदिया : बेरडीपार आरोग्यवर्धिनी केंद्र शोभेची वास्तू; पाणी, पक्का रस्ता अन् मनुष्यबळाअभावी लोकार्पणाला मुहूर्तच मिळेना

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे गेल्या दोन वर्षांपासून आरोग्यवर्धिनी केंद्राची सुसज्ज इमारत उभी आहे. परंतु, अजूनपर्यंत आरोग्य केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे किती दिवस शोभेची वास्तूच म्हणून ही इमारत उभी राहील? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 17 Oct 2023
अत्याचार पीडितेचे छायाचित्र व्हायरल करणे पडले महागात, महिला डॉक्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

यवतमाळ : उमरखेड येथे एका बालिकेवर सराईत गुन्हेगाराने अत्याचार केला. दरम्यान भाजपाशी संबंधित डॉ. सायली शिंदे यांनी प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी पीडित बालिकेच्या सांत्वनपर भेटीचे छायाचित्र व चित्रफीत समाजमाध्यमांत सार्वत्रिक केली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने शिंदे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 17 Oct 2023
‘आपला दवाखाना’ लाभार्थींची संख्या २३ लाखांवर; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू होऊन वर्ष झाले असून या वर्षभरामध्ये आपला दवाखानाच्या माध्यमातून तब्बल २३ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:35 (IST) 17 Oct 2023
पुण्यात तरुणाईला ’मेफेड्रोन’चा विळखा…अशी होते तस्करी

आयटी सिटी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात परराज्यांतील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 17 Oct 2023
सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २० स्वातंत्रसैनिक, नऊ शहिदांची कुटुंबे आणि सुमारे १५०० आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 17 Oct 2023
पिंपरी महापालिकेत बढत्यांचा धमाका, एकाच दिवशी ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांना बढत्या

महापालिकेतून दर महिन्याला २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्ती होतात.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 17 Oct 2023
पिंपरीतील पाच हजार फेरीवाल्यांची कागदपत्रे जमा करण्याकडे पाठ

शहरात १९ हजार ६९७ फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामधील तब्बल पाच हजार ७५ फेरीवाल्यांनी कागदपत्रे महापालिकेकडे जमाच केली नसल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 17 Oct 2023
पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा ‘रूफटॉप’ हॉटेलवर हातोडा

शहरातील बेकायदा रूफटॉप हॉटेलवर (गच्चीवरील हॉटेल) महापालिका प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 17 Oct 2023
मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य; छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस

आंतरवाली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी’, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 17 Oct 2023
महिलांविषयी राज्य सरकार असंवेदनशील, अॅड रोहिणी खडसे यांची टीका

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

12:27 (IST) 17 Oct 2023
प्राथमिक विभागाला माध्यमिकपेक्षा आठ दिवस अधिक दिवाळी सुट्ट्या

माध्यमिकसाठी १३ दिवस तर, जिल्हा परिषदेकडून प्राथमिक विभागासाठी २१ दिवसांच्या सुट्ट्यांचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:26 (IST) 17 Oct 2023
जुलैतील मूल्यमापनात नाशिक ग्रामीण पोलीस प्रथम, सीसीटीएनएस यंत्रणेतील कामकाज

नाशिक ग्रामीण पोलीसांनी सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान सलग दुसऱ्यांदा मिळवला आहे.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 17 Oct 2023
कल्याणमधील शाळेत विद्यार्थ्यांकडून वृत्तपत्राचे वाचन; वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम

कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयात वृत्तपत्रे विद्यार्थ्यांना वाचनासाठी देऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम अशोक विद्यालयात साजरा केला जातो.

सविस्तर वाचा

11:57 (IST) 17 Oct 2023
Navratri festival 2023: नवरात्रौत्सवात गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची नजरा; आयुक्तालय क्षेत्रात ५९५ देवींची प्रतिष्ठापना

ठाणे जिल्ह्यात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सावाच्या कालावधीत रास-गरब्यादरम्यान अनेकदा महिलांची छेडछाड तसेच चोऱ्यांचे प्रकार वाढत असतात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी सुमारे चार हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 17 Oct 2023
कल्याणमधील शाळेत विद्यार्थ्यांकडून वृत्तपत्राचे वाचन; वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम

माजी राष्ट्रपती डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून देशभर वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना भाषणे किंवा एकत्रित जमवून मार्गदर्शन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना विविध प्रकारची वृत्तपत्रे वाचन प्रेरणा दिनी वाचण्यासाठी दिली जातात.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 17 Oct 2023
बोगस भात खरेदी पुन्हा उघड

आदिवासी विकास महामंडळाच्या १६ कोटी रुपयांचे बोगस भात खरेदी प्रकरण दोन महिन्यांपूर्वी उजेडात आल्यानंतर विभागाकडून सर्वच भात गोदामांची तपासणी करण्यात येत होती. या तपासणीत शहापूर आणि कर्जत तालुक्यात साडेचार कोटी रुपयांची बोगस भात खरेदी झाल्याचे समोर आले.

सविस्तर वाचा

11:55 (IST) 17 Oct 2023
डायघर कचरा प्रकल्पाचे पालिकेने दाखविले स्थानिकांना प्रात्यक्षिक

डायघर घनकचरा प्रकल्प कशाप्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही, याचे प्रात्यक्षिक ठाणे महापालिका घनकचरा विभागाने सोमवारी स्थानिकांना दाखविले. त्यावर आता स्थानिक प्रकल्पाबाबत काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

11:50 (IST) 17 Oct 2023
दुर्गाडी-मोठागाव वळण रस्त्याच्या ५९८ कोटीच्या निविदेला मंजुरी; कामाला लवकरच प्रारंभ

टिटवाळा ते हेदुटणे ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गावरील कल्याण मधील दुर्गाडी ते डोंबिवलीतील मोठागाव (माणकोली पूल) वळण रस्ते कामासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने ५९८ कोटी १२ लाखाच्या निवीदेला अंतीम मंजुरी दिली आहे.

सविस्तर वाचा

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे… अशा शब्दांत पडळकरांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.