Maharashtra Political Crisis, 27 March 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टीप्पणीवरून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. यावरून देशात काँग्रेस विरूद्ध भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. तर, मालेगावात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाचा समाचार घेतला आहे. यावरूनही राज्यात टीका-टीप्पणी सुरू झाली आहे.
Marathi News Live Updates : देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर....
"भाजपाने लिहून दिलेली स्क्रीप्ट मुख्यमंत्र्यांनी वाचली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इशारा केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कागद वाचला. याचा अर्थ लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचली. सावरकरांची यात्रा काढणार असेल स्वागत आहे. पण, सावरकांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने महाराष्ट्रात करण्यात येत आहे. ८ वर्षे केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सर्वात आधी सावरकरांना भारतरत्न द्या. मग विचारधारा यात्रा काढावी, " असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा-शिंदे सरकारला दिलं आहे.
नवी मुंबई : तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना सायबर प्रशिक्षण आवश्यक झाले आहे. हिच निकड लक्षात घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आमगाव नगर परिषदेच्या न्याय प्रविष्ट प्रकरणावरून आठ गावे पेटून उठले होते. दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत असल्यामुळे सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण निकाली काढण्याचे ठोस आश्वासन आमदार परिणय फुके यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांना दिल्यानंतर रविवारी रात्री हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आमगाव संघर्ष समितीचे यशवंत मानकर यांनी दिली.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत २०२०च्या तुलनेत यंदा गैरप्रकार घटल्याचे निदर्शनास आले. यंदा बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका संस्थेशेजारील प्रवेशद्वाराने आता केवळ फेस रिडींगच्या माध्यमातूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १० एप्रिलची मुदत देण्यात आली असून, नोंदणीविना प्रवेश दिला जाणार नसल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.
"काँग्रेस संसद चालू देत नाही. वेगवेगळी विधान करत जनतेची दिशाभूल करत आहे. आज ( २७ मार्च ) काँग्रेसचे लोक संसदेत काळ्या कपड्यात आले. त्यांना कायद्याचा अपमान करायचा आहे का? ते ओबीसीबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करतात का?," असे सवाल भाजपाचे नेते पीयूष गोयल यांनी उपस्थित केले आहेत.
यंदाच्या २०२३ या वर्षात मार्च या एकाच महिन्यात तीन ऋतुंचा अनुभव ठाणे जिल्ह्यात अनुभवास आला. मार्च महिन्याच्या सुरूवातीला पहिल्या पंधरवड्यात तापमान चाळीशीपार गेले होते. त्यानंतर १६ मार्चनंतर काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.
कल्याण पूर्वेतील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलंगगड रस्त्यावर आडिवली-ढोकळी गावातील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी तीन माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती.
"राहुल गांधी वारंवार सांगत आहे, मी सावरकर नाही गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यात नाही, तुम्ही काय सावरकर होऊ शकता. तुम्ही देशाची निंदा परदेशातून जाऊन करता. याच्यापेक्षा काय जास्त दुर्दैव असू शकतं," असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
खासगी शिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हे दाखल असून अद्यापही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द कण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी गांधी चौकात काँग्रेस व समविचारी पक्षाच्या नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन करून भाजपचा निषेध नोंदविला.
आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'चेतावणी धरणे आंदोलन' करण्यात आले.जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, महासचिव विष्णू उबाळे, प्रशांत वाघोदे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जळगाव – शहरातील गोलाणी व्यापारी संकुलात रविवारी रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. सोपान हटकर (३५, रा. हरिविठ्ठललनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर फरार संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी : चिंचवड येथील राज्यस्तरीय लावणी महोत्वसात मी राजसा तुम्हासाठी ग्रुपच्या नर्तीका सोनाली जळगावकर यांनी ‘कस गाऊ मी तुमचे गुण, तुमचे माझ्यावर रून’, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, तुमच्या पायात हवा’.. ही लावणी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी सादर केली. लावणी पाहताना पुणेकर यांना अश्रू अनावर झाले.
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील तलावावर रविवारी सकाळी दहा परदेशी राजहंसांचे दर्शन झाले. मागील आठवड्यात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेले रोशन धोत्रे यांनाही चौदा राजहंस दिसल्याची माहिती पक्षीमित्र, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी दिली.
जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम दत्तात्रय मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला. नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली.
पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तर दुसरीकडे त्यांची पत्नी सोनाली चव्हाण यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाठार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"गेल्या ३५ वर्षाच्या राजकारणात माझ्यावर कोणतीही चौकशी किंवा आरोप नाही. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून माझ्यावर प्रचंड अन्याय झाला. त्यामुळे आमचा स्वाभिमान टिकवण्यासाठी, या भागातील काम होण्यासाठी आम्ही भाजपात गेलो," असं प्रत्युत्तर भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाण पाडा येथील खाडी किनारी हरितपट्ट्यामधील चार हजार चौरस मीटर जागेत शिव सावली नावाने १० बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प उभारणाऱ्या भूमाफियांना ‘महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाने’ (महारेरा) इमारत गृहप्रकल्पाची बनावट कागदपत्रे दाखल करुन ‘महारेरा’कडून बनावट नोंदणी क्रमांक मिळविल्याबद्दल नोटीस बजावली आहे.
गडचिरोली : सूरजागड येथे जाऊन आंदोलन करणार असे दोनदा नाना पटोले यांनी जाहीर केले होते. परंतु अद्याप ते आले नाही. यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.
"पवारांच्या पाठीमागे सर्व पिढीन-पिढी बर्बाद केली. आपल्या आजोबाने-बापाने दिलं, तुम्ही ही चूक करू नका. भावी पंतप्रधान असा विषय असतोका. ज्यांचे ४ खासदार तो माणूस देशात पंतप्रधान होऊ शकतो. सभागृहाच नाव जरी काढलं, तरी ते राष्ट्रीय नेते म्हणून सांगतात. त्यांच्यानंतर मायावती जयललिता, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. आण्णा हजारेंच्या आंदोलनाच नाचून नाचून केजरीवाल तीन वेळा मुख्ममंत्री झाले. तुम्हाला तुमचा आकडा १०० वर जात नाहीत. तरीसुद्धा तुम्ही अशा भाषा करता," अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरीगाव येथे राहणारी एक महिला भाजी आणण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेली, मात्र घरी परत आल्यावर घराचा कडी कोयंडा तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सव्वासहा ते सात या केवळ पंचेचाळीस मिनिटांत चोर आले. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व आत प्रवेश करीत अजून एका कपाटाचे कुलूप तोडून चोरी केली व निघूनही गेले.
मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. करोना चाचण्या करणाऱ्यांपैकी बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाणही गेल्या महिन्यांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत करोना चाचण्यांपैकी बाधित अहवाल येण्याचा दर ०.५३ टक्के होता. तोच दर मागील आठवड्यामध्ये ३.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहरात गुन्हा करण्याच्य्या हेतूने आले खरे, मात्र पोलीसांना वेळीच खबर लागल्याने नागपूरचे पंकज प्रभाकर साठवणे, मिलिंद प्रेम हिराणी व आकाश ज्ञानेश्वर बांगडे हे जाळ्यात अडकले. या तिघांची अट्टल गुन्हेगार म्हणून पोलीस दफ्तरी नोंद आहे.
समाज माध्यमावर ओळख झाल्यावर त्या दोघांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर त्याने तिला कॉलेजला जाऊ नको, मला तुझ्यासोबत वेळ घालवयाचा आहे, असे म्हटले. मग काय, तिने दररोज कॉलेजला दांडी मारत त्याच्यासोबत फिरणे व चहा, नाश्त्याच्या टपरीवर वेळ घालविणे सुरू केले.
वाई : ऐन उन्हाळी हंगामात महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी परिसरात स्थानिक आणि पर्यटक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. आज तर महाबळेश्वरच्या वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदूचे हिमकणात रुपांतरण झाल्याचे पाहावयास मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवरदेखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले.
समाज माध्यमावर ओळख झाल्यावर त्या दोघांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर त्याने तिला कॉलेजला जाऊ नको, मला तुझ्यासोबत वेळ घालवयाचा आहे, असे म्हटले. मग काय, तिने दररोज कॉलेजला दांडी मारत त्याच्यासोबत फिरणे व चहा, नाश्त्याच्या टपरीवर वेळ घालविणे सुरू केले.
"मी पवारांच्या विरोधात बोलतो, याचा अर्थ निट समजून घ्या. कारण, पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली, ती मुळापासून काढून टाकावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस नावाचा कार्यकर्ता २०१४ साली मुख्यमंत्री झाला. २०१४ ते २०१९ महाराष्ट्राचा विचार केला, तर शेतकऱ्यांना काय लागतं, त्याचा योग्य उपाय काढणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा लाभला," असं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
विकासाच्या नावाने उरण मधील नैसर्गिक खारफुटी व पाणथळी या मातीचा भराव करून झपाट्याने बुजवल्या जात असून यामुळे उरणला पुराचा धोका निर्माण झाला आहे, भूजल पातळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
कल्याण व्यवसायातील ४५ लाख लाख रुपयांची रक्कम मालकाने आपल्या विश्वासू नोकराला बँकेत भरण्यासाठी दिली. विश्वासू नोकराने मालकाचा घात करुन ती रक्कम बँकेत भरणा न करता आपल्या राजस्थान मधील मूळ गावी पळून गेला.