Mumbai Maharashtra Live Updates Today : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी खासदारकी गेल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही असं म्हणत पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा अपमान केला. त्यानंतर रविवारी झालेल्या सभेत वीर सावरकर यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले. राहुल गांधी यांच्या वाक्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करून आम्ही राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी यावर टीका करत ही अदाणी गौरव यात्रा आहे असं म्हटलं आहे. तसंच ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये असंही राऊत यांनी म्हटलं आहे. वीर सावरकर यांचा अपमान हा मुद्दा आजही राज्यात चर्चेत आहे. तसंच विविध घडामोडीही घडत आहेत. त्या सगळ्यावर आपलं लक्ष्य असेलच. लोकसत्ताच्या या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडींचे अपडेट अगदी एका क्लिकवर

Live Updates

Marathi Batmya Live Updates| "ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये" संजय राऊत यांची टीका, इतर महत्त्वाच्या घडामोडी

[caption id="attachment_3548497" align="alignnone" width="670"]sanjay raut critized bjp and shinde government फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम[/caption]

18:52 (IST) 28 Mar 2023
आंदोलनांना दांडी माराल तर थेट निलंबन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना निर्देश

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जनतेच्या समस्या निवारणाकरिता आंदोलने, मोर्चा, सत्याग्रह, उपोषण करण्यात येते. या कार्यक्रमांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, पदाधिकारीच या कार्यक्रमाला दांडी मारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लक्षात येताच त्यांनी आभासी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

18:24 (IST) 28 Mar 2023
अमरावती: “नवनीत राणा हिंदू शेरणी”! वाढदिवसानिमित्त झळकले पोस्टर्स

गेल्‍या वर्षी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त येत्‍या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला

सविस्तर वाचा

18:23 (IST) 28 Mar 2023
नागपूर: गडकरींना धमकी देणाऱ्या पुजारीच्या मुसक्या आवळल्या; आज नागपुरातील न्यायालयात करणार हजर

बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड जयेश पुजारी याने भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. पुजारीने सलद दुसऱ्यांदा धमकी दिल्यामुळे नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याला बेळगाव कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणले.

सविस्तर वाचा

18:23 (IST) 28 Mar 2023
फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; एक मजूर ठार, हादऱ्यामुळे भिंत कोसळली

अकोला : बंदूकवाला फटाका कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बेलुरा ते तांदळी फाट्यावर मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 28 Mar 2023
कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामप्रकरणी मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस

महसुली उत्पन्नाचा भाग म्हणून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शासन धोरणात बसणारी काही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे विधान कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी गेल्या सप्ताहात केले.

सविस्तर वाचा

17:36 (IST) 28 Mar 2023
“कपटाने मिळवलेली सत्ता गेल्यानेच उद्धव ठाकरेंना वीर सावरकर…” व्हिडीओ पोस्ट करत भाजपाचा आरोप

उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे केलेल्या भाषणात राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. तसंच वीर सावरकर हे आमचं श्रद्धास्थान आहे आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही असं राहुल गांधींना उद्देशून म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर सातत्याने टीका होते आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टीका केली. आम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. तर महाराष्ट्र भाजपाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठल्या घटनांवर ते गप्प राहिले याचा पाढाच भाजपाने वाचला आहे. तसंच तुमची सत्ता गेली म्हणूनच तुम्हाला वीर सावरकर यांची आठवण आली असंही भाजपाने म्हटलं आहे.

16:49 (IST) 28 Mar 2023
तात्या टोपेंनी बंड केलं होतं यांनी केलं ती गद्दारी आहे-संजय राऊत

बंड आणि गद्दारी यात फरक आहे. एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते बंड नाही ती गद्दारीच आहे. तात्या टोपे यांनी जे केलं ते बंड होतं त्यामुळे बंड आणि गद्दारी काय ते समजून घ्या. तसंच आम्हाला जे काही समन्स बजावण्यात आलं त्याने काही फरक पडत नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ.

16:30 (IST) 28 Mar 2023
INDIAN RAILWAY रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या: आता भुसावळ, चंद्रपूर, सिंदी, बडनेरात थांबणार ‘या’ एक्स्प्रेस; तिकीट खपाच्या आढाव्यानंतर…

रेल्वे मंडळाने काही थांबे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने काही गाड्यांचे थांबे राहतील. पुढे तिकीट विक्रीचा आढावा घेवून थांबे कायम करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

सविस्तर वाचा

15:52 (IST) 28 Mar 2023
डोंबिवली: ठाकुर्ली खंबाळपाडा-कांचनगाव मधील कोट्यवधीचा कर भरणा करणारे रहिवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

नवी डोंबिवली म्हणून विकसित झालेल्या येथील ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागातील खंबाळपाडा, कांचनगाव, कचोरे, भोईरवाडी भागातील महापालिकेच्या विकास आराखड्यातील अंतर्गत रस्ते पालिकेने विकसित करावेत, अशी जोरदार मागणी कांचनगाव, ९० फुटी भागात नवीन गृहसंकुलात राहण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांकडून केली जात आहे.

सविस्तर वाचा

15:51 (IST) 28 Mar 2023
कल्याणमध्ये तीन मिनिटात ३० लाखाच्या मोबाईलची चोरी

कल्याण येथील पश्चिमेतील वर्दळीच्या अहिल्याबाई चौकातील एक मोबाईलचे दुकान रात्रीच्या वेळेत फोडून चोरट्यांनी तीन मिनिटाच्या कालावधीत दुकानातील ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरुन नेले.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 28 Mar 2023
सावरकर वादावर काँग्रेस-ठाकरे गटात पवारांची मध्यस्थी

सावरकरांवर केलेल्या विधानामुळे ठाकरे गट व काँग्रेसमध्ये तीव्र झालेल्या वादात शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. ‘आपल्याला मोदींच्या भाजपविरोधात लढायचे आहे की, सावरकरांविरोधात’, असा थेट प्रश्न पवारांनी राहुल गांधींना केल्याचे समजते.

हेही वाचा....

14:02 (IST) 28 Mar 2023
मुंबई: महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची ५० टक्के पदे रिक्त; मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणामध्ये मोठी वाढ

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातील सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून उघडकीस आले आहे. एकूण ५४ पदांपैकी २८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मानवी हक्क उल्लंघन प्रकरणे प्रलंबित आहेत.

सविस्तर वाचा

13:56 (IST) 28 Mar 2023
हनुमान जयंतीच्या निमित्ताने लागले नवनीत राणांचे बॅनर! 'हिंदू शेरनी' असा लक्षवेधी उल्लेख

हनुमान जयंती जवळ येते आहे. त्या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे अमरावती आणि मुंबईत लागलेले बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत. भगवी शाल घेतलेला नवनीत राणा यांचा भला मोठा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर नवनीत राणा यांचा उल्लेख 'हिंदू शेरनी' असा करण्यात आला आहे. ६ एप्रिलला हनुमान जयंती होणार आहे. त्या अनुषंगाने अमरावतीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत.

13:21 (IST) 28 Mar 2023
नागपूर: उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब?पोलीस नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवला असून लवकरच स्फोट होणार आहे, असा फोन नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सर्वच अधिकाऱ्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला.

सविस्तर वाचा

13:03 (IST) 28 Mar 2023
आरोपी ज्या कंपनीत काम करायचा तिथल्या कामगारांच्या दुचाकी चोरायचा

पिंपरी : नामांकित कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या कामगाराने त्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या दुचाकी चोरण्याचा प्रताप केला आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी प्रदीप आश्रूबा डोंगरे याने नंतर नोकरी सोडून पिंपरी- चिंचवड शहरातील इतर दुचाकी देखील चोरल्या.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 28 Mar 2023
पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी! पीएफवरील व्याजदरात वाढ; सध्याच्या ८.०५ टक्क्यांवरून व्याजदर…

पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

वाचा सविस्तर

13:01 (IST) 28 Mar 2023
“एवढ्या घोषणा करतात की त्यांच्या…”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले, “..म्हणून जाहिरातबाजी चालू आहे!”

अजित पवार म्हणतात, “दिवसा आमच्याबरोबर आणि मतदानाला त्यांच्याबरोबर अशी औलाद इथे असेल तर त्यांचं काही खरं नाही. अशी माणसं…!”

वाचा सविस्तर

12:56 (IST) 28 Mar 2023
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच ठाकरे सरकार पाडले-तानाजी सावंत

चांगले काम करुनही आपल्याला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. त्यामुळेच आपण यापुढे मातोश्रीची पायरीही चढणार नसल्याची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाहीररीत्या पहिली बंडखोरी केली. फडणवीस यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि शिवसेनेतील आमदारांचे मतपरिवर्तन करण्यास सुरुवात केली. राज्याभरात तब्बल १५० बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंने त्यासाठी मोठी साथ दिली. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यात आपल्याला यश मिळाले असल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.

12:28 (IST) 28 Mar 2023
अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा

५ एप्रिलला आम्ही श्रीरामाचे धनुष्य घेऊन अयोध्येला जाऊ त्याच दिवशी रात्री मुंबईत येऊन शिवतीर्थावर धनुष्य ठेवून नतमस्तक होऊ आणि तिथून सुरू होईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसंच त्यानंतर धनुष्यबाण यात्रा सुरू होईल आणि त्याची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधून ८ किंवा ९ तारखेला रॅलीच्या माध्यमातून करू ही यात्रा फक्त धनुष्यबाणाची नसून, सरकारने घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवणे, आरोग्य शिबिर घेणे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा समजून घेणे हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. ही राजकीय नाही तर सामाजिक यात्रा असणार आहे.

12:26 (IST) 28 Mar 2023
बुलढाणा पोलिसांनी महिनाभरात पकडले ९१ वॉन्टेड आरोपी

पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर वॉन्टेंड आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक महिन्यात ९१ वॉन्टेंड आरोपी पकडण्यात बुलढाणा जिल्हा पोलिसांना यश मिळाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फरार आरोपी पकडल्या जाण्याची ही अमरावती परिक्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून गुन्हा करून फरार असलेल्या आरोपीचाही समावेश आहे.

12:25 (IST) 28 Mar 2023
दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसचे पैसे जमा नाही

अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये सरसकट बोनस जाहीर करत शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण पसरले होते. पण सरकारने बोनसची घोषणा होऊन दीड महिना उलटला मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून बोनसचे पैसे जमा झाले नाहीं, त्यामूळे शेतकरी बोनसची वाट पाहत आहे. तर सरकारने बोनसची घोषणा मात्र केली पण अद्यापही पैसे जमा न झाल्याने सरकारने शेतकऱ्यांची थट्टा तर केली नाहीं अशा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

12:23 (IST) 28 Mar 2023
काँग्रेसची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी काय करायचं?-संजय राऊत

“भारतीय जनता पक्ष म्हणतोय की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडावी आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं. कशासाठी बाहेर पडायचं उद्धव ठाकरेंनी? तुमच्या मांडीला मांडीला मांडी लावून बसायचं? तुम्ही ज्या गद्दारांना मांडीवर घेऊन बसला आहात त्या मांडीवर आम्ही बसायचं? गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होईल आणि दिल्लीतही २०२४ मध्ये बदल होईल. भाजपाला शिवसेनेची भीती वाटते आहे. महाविकास आघाडीत शिवसेना असल्याने महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल ही भीती भाजपाला वाटते आहे.”

11:12 (IST) 28 Mar 2023
सत्तेत असताना वीर सावरकर यांचा अपमान उद्धव ठाकरेंनी कसा सहन केला?-रणजीत सावरकर

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वीर सावरकर यांच्यावरून केलेली टीका योग्य नाही. जेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसने अश्लाघ्य भाषा वापरून वीर सावरकर यांंच्यावर टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे गप्प का बसले? त्यावेळी काँग्रेसची भूमिका त्यांना पटली होती का? असा प्रश्न आता वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी विचारला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी खासदारकी गेल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही असं म्हणत पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा अपमान केला. त्यानंतर रविवारी झालेल्या सभेत वीर सावरकर यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले. राहुल गांधी यांच्या वाक्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.

Story img Loader