Maharashtra Breaking News Today, 17 October 2023: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांसह अजित पवार व सुप्रिया सुळेंवर टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातील लांडगा कोण आहे? हे सगळ्यांना माहीत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या विधानावर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानाच्या अपडेट्ससह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात…
Mumbai News in Marathi: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर..
आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांकडून होणाऱ्या विलंबावर संजय राऊत म्हणाले, “हे सरकार चोर आणि लफंगे चालवत आहेत. त्या चोर आणि लफग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशात काय चाललंय, याची कल्पना न केलेली बरी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वारंवार विधीमंडळाचे अधिकार, विधिमंडळाचं सार्वभौमत्व याबद्दल बोलत आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की, एखाद्यानं चोरी करावी आणि दुसऱ्याच्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकाने चोरांना आणि खुन्यांना संरक्षण द्यावं, अशी या सार्वभौमत्वाची व्याख्या नाही.”
“मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ४० आमदार आणि अजित पवारांसह राष्ट्रावादीचे साधारण तेवढेच आमदार पूर्णपणे बेकायदेशीरपणे मूळ घराची लूट आणि चोरी करून दुसऱ्या घरात शिरले आहेत. त्या चोरांना- दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावाखाली संरक्षण देत असतील तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव देशाच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. उद्या जेव्हा ते त्या खुर्चीवर नसतील, तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल. या राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांना फासावर लटकवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयातून आले आहे. हे लोकशाहीचे हत्यारे आहेत, असं न्यायालयाने सांगितलं आहे. पण न्यायालयाने आपल्या मर्यादेनुसार, संबंधित आमदारांना अपात्र करण्याचं काम विधीमंडळाच्या अध्यक्षांवर सोपवलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
कल्याण: जीवनाच्या वाटचालीत यशस्वी व्हायचे असेल तर वाचन खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचन यज्ञाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीकास्र सोडलं. महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका पडळकरांनी केली. गोपीचंद पडळकरांच्या नव्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं भाजपा नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भलतीच प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ते ‘धनगर जागर यात्रे’च्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. दरम्यान, ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी एसटीडी अर्थात साहेब, ताई आणि दादा उल्लेख करत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना लक्ष्य केलं आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे… अशा शब्दांत पडळकरांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.