Maharashtra Budget Session, 24 March 2023: राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर २४ तासांच्या आत पालिका प्रशासनानं माहीमच्या समुद्रातील बांधकाम हटवलं आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस आता शिल्लक असून त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai Maharashtra Live News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात गुरुवारी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारल्याचा प्रकार घडला. यावरून गुरुवारी विरोधोी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर आज विधानसभेच्या कामकाजाची सुरुवातच त्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानं झाली.
विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच आहे. दोघांसाठी स्वतंत्र रस्ता करता आला तर बघू आपण. या चर्चा किंवा अफवांमध्ये काही अर्थ नाही. मनसेच्या नेत्यांचं भाषण जसं स्क्रिप्टेड होतं, तसेच त्यांचे आरोपही स्क्रिप्टेड आहेत – संजय राऊत</p>
राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्डेट करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत. आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो. आमचा पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. दुसऱ्याची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत – संजय राऊत
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Mumbai Maharashtra Live News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!