Maharashtra News Updates , 08 June 2022 : राज्यसभेची निवडणूक भाजपने लादली असून राज्यात एक षडयंत्र सुरू आहे. त्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन करत बंगालमध्ये तृणमूलने भाजपला गाडले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडे पूर्ण संख्याबळ असून आघाडीच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकजूट दाखवून विजय मिळवू आणि नंतर विजयोत्सव साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तर आपल्याकडे पूर्ण संख्याबळ असल्याने चारही उमेदवारांची विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आमदारांच्या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीने विजय निश्चित असल्याचा संदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै- कृषीदिनापासून सुरू करण्यात येणार असून, कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

11:31 (IST) 8 Jun 2022
गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; आरबीआयची व्याजदरांत वाढ

महागाई दर वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंटची (०.५० टक्के) वाढ करण्यात आली आहे. यासोबत रेपो रेट ४.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. एक महिन्याच्या अंतराने रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1534409446830768128

11:01 (IST) 8 Jun 2022
राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं, कसं बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे – संजय राऊत

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळीच ट्वीटद्वारे शिवसेनेवर टीका केली आहे. तर, औरंगाबादमधील भाजपा नेत्यांकडून देखील विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:24 (IST) 8 Jun 2022
संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे – उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संदीप देशपांडेंचं ट्वीट!

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत हिंदू जननायक अशी प्रतिमा निर्माण करत सभा घेतल्यानंतर औरंगाबादच्या राजकारणाला मिळालेल्या राजकीय वळणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष्य आहे. दरम्यान, या सभेवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकात्मक टिप्पणी केली आहे. “आज संभाजीनगर मध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.” असं संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:21 (IST) 8 Jun 2022
“आजकाल माझे कोणाशीही…”; जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची प्रतिक्रिया

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राज्याच्या गृह विभागानं देखील याची दखल घेतली आहे. या धमकी प्रकरणामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचा संशय गृह विभागाला आहे. या नंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घरी जाऊन चौकशी केली. वाचा सविस्तर…

10:20 (IST) 8 Jun 2022
“कतारने भारताला धडा शिकवला, पण भाजपा…”; पंतप्रधानांचा झालेला अवमान चुकीचा असल्याचे म्हणत शिवसेनेची टीका

प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल भाजपाने रविवारी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आणि दिल्लीच्या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. इराण, कतार आणि कुवेत या तीन प्रमुख आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून विरोध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. गेल्या सात-आठ वर्षांत नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांनीही भारताला शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न केला आहे अशीही टीका शिवसेनेने केली आहे. वाचा सविस्तर…

10:17 (IST) 8 Jun 2022
Maharashtra HSC Result 2022: आज जाहीर होणार बारावीचा निकाल; कसा आणि कुठे पहायचा? जाणून घ्या

Maharashtra HSC Result 2022 Date & Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

10:17 (IST) 8 Jun 2022
मोबाईल गेम खेळू न दिल्याने आईची हत्या

मोबाईल गेम खेळू न देणाऱ्या आईची १६ वर्षीय मुलाने हत्या केली आहे. यानंतर मुलाने आपल्या १० वर्षीय बहिणीला खोलीत बंद केलं आणि आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. तीन दिवस मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. लखनऊनच्या पीजीआय परिसरात ही घटना घडली आहे.

सविस्तर बातमी

10:12 (IST) 8 Jun 2022
Gold- Silver Price Today: सोन्यातील तेजी कायम, चांदीचे दरही वाढले

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. १० ग्रॅम २२ कॅरेट आणि १० ग्रॅम २४ कॅरेटची महाराष्ट्रातील आजची किंमत जाणून घ्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

10:11 (IST) 8 Jun 2022
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर वाचू शकता.