Mumbai Maharashtra News Today : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभरातील लोकसभेच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. कही ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावर अंतिम चर्चा चालू आहेत, तर काही पक्ष उमेदवारांच्या घोषणा करू लागले आहेत, जागावाटपांचे निर्णय जाहीर केले जात आहेत, अशा सर्व राजकीय बातम्यांच्या आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. लोकसभेसाठी पहिल्या टप्यात १९ मे रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामधील विदर्भातील जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra News Live Updates 01 April 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

18:14 (IST) 1 Apr 2024
कोल्हापूर : आवाडे जनता बँकेचा व्यवसाय ४२५० कोटींवर; स्वप्निल आवाडे, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक व्यवसाय

कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य शेडूल्ड बँकेचा मार्च अखेर एकूण व्यवसाय ४२५० कोटींचा झाला आहे. यामध्ये ठेवी २५५० कोटी, कर्ज १७०० कोटी याचा समावेश आहे. भाग भांडवल ७१ कोटी झाले असून ढोबळ नफा ५४ कोटी झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी सोमवारी दिली.

17:27 (IST) 1 Apr 2024
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

सफाईचे साहित्य आणण्यासाठी गोदामामध्ये गेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई कामगारांना सोमवारी अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा...

17:18 (IST) 1 Apr 2024
वंचिततर्फे रावेरमध्ये संजय ब्राह्मणे मैदानात

वंचिततर्फे रावेरमध्ये संजय ब्राह्मणे मैदानात

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 1 Apr 2024
…पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता, धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार

महायुतीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला गोंधळ आता आणखी नाट्यमय वळणावर येऊन थांबला आहे.

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 1 Apr 2024
पनवेल : आयुक्तांअभावी महापालिकेचा कारभार रामभरोसे

आयुक्त न नेमल्यामुळे अनेक पालिकांप्रमाणे पनवेलचा कारभार विस्कळीत झाला आहे.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 1 Apr 2024
मंत्र्यांसमोर भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरेंविषयी नाराजी, धुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 1 Apr 2024
पनवेल: आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल

महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 1 Apr 2024
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा

प्रसाद मोहिते याच्या मांजर्डे येथील रानात पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद मालाचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी छापा टाकण्यात आला.

सविस्तर वाचा...

14:08 (IST) 1 Apr 2024
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

गणेशनगर मधील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रक चौकी जवळील रस्ता खराब झाल्याने गेल्या महिन्यात या रस्त्याच्या एका बाजुचे काँक्रीटीकरणाचे काम पालिकेने पूर्ण केले.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 1 Apr 2024
गडचिरोलीत ‘इंडिया’ आघाडीत फूट, शेकाप नेत्याचे गंभीर आरोप; दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभाविरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल असे शेतकरी कामगार पक्षाने स्पष्ट केले आहे.

वाचा सविस्तर...

13:20 (IST) 1 Apr 2024
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

भंडारा : बागेश्वर धाम बाबा त्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मानव धर्माचें संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्या विरुध्द केलेले वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा यांना चांगलेच भोवले आहे.

वाचा सविस्तर...

13:06 (IST) 1 Apr 2024
पिंपरी: फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची मोहीम; ४०६ वाहनांवर कारवाई

फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाकड परिसरात एकाच दिवशी ४०६ वाहनांवर कारवाई केली.

सविस्तर वाचा...

13:05 (IST) 1 Apr 2024
धुळे मतदारसंघात ‘हे’ माजी पोलीस महानिरीक्षक वंचितचे उमेदवार

धुळे लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडी उमेदवाराच्या शोधात असतानाच महायुतीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला आहे.

सविस्तर वाचा...

12:39 (IST) 1 Apr 2024
बुलढाणा: ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस जिल्हाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हे दाखल

बुलढाणा : काँग्रेसचे बँक खाते गोठविणे व कोट्यवधींचा दंड ठोठावण्याचा विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

12:39 (IST) 1 Apr 2024
डोंबिवलीत दामदुप्पटच्या आमिषाने ज्येष्ठांची फसवणूक

वाढीव व्याज मिळवून देण्याच्या बोलीवर घेतलेले अडीच लाख रूपयांवर वाढीव व्याज नाहीच पण मूळ रक्कम आरोपी परत करत नव्हते.

सविस्तर वाचा...

12:37 (IST) 1 Apr 2024
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

नागपूर : गेल्या नऊ महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण सुरु होते. कुटुंबीयांना याबाबत कळल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणाला अटक केली.

वाचा सविस्तर...

11:47 (IST) 1 Apr 2024
सांगली: मिरजेच्या सतार, तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन

शास्त्रीय गायनात मृदू स्वरांची साथ देणार्‍या मिरजेतील सतार, तानपुरा या वाद्यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 1 Apr 2024
पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय: मार्केट यार्डमधील आंबेडकरनगर परिसरात दहशत, तरुणाला जीवे मारण्याची धमकी

मार्केट यार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात टोळक्याने कोयते, तलवारी उगारून दहशत माजविल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 1 Apr 2024
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटार, तसेच टेम्पोला आग लागल्याची घटना मुंढवा भागात मध्यरात्री घडली.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 1 Apr 2024
मुलाकडून आईला बेदम मारहाण… घर नावावर करून देत नसल्याने डोक्यात मारली खूर्ची

घर नावावर करून देण्यास नकार दिल्याने आईच्या डोक्यात खुर्ची मारणाऱ्या मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 1 Apr 2024
आजपासून वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास महागणार, नवीन पथकर दर लागू

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ केली आहे.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 1 Apr 2024
लग्नास नकार दिला म्हणून तरूणीवर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

तरूणी मालाड पूर्व येथील रहिवासी असून शिक्षिका आहे. ती खासगी संगणक अभ्यासवर्गात शिकवते.

सविस्तर वाचा...

11:19 (IST) 1 Apr 2024
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटात वाद, गटबाजीला कंटाळून विभागप्रमुख धानूरकर यांचा राजीनामा

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद उफाळून आला आहे.

सविस्तर वाचा...

11:18 (IST) 1 Apr 2024
मुंबई: शहर भागातील कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्याप दंड वसुली नाही, एक महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल

शहर भागातील रस्त्याची कामे रखडवणाऱ्या वादग्रस्त कंत्राटदाराला मुंबई महानगरपालिकेने लावलेला ६४ कोटी रुपयांचा दंड कंत्राटदाराने अद्याप भरलेला नाही.

सविस्तर वाचा...

11:17 (IST) 1 Apr 2024
लोकसभा निवडणूक : ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तर काय? ‘ही’ असेल उपाययोजना

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करीता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ चे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

11:17 (IST) 1 Apr 2024
नवी मुंबई: भीषण अपघातात एकाचा मृत्यू, आरोपी फरार

पाम बीचवरून बेलापूरकडून वाशीच्या दिशेने एक रिक्षा आणि होंडा सिटी गाडी येत होती.

सविस्तर वाचा...

11:16 (IST) 1 Apr 2024
“नाशिकच्या जागेवरुन वेगळी विधाने करणे अयोग्य”, राधाकृष्ण विखे यांचा भुजबळ यांना टोला

महायुतीत तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ वादात सापडला आहे.

सविस्तर वाचा...

11:16 (IST) 1 Apr 2024
भुजबळ यांच्या शक्यतेने सकल मराठा समाजात अपक्ष उमेदवारीवरुन मतभेद का ?

अलीकडेच मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात उमेदवारीविषयी चर्चा करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

11:03 (IST) 1 Apr 2024
'गुजरातचा लिव्हर' म्हणत संजय राऊतांची मोदींवर टीका

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथील भाजपाच्या जाहीर सभेत म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मोदींनी हा सर्वात मोठा जोक केला आहे. ते दररोज असा एक विनोद करत आहेत. त्यांचे विनोद ऐकले की वाटतं, देशात जॉनी लिव्हरनंतर (बॉलिवूड अभिनेता) कोणी मोठा विनोदी कलाकार असेल तर ते मोदी आहेत. हा गुजरातचा लिव्हर आहे.

nashik bjp marathi news, radhakrishna vikhe patil criticizes ncp chhagan bhujbal marathi news

“नाशिकच्या जागेवरुन वेगळी विधाने करणे अयोग्य”, राधाकृष्ण विखे यांचा भुजबळ यांना टोला

आम्ही राज्यात काम करणारी मंडळी असल्याने दिल्लीतून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना काय सूचना केली, त्याबद्दल कल्पना नाही. भाजपची क्षमता जास्त असल्याने नाशिकच्या जागेची आम्ही मागणी केली असून ती गैर नाही. यावर महायुतीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यामुळे कुणी असे सांगितले, तशा सूचना केल्या, अशी विधाने करणे योग्य नसल्याचे सांगत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांना टोला हाणला.

महायुतीत तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ वादात सापडला आहे. दिल्लीत आपल्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिल्याचे भुजबळ यांनी शनिवारी सांगितले. शिवसेना शिंदे गटाचा ही जागा मित्रपक्षांना देण्यास विरोध आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिक मतदारसंघात भाजपचे शंभरपेक्षा अधिक नगरसेवक असून ही जागा भाजपला द्यावी म्हणून आमचा आग्रह राहिल्याचे नमूद केले. भाजपला जागा मिळाल्यास निश्चितपणे महायुतीचा उमेदवार निवडून आणला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader