Petrol and diesel prices on 2 June: दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या जातात. आता जून महिना सुरु झाला आहे. तर आजचे दर सुद्धा सकाळीच जाहीर झाले आहेत. त्यामुळे आज मुंबई-पुणे या शहरांसह महाराष्ट्रातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचा दर काय असणार आहे हे या लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.४४ | ९०.९६ |
अकोला | १०४.५८ | ९१.१२ |
अमरावती | १०५.०६ | ९१.५८ |
औरंगाबाद | १०४.४७ | ९०.९९ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.६८ | ९२.१७ |
बुलढाणा | १०४.८१ | ९१.३४ |
चंद्रपूर | १०४.०४ | ९०.६१ |
धुळे | १०४.१० | ९०.६४ |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.४७ | ९१.९८ |
हिंगोली | १०५.८५ | ९२.३४ |
जळगाव | १०५.२४ | ९१.७६ |
जालना | १०५.८३ | ९२.२९ |
कोल्हापूर | १०४.८२ | ९१.३६ |
लातूर | १०५.१६ | ९१.६७ |
मुंबई शहर | १०४.२१ | ९२.१५ |
नागपूर | १०३.९४ | ९०.५१ |
नांदेड | १०६.०० | ९२.५९ |
नंदुरबार | १०५.१४ | ९१.६४ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.३३ | ९१.८३ |
पालघर | १०४.०१ | ९०.४४ |
परभणी | १०७.३९ | ९३.७९ |
पुणे | १०४.०८ | ९०.६१ |
रायगड | १०३.८१ | ९०.३२ |
रत्नागिरी | १०५.६४ | ९२.१४ |
सांगली | १०३.९६ | ९०.५३ |
सातारा | १०५.१० | ९१.५९ |
सिंधुदुर्ग | १०५.८९ | ९२.३८ |
सोलापूर | १०४.४९ | ९१.०३ |
ठाणे | १०४.२८ | ९२.२२ |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.६५ | ९१.१९ |
यवतमाळ | १०४.८७ | ९१.४० |
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झालेला दिसून आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील धुळे शहरांत गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच ३१ मे २०२४ ला पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये प्रति लिटर होती ; जी आज १०४. १० रुपये प्रति लिटर झाली आहे. तर जळगावमध्ये देखील १०४.३५ रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आजच्या तारखेला १०५. २४ रुपये प्रति लिटर झाली आहे. तसेच नागपूर आणि पालघरमध्ये मात्र पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.
तर महाराष्ट्रातील जळगाव या शहरांत डिझेलची किंमत ३१ मे २०२४ रोजी ९०.८८ रुपये प्रति लिटर होती ; जी आजच्या तारखेला ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे.तर सोलापूर शहरात ३१ मे २०२४ ला डिझेलची किंमत ९०.८२ रुपये प्रति लिटर होती ; जी आजच्या तारखेला ९१.०३ रुपये प्रति लिटर आहे. तसेच लातूर शहरातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण येथे डिझेलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी लातूर शहरांत डिझेलच्या किंमत ९२.१८ रुपये प्रति लिटर होती ; जी आज ९१.६७ रुपये प्रति लिटर आहे.
त्यातच शुक्रवारपासून जम्बो मेगाब्लॉक सुरु झाला होता ; जो आज आज रविवारपर्यंत असणार आहे. यामुळे अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे काही जण फिरायला जाण्याचाही प्लॅन करतील. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या गाडीची टाकी फूल करण्यापूर्वी तुमच्या शहरात आज काय सुरु आहे दर हे नक्की तपासून घ्या.