Maharashtra Political Crisis, 27 March 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टीप्पणीवरून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. यावरून देशात काँग्रेस विरूद्ध भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. तर, मालेगावात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाचा समाचार घेतला आहे. यावरूनही राज्यात टीका-टीप्पणी सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर….

12:09 (IST) 27 Mar 2023
वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांची मोडतोड

डोंबिवली- वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांमध्ये आणि उद्घोषकांमधून स्थानकांच्या नावाची उद्घोषणा करताना मोडतोड होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा

11:48 (IST) 27 Mar 2023
चंद्रशेखर राव यांना राज्यात पाठिंबा मिळणार?

मुंबई : मराठवाड्यात लागोपाठ दोन जाहीर सभा घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या ‘रयतूबंधू’ आणि ‘दलितबंधू’ या योजनांचे राज्यातील शेतकरी आणि अनुसूचित जातीच्या लोकांना प्रलोभन दाखवत आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेलंगणाच्या पक्षाला राज्यातील मतदार स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.

सविस्तर वाचा..

11:27 (IST) 27 Mar 2023
“…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

तुम्ही म्हणताय कांद्याला भाव मिळाला नाही, मी म्हणतो मिळाला. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली, किती खोक्याला एक कांदा गेला. एक कांदा ५० खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके, रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याला उत्तर देत सुहास कांदेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

वाचा सविस्तर…

11:25 (IST) 27 Mar 2023
उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार? संजय राऊत म्हणाले…

गेल्या आठवड्यात विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारल्या होत्या. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली. “मला दिल्लीत संसदेच्या लॉबीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा रोज भेटतात. सत्ताधारी आणि विरोधकांचा येण्याजाण्याचा रस्ता एकच आहे. त्यामुळे फडणवीस-ठाकरेंच्या भेटीनंतर ते पुन्हा एकत्र येणार, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत,” असे संजय राऊत यांनी सांगितले.

10:57 (IST) 27 Mar 2023
लोणावळ्यात डाॅक्टरच्या बंगल्यात चोरी; पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

लोणावळा : लोणावळा परिसरात एका डाॅक्टरच्या बंगल्यातून चोरट्यांनी पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डाॅ. किरण राघवेंद्र चुळकी (वय ४४, रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा..

10:50 (IST) 27 Mar 2023
पुणे : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

10:50 (IST) 27 Mar 2023
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘या’ चार शहरांची चर्चा! २३ एप्रिलला एक ठिकाण होणार निश्चित

पुणे : आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे. सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या निमंत्रण आलेल्या चार स्थळांना साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार असून, २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा..

10:49 (IST) 27 Mar 2023
शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ३५ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सहल रद्द; पालकांना मन:स्ताप

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नवरत्न स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (भारतीय अवकाश संशोधन केंद्र) बंगळुरू येथे सहलीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सहलीवर विरजण पडले आहे.

सविस्तर वाचा…

10:48 (IST) 27 Mar 2023
नागपूर विद्यापीठाने ‘पीएच.डी.’ प्रक्रियेत केले मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर..

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आपल्या ‘पीएच.डी.’ प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. विद्यापीठाने संशोधन प्रबंध पूर्ण करण्याचा कालावधी ५ वर्षांवरून ६ वर्षे केला आहे. यासोबतच संशोधकाकडून आलेल्या अर्जाच्या आधारे ६ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्याला २ वर्षांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा..

10:44 (IST) 27 Mar 2023
ठाणे: लोकलमध्ये कर्णबधिर तरुणाला जाळण्याचा प्रयत्न करणारा गर्दुल्ला ताब्यात

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या कर्णबधिर तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ वर्षीय मुलाला रविवारी रात्री उशीरा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा

10:43 (IST) 27 Mar 2023
गोंदिया: वाळू तस्करांना मोकळे रान, गोंदिया जिल्ह्यातील ३३ वाळूघाटांचा लिलाव रखडला

पर्यावरण मंडळाची मंजुरी न मिळल्याने आणि शासनाच्या वाळू घाटांच्या नवीन धोरणामुळे जिल्ह्यातील ३३ वाळू घाटांचे लिलाव रखडले आहेत. परिणामी लिलावाच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावरसुद्धा यामुळे पाणी फेरले जात असून वाळू तस्करांना मात्र मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात लहान मोठे असे एकूण ६५ वाळू घाट आहेत.

सविस्तर वाचा

10:43 (IST) 27 Mar 2023
चंद्रपूर: स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय संस्थेचे ताडोबा, मेळघाट व नवेगांव-नागझीरा या प्रकल्पांना मानांकन

स्वित्झर्लंड येथील “कॅट्स” या अंतराष्ट्रीय संस्थेच्या कार्यसमितीने देशातील सहा व्याघ्र प्रकल्पांना मानांकीत केले आहे. यामध्ये काली, मेळघाट, पिलीभीत, नवेगांव-नागझीरा, पेरीया व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे.

सविस्तर वाचा

10:42 (IST) 27 Mar 2023
नागपूर: ‘सेक्स रॅकेट‘ उघडकीस, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंबटशौकीन ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आले.

सविस्तर वाचा

10:42 (IST) 27 Mar 2023
“बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून”, शीतल म्हात्रेंच्या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांचा टोला; म्हणे, “उघड्यावर लाज…!”

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओवरून गंभीर आरोपही करण्यात आले. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. यावरून राजकारण तापलेलं असतानाच शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वेगळंच ‘ट्विटर वॉर’ सुरू झाल्याचं दिसत आहे. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सगळ्याला सुरुवात झाली ती शीतल म्हात्रेंच्या २५ मार्च रोजी केलेल्या एका ट्वीटपासून!

वाचा सविस्तर…

10:42 (IST) 27 Mar 2023
नागपूर: राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार; सुधीर मुनगंटीवार

२१ व्या शतकात रंगभूमी ही लोकाश्रयाच्या अधीन आहे. सरकार म्हणजे राजाश्रय हवाच आणि तो उत्तम आणि आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीतून दिला जाणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

10:41 (IST) 27 Mar 2023
“उद्धव ठाकरेच वाघ! त्यामुळेच…” मालेगावच्या सभेत भगवा झेंडा घेऊन आलेल्या मुस्लिम मावळ्याने वेधलं लक्ष

मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत अभूतपूर्व गर्दी झाली होती. गर्दीचा सागरच इथे मी पाहतो आहे असं उद्धव ठाकरेही म्हणाले. तसंच करोना काळात मालेगावकरांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी मालेगावच्या जनतेचे आभार मानले. या सभेत आलेला मुस्लिम मावळा लक्ष वेधून घेत होता. उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्या हृदयात आहेत आणि तेच महाराष्ट्राचे वाघ आहेत असं या मुस्लिम मावळ्याने म्हटलं आहे.

वाचा सविस्तर…

10:40 (IST) 27 Mar 2023
“परत मी पवारांच्या मानगुटीवर…”, गोपीचंद पडळकरांची टोलेबाजी; म्हणाले, “..तो भाग्यवान माणूस असेल!”

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने आपल्या आक्रमक भूमिकांमुळे चर्चेत असतात. विशेषत: त्यांनी बारामती मतदारसंघ आणि पवार कुटुंबीय यांच्यावर सातत्याने आरोप केल्यामुळे त्या त्या वेळी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडल्याचं पाहायला मिळालं आहे. गोपीचंद पडळकर बारामतीमधून निवडणूक लढवायलाही उभे राहिले होते. मात्र, तेव्हा मोठ्या पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. त्यानंतरही त्यांनी पवार कुटुंबीयांना असलेला विरोध जाहीरपणे बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर आता पडळकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर खोचक टीका केली आहे.

वाचा सविस्तर…

10:38 (IST) 27 Mar 2023
“राहुल गांधींना अपात्र ठरवलं म्हणून निषेध करायचा, दुसरीकडे…”, सुहास कांदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

सभा पाहून उद्धव ठाकरेंची दया आली. उत्तर महाराष्ट्राने या सभेतून घ्यायचं काय? एकीकडे राहुल गांधींना अपात्र ठरवलं म्हणून निषेध करायचा. सभेत राहुल गांधी सावकरांबाबत चुकीचं बोललं सांगायचं. या दुट्टपी भूमिका योग्य नाही. ही फक्त टोमणे सभा होती, अशी टीका शिवसेना ( शिंदे गट ) आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

10:38 (IST) 27 Mar 2023
“तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली, तरी…”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर बावनकुळेंचा पलटवार; म्हणाले…

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा, तातडीने निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं होतं. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा सविस्तर…

Maharashtra Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…