List of Shivsena MLAs who are in Guwahati Assam with Eknath Shinde: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रातोरात या आमदारांनी आपला मुक्काम थेट गुवहाटीला हलवला आहे. शिंदे हे आज पहाटेच्या सुमारास गुवहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत. यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत. हे आमदार कोण आहेत याची सविस्तर माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी फोनवरुन चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आलं आहे. मात्र या चर्चेनंतरही एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना गुजरातमधील सुरतहून थेट आसामधील गुवाहाटी येथे घेऊन गेल्यामुळे शिंदे- ठाकरे यांची चर्चा निष्फळ ठरल्याचे अंदाज बांधले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच सात अपक्ष आमदार आहेत. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचादेखील समावेश आहे.

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Vasai, Bhayandar police , Vasai, Bhayandar police force,
वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : “गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी…”; भाजपाला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणत शिवसेनेचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असा विश्वास बच्चू कडू यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केला होता. मात्र आता तेच बंडखोर आमदारांमध्ये सहभागी झालेत. शिवसेनेचे हे ३३ बंडखोर आमदार कोण आहेत पाहूयात…

शिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे –

१) महेंद्र थोरवे (कर्जत)
२) भरत गोगावले (महाड)
३) महेंद्र दळवी (अलिबाग)
४) अनिल बाबर (खानापूर)
५) महेश शिंदे (कोरेगाव)
६) शहाजी पाटील (सांगोळा)
७) शंभूराज देसाई (पाटण)
८) बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
९) ज्ञानराजे चौघुले (उमरगा)
१०) रमेश बोरणारे (विजापूर)
११) तानाजी सावंत (परांडा)
१२) संदिपान भुमरे (पैठण)
१३) अब्दुल सत्तार (सिल्लोड)
१४) नितीन देशमुख (अकोला)

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

१५) प्रकाश सुर्वे (मागाठणे)
१६) किशोर पाटील (जळगाव)
१७) सुहास कांदे (नांदगाव)
१८) संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
१९) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)
२०) संजय रायुलकर (मेहकर)
२१) संजय गायकवाड (बुलढाणा)
२२) एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)
२३) विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
२४) राजकुमार पटेल (मेळघाट)
२५) शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
२६) श्रीनिवास वनगा (पालघर)
२७) प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
२८) प्रकाश अबिटकर (राधानगरी)

नक्की वाचा >> राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”

२९) चिमणराव पाटील (एरंडोल)
३०) नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)
३१) लता सोनावणे (चोपडा)
३२) यामिनी जाधव (भायखळा)
३३) बालाजी किनीकर (अंबरनाथ)

Story img Loader