Maharashtra New Today, 05 July 2023 : राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर आज शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकांनंतर कोणत्या गटासोबत किती आमदार आहेत, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गटासाठी आता ही वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. आजच्या दिवसभरात काय होतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवार गटाची आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. तर, शरद पवारांची दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे. दोन्ही गटाकडून आज शक्तीप्रदर्शन होणार आहे. दरम्यान, अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Mumbai Maharashtra Live Updates :  राज्यातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:59 (IST) 5 Jul 2023
नवी मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्टेटस ठेवले म्हणून धमकी; गुन्हा दाखल

नवी मुंबई : पनवेल येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो स्टेटसवर ठेवला होता. मात्र सदर फोटो स्टेटसवरून काढून टाक, ते मुस्लिमांचे शत्रू आहेत, अशा आशयाचा मजकूर असलेला संदेश पाठवला होता. तसेच काही वेळातच फोन करून धमकीही दिली गेली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वाचा…

18:58 (IST) 5 Jul 2023
ठाणे: जादा परताव्याचे अमीष दाखवून १५० गुंतवणूकदारांची फसवणूक

ठाणे: जादा परताव्याचे अमीष दाखवून १५० गुंतवणूकदारांची ४१ कोटी २४ लाख ३० हजार ७८७ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

18:43 (IST) 5 Jul 2023
नाशिक: तलाठी लाच स्विकारताना जाळ्यात

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील तलाठ्यास दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा…

18:33 (IST) 5 Jul 2023
लोहारा तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का; दहा गावांत जाणवला १.८ रिश्टर स्केल हादरा

लोहारा तालुक्यातील भूकंपप्रवण भागात बुधवारी सायंकाळी ४:३२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

सविस्तर वाचा…

18:12 (IST) 5 Jul 2023
भंडारा: अखेर पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द; नव्याने भरती प्रक्रिया घेण्यास शासनाची मान्यता

भंडारा: भंडारा उपविभागातील भंडारा आणि पवनी पोलीस पाटील पदभरतीत झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने तसेच पोलीस पाटील पदभरती समितीने मौखिक गुण देताना दुजाभाव केल्याचे दिसून येत असल्याने सदर पोलीस पाटील भरतीकरीता राबविण्यात आलेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने पोलीस पाटील पद भरतीची प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

सविस्तर वाचा…

17:51 (IST) 5 Jul 2023
वाशीम: मोल मजुरी केली, दोनवेळा अपयश आले; आता सुनील खचकड ‘पीएसआय’ परीक्षेत राज्यातून अव्वल

वाशीम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल ४ जुलै रोजी जाहीर झाला. यामधे वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ असलेल्या रंजितनगर लभान तांड्यावरचा सुनील खचकड हा राज्यात प्रथम आला आहे.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 5 Jul 2023
मुंबई : कोकण रेल्वेवर वीर आणि खेडदरम्यान ब्लॉक, चार रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

मुंबई : कोकण रेल्वेवरील वीर – खेड रेल्वे स्थानकांदरम्यान उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे चार रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

सविस्तर वाचा…

17:30 (IST) 5 Jul 2023
मद्यधुंद तरुणाची चालत्या बसवर दगडफेक; भंडारा बसस्थानकावर काही काळ तणाव

भंडारा : भंडारा बसस्थानक परिसरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात ड्रग्स-गांजाची विक्री होत असून त्यामुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनुचित प्रकार वारंवार घडत असतात. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस विभागाने याकडे डोळेझाक केली आहे. आजही भंडारा बस स्थानकावर नशेत झिंगलेल्या एका तरुणाने एसटी बसवर दगडफेक करून बसची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सविस्तर वाचा…

17:18 (IST) 5 Jul 2023
मोठी बातमी! अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव; पक्षचिन्ह आणि पक्षनावावर केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला होता. अशाचप्रकारचा दावा आता अजित पवार गटाने केला आहे. पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा करत अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले.

सविस्तर वाचा

17:17 (IST) 5 Jul 2023
“शिवसेनेचे हिंदुत्व अठरापगड जातींना घेऊन जाणारे, तर भाजपाचे हिंदुत्व…”; शरद पवारांची टीका

होय आम्ही शिवसेनेसोबत आघाडी केली. आणीबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. आणीबाणीनंतर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने उमेदवार उभे केले नव्हते. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. शिवसेना आणि भाजपामध्ये फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व अठरापगड जातींना घेऊन जाणारे आहे, तर भाजपाचे हिंदुत्व विखारी, विषारी आणि माणसा माणसांमध्ये दुही निर्माण करणारे आहे, अशी टीका शरद पवारांनी आज केली.

17:14 (IST) 5 Jul 2023
नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्यांचे वैशिष्ट काय, जाणून घ्या…

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या या नागपूर दौऱ्याबाबत अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टी घडत आहेत.

सविस्तर वाचा

16:59 (IST) 5 Jul 2023
बुलढाणा : ७ लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या, अडीचशे गावांत टंचाई, जुलैमध्येही टँकर सुरूच

बुलढाणा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून झालेल्या पेरण्या उलटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे जुलैमध्येही २५० गावांतील पाणी टंचाईची तीव्रता कायम असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

16:32 (IST) 5 Jul 2023
पुणे: जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करताना अडथळा; ग्रामसेवक महिलेला धक्काबुक्की

पुणे: जिल्हा परिषदेच्या जागेत झालेल्या अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या ग्रामसेवक महिलेला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना लाेणी काळभोरमधील नायगाव परिसरात घडली.

सविस्तर वाचा…

16:31 (IST) 5 Jul 2023
आव्हाड यांच्या मतदारसंघात अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फलक

ठाणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. बुधवारी कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे फलक उभारले आहे.

सविस्तर वाचा…

16:07 (IST) 5 Jul 2023
“मलाही दादांची ऑफर होती” आमदार शिंगणेंचा गौप्यस्फोट; ‘एमइटी’ च्या बैठकीलाही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

बुलढाणा: मंगळवार पाठोपाठ जिल्हा राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज मूळ पक्षाकडून आयोजित बैठकीला हजेरी लावली. मलाही अजित दादां कडून 'ऑफर' होती असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली.

सविस्तर वाचा

15:56 (IST) 5 Jul 2023
नाशिक : एक कॅमेरा पोलिसांसाठी… गुन्हेगारी नियंत्रणासाठी…

नाशिक – शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या कारवाया करण्यात येत आहेत. तरीही गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने आता गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी नागरिकांचे सहकार्य घेण्यात येत आहे. शहर परिसरात एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 5 Jul 2023
गडचिरोली: आदिवासी महिलांचा उच्च शिक्षणात वाढलेला टक्का आशादायी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गडचिरोली: विविध कारणांनी मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा उच्च शिक्षणात वाढलेला टक्का आशादायी आहे.

सविस्तर वाचा…

15:28 (IST) 5 Jul 2023
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उद्वाहन बंद असल्याने प्रवाशांचे हाल

डोंबिवली – गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे जिन्याकडे सरकणारे उद्वाहन बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे. उद्वाहन सुरू करा म्हणून अनेक प्रवाशांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

15:27 (IST) 5 Jul 2023
वर्धा: ‘सीए’ परीक्षेचा निकाल जाहीर, देशात प्रथम कोण? जाणून घ्या…

वर्धा : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी ए परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अहमदाबाद येथील अक्षय जैन हा देशात प्रथम आला आहे. त्याने ८०० पैकी ६१६ गुण प्राप्त केले आहे

सविस्तर वाचा

15:23 (IST) 5 Jul 2023
“राजीनामा मागेच घ्यायचा होता तर…”, बंडखोरीनंतरच्या पहिल्याच बैठकीत अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल

अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा होताच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी भावूक झाले. यावरून अनेकांनी शरद पवारांची समजूत काढली. त्यांनी निवृत्त होऊ नये, अशी विनंती होऊ लागली. मात्र, शरद पवारांच्या याच निर्णयावर अजित पवारांनी आता थेट हल्लाबोल केला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

15:13 (IST) 5 Jul 2023
संगीता बोरस्ते यांचा वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव

नाशिक – निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील संगीता बोरस्ते यांना वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी पुरस्काराने गौरविण्यात आले.

सविस्तर वाचा..

15:06 (IST) 5 Jul 2023
भंडारा: सोमनाळा बुज जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना; विद्यार्थी शाळा सोडण्याच्या मनस्थितीत

भंडारा : एकीकडे बेरोजगारी वाढत असताना आणि डी.एड, बी.एड केलेले तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी सरकारी शाळा ओस पडत चालल्या आहेत. पवनी तालुक्यातील कोंढा केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोमनाळा.

सविस्तर वाचा

14:52 (IST) 5 Jul 2023
मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा शरद पवारांना पाठिंबा

आजवर उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांना पाठिंबा असल्‍याची बाब समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

14:50 (IST) 5 Jul 2023
पुणे : पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पतीपासून वेगळ्या राहणार्‍या २४ वर्षीय पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या पुणे शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

14:49 (IST) 5 Jul 2023
नाशिक : मनमाड-दौंड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला वेग

मनमाड – उत्तर आणि दक्षिण भारत या दोन प्रदेशांना जोडणाऱ्या आणि विकासाचा मार्ग ठरणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. निम्म्याहून अधिक मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे.

सविस्तर वाचा…

14:46 (IST) 5 Jul 2023
सत्तेतील ‘दादा’प्रवेशाने ठाण्यात भाजप खुशीत

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडताच गेले वर्षभर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात अस्तित्वात आलेल्या ‘शिंदे’शाहीमुळे अस्वस्थ झालेल्या भाजप नेत्यांना रविवारी राज्यातील सत्तेत झालेल्या अजित पवार यांच्या प्रवेशामुळे मात्र आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 5 Jul 2023
“भाजपा-शिंदे गटातील नेत्यांना मला सांगायचंय की माझी प्रतिमा…”, अजित पवारांचं आवाहन

“वैयक्तिक स्वार्थाकरता हा निर्णय घेतला नाही. आजच्या बैठकीला काहीजण उपस्थित राहू शकले नाहीत. काही दवाखान्यात आहेत. काही तिकडच्या मिटिंगला गेले आहेत. असे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. मी कधीही भेदभाव केला नाही. उद्याच्याही काळात भेदभाव करणार नाही. भाजपा-शिवसेना शिंदे गटांतील आमदारांनाही सांगायचं आहे की माझी प्रतिमा महाराष्ट्रात दबंग नेता, एक कडक नेता, स्वतःला पाहिजे ते करतो अशी झाली आहे. परंतु मी तसं होऊ देणार नाही. सर्व जाती धर्माला, मुस्लिम असतील, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, तरुण असतील. मला दिसतंय बेरोजगारी, महागाई वाढली आहे. बेरोजगारी कमी करण्याकरता उद्योगधंद्याला पोषक वातावरण निर्माण करायचं आहे. विरोधात बसून हे वातावरण होऊ शकत नाही”, असं अजित पवार बैठकीत म्हणाले.

14:21 (IST) 5 Jul 2023
KEM रुग्णालयातील एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी यंत्र खरेदी प्रलंबित; मध्यवर्ती खरेदी खात्याच्या विलंबामुळे रुग्ण सेवेत अडचणी

मुंबई: केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने वैद्यकीय उपचार करता यावे यासाठी एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय रुग्णालयीन प्रशासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 5 Jul 2023
VIDEO: “सकाळी उठलो आणि चला चला मंत्रीपदाची शपथ घेऊ असं…”, बंडानंतर छगन भुजबळांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटांकडून बुधवारी (५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवारांच्या गटाला नियुक्त्यांचे अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला. यानंतर आता अजित पवार गटातील बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी आम्हालाही कायदे कळतात असं म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 5 Jul 2023
“आयत्या आमदारक्या लाटणारे आम्ही नाही, त्यामुळे त्यांनी…”, शरद पवार गटाच्या नेत्याचा हल्लाबोल, म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गट आणि अजित पवार यांचा गट समोरासमोर आलेला पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून आता जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे. बुधवारी (५ जुलै) मुंबईत दोन्ही गटांकडून बैठका घेत शक्तीप्रदर्शन होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra Live Updates :  राज्यातील घडामोडी वाचा एका क्लिकवर