हिंदी चित्रपट सृष्टीमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नयेत असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने दिला आहे. सुशांतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांतने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सुशांतच्या घरातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र आता याच फोटोंवरुन महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in