Maharashtra New Today, 05 July 2023 : राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर आज शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकांनंतर कोणत्या गटासोबत किती आमदार आहेत, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गटासाठी आता ही वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. आजच्या दिवसभरात काय होतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवार गटाची आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. तर, शरद पवारांची दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे. दोन्ही गटाकडून आज शक्तीप्रदर्शन होणार आहे. दरम्यान, अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Mumbai Maharashtra Live Updates :  राज्यातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

13:41 (IST) 5 Jul 2023
भाजी विक्रेत्यांच्या ठेल्यावर, मॉल्समधील दुकानात आणि घराबाहेर लिंबू-मिरची का बांधतात? जाणून घ्या कारण…

नागपूर: भाजी विक्रेत्यापासून तर मोठ्या मॉल्समधील अनेक व्यवसायिक दुकानाच्या तर काही लोक वाहनांच्या आणि घराच्या प्रवेशद्वाराबाहेर लिंबू आणि मिरची बांधतात.

सविस्तर वाचा…

13:40 (IST) 5 Jul 2023
बंडानंतर खासदारकीचा राजीनामा देणार होता त्याचं काय झालं? अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवारांनी…”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवारांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यात शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे अनेक आमदार-खासदारही होते. खासदार अमोल कोल्हेही बंडखोरीनंतर झालेल्या शपथविधी कार्यक्रमाला हजर होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपण शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट करत खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. आता शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी घोषणा केलेल्या राजीनाम्याचं काय झालं असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत मंगळवारी (४ जुलै) त्यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 5 Jul 2023
वर्धा: “१३ जुलैला कुठेही जावू नका”, भाजप प्रदेशाध्यक्षांचे आमदारांना फर्मान; म्हणाले…

वर्धा : सध्याच्या राजकीय धामधुमीत नवनव्या घडामोडी घडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आमदारांना सतर्क केले आहे. १३ जुलैला भाजप आमदारांची एक बैठक बोलाविण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजपचे तीन विधानसभेचे व एक विधानपरिषदेचा असे चार आमदार आहेत.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 5 Jul 2023
अंडी शाकाहारीच, पण? पशुवैद्यकांचा दावा काय, वाचा सविस्तर…

नागपूर: आधी कोंबडी की आधी अंड इथपासून ते अंड शाकाहारी की मांसाहारी या चर्चेला अखेर अंत करणारा दावा पशुवैद्यकानी केला आहे.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 5 Jul 2023
झारखंडमधील मोबाइल चोरट्याला पुण्यात अटक; २९ मोबाइल जप्त… ‘अशी’ करायचा मोबाइल चोरी

पुणे: शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यास समर्थ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच लाख नऊ हजार रुपयांचे २९ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 5 Jul 2023
कल्याणमध्ये रिकामे सिलिंडर भंगारात विकण्याचा प्रयत्न

कल्याण- येथील पूर्व भागातील मलंग गड रस्त्यावरील एका घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सी बाहेरील ट्रकमध्ये ठेवलेले रिकामे सिलिंडर भंगारात विकण्याचा प्रयत्न एका भुरट्या चोराने केला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी एका भुरट्या चोराला मंगळवारी अटक केली.

सविस्तर वाचा

12:21 (IST) 5 Jul 2023
पुण्यात घर घेणे महागले! परवडणाऱ्या घरांच्या विक्रीतही झाली घट

पुणे: यंदा जानेवारी ते जून या सहामाहीत पुण्यातील घरांच्या विक्रीत किंचित घट नोंदवण्यात आली. याचवेळी परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट झाली असून, मध्यम व मोठ्या आकाराच्या घरांना मागणी वाढली आहे.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 5 Jul 2023
जात प्रमाणपत्र पडताळणीची आजपासून विशेष त्रुटी पूर्तता मोहीम; ११ हजारपेक्षा अधिक प्रकरणांवर निर्णय

नाशिक: विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी अडचणी उद्भवू नये म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अपूर्ण प्रकरणांच्या त्रुटी दूर करण्यासाठी मंडळगड पध्दतीनुसार सर्व तालुक्यांमध्ये २७ शिबिरे राबविली.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 5 Jul 2023
बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता

बुलढाणा : लोणार तालुक्यातीलशिवणीजाट गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात तिघे वाहून गेले होते. यापैकी दोघे बचावले, मात्र तिस-याचा शोध लागला नव्हता. केशव धनराज बरले (५२), संतोष हरिभाऊ सरकटे (४६ ) असे बचावलेल्यांचे नाव आहे.

सविस्तर वाचा

11:41 (IST) 5 Jul 2023
पंधरा दिवसातच सिनेअभिनेत्री रविना टंडन दुसऱ्यांदा ताडोबात; दुपारपर्यंत तब्बल अकरा वाघांचे दर्शन

चंद्रपूर: जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सिने अभिनेत्री रवीना टंडन हिने पंधरा दिवसात दुसऱ्यांदा भेट दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 5 Jul 2023
अकोला : रुळावरून चालतांना कानात हेडफोन अन् मागून धडधड मालगाडी आली…पुढे..

अकोला : रुळावरून चालत असताना युवकाच्या कानात हेडफोन होते. मागून धडधड करत मालगाडी आली. आवाज ऐकू न आल्याने शेवटी अनर्थच घडला. मालगाडीच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी अंत झाला. जिल्ह्यातील माना-कुरूम स्थानकादरम्यान येणाऱ्या मंडुरा रेल्वे स्थानकानजीक रामटेक परिसरात ही घटना घडली.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 5 Jul 2023
नागपूर: आकाशपाळण्यात बसण्यासाठी पैसे न दिल्याने लहान मुलीने सोडले घर; तीन दिवस बेपत्ता, गुन्हे शाखेने घेतला शोध

नागपूर: पतीच्या मृत्यूनंतर घरात अठराविश्व दारिद्र्य आणि त्यात पाच मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी. मुलांचे शिक्षण आणि खाण्यापिण्याची सोय करताना फुलांचे हार तयार करणाऱ्या महिलेच्या नाकी नऊ आले.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 5 Jul 2023
पुणे शहर ‘राष्ट्रवादी’चा शरद पवारांना पाठिंबा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी तातडीने आयोजित केलेल्या बैठकीकडे आमदार, माजी नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार, नगरसेवकांच्या अनुपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत राहण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला. मात्र, आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने त्यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा सविस्तर…

10:53 (IST) 5 Jul 2023
मुंबईः तोतया लष्करी अधिकाऱ्यांना राजस्थानमधून अटक; ऑनलाईन फसवणूक केल्याचा आरोप

मुंबईः लष्करातील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील तरूणीशी संपर्क साधून तिची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना वि. प. रोड पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथे अटक केली.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 5 Jul 2023
मविआची अवस्था बांडगुळासारखी – केशव उपाध्ये

मविआची अवस्था बांडगुळासारखी झाली आहे. एकमेकांचा जीवनरस शोषून जिवंत राहण्यासाठी धडपडताना तीनही बांडगुळे नष्ट होणार आहेत. आपण एकमेकांच्या आधाराने जगायचे आहे की जगण्यासाठी दुसऱ्याला संपवायचे आहे हे कळले नाही की बांडगुळे आपोआप संपतात हा निसर्गाचा नियमच आहे! – केशव उपाध्ये

10:37 (IST) 5 Jul 2023
पुणे शहर कार्यालयाचे दरवाजे अजित पवार गटासाठी बंदच! ‘हे’ आहे कारण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर परिसरातील शहर कार्यालयाचा करारनामा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाने करण्यात आला आहे. जगताप हे शरद पवार गटात असल्याने शहर कार्यालयाचा ताबा घेणे अजित पवार गटासाठी अशक्य ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचीही शहरात दोन कार्यालये होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

वाचा सविस्तर..

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra Live Updates :  राज्यातील घडामोडी वाचा एका क्लिकवर