Mumbai News Updates Today : राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. एकीकडे विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहे, तर दुसरीकडे काही मुद्द्यांवर महाविकासआघाडीतच मतभेद झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मविआच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी शरद पवारांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली. अशातच अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांनाही उधाण आलं. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह प्रत्येक घडामोडीचा हा आढावा…
Maharashtra Political Crisis Live Updates, 13 April 2023 : राजकारणासह राज्यातील दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट…
नाशिक : शहरात शिवसेनेने अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची मोहीस सुरु ठेवल्यानंतर आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला बळ देण्यासाठी हालचाली होऊ लागल्या आहेत. त्यानुसार शहरात रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिल अखेरीस महिला मेळावा होणार आहे.
शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यभरात सहा वज्रमूठ सभा आयोजित केल्या आहेत. यातील पहीली वज्रमूठ सभा संभाजीनगर येथे पार पडली.
पुणे: पूर्वीच्या काळी संकुचित वृत्तीचा लवलेश नव्हता. शाहिरांनी संतांवर, पंढरीवरही लावण्या केल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत कीर्तनकारांनी संसार म्हणजे मिथ्या आणि शृंगार हा विषय त्याज्य आहे असा प्रचार केला. परंतु, शृंगार नाकारणे, लावणीकडे तुच्छतेने पाहणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
वर्धा: संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची विराट सभा झाली होती. त्याचा धसका भाजपने घेतला आहे. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत आडवे येत आहे. सभा फोल ठरावी म्हणून त्यांचा आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला. पण सभेसाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. ही सभा विक्रमी व यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला.
शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे शिवसैनिकाचं वर्णन असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होतं. यांना दाढी असेल तर ते शौर्य यांनी दाखवलं पाहिजे. मात्र, ते घाबरून गेले आणि इतरांनाही घाबरवलं. त्यावेळी निघून गेलेल्या आमदार आणि खासदारांपैकी निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू होत्या. ते घाबरूनच गेले आहेत. आता तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे.
– संजय राऊत (खासदार, ठाकरे गट)
चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्या पोलिसावर त्याने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार पवई येथे बुधवारी घडला. या हल्ल्यात पोलीस शिपायाच्या छातीवर गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी हत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या ‘फाईव्ह-जी’च्या काळातही ६० टक्के लोक ‘डिजीटल’ साक्षर नाहीत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी अनेकजण सहज सावज ठरत आहेत. देशात सायबर गुन्हेगारीत तेलंगणाचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यात स्मार्ट महाराष्ट्र पोलिसांना अपयश येत असल्याची माहिती समोर आली आहे.
चौफेर वैशाख वणवा पेटला असताना तिकडे ताडोब्याच्या घनदाट जंगलात मात्र वाघाचे जोडपे प्रेमाचा अलवार 'गारवा' शोधत आहेत.ताडोबा झरी पेठ / केसलाघाट वनक्षेत्रात मध्ये 'के मार्क' वाघीण आणि 'ज्युनिअर मोगली' उर्फ 'ओंकारा' वाघाच्या अशाच मंदावलेल्या हालचाली टिपल्या आहेत वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंह यांनी.
वेतन मिळण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार करीत गुरूवारी सकाळपासून वाहक अकस्मात संपावर गेल्यामुळे महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा ठप्प झाली. अनेक शाळा व महाविद्यालयांत परीक्षा सुरू आहेत.
मंदिरालगतचे मोठे वृक्ष छतावर कोसळून भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पारसमध्ये नुकतीच घडली. नागपूर शहर व जिल्ह्यातही धार्मिक स्थळाच्या सभामंडपालगत किंवा इतर मोठ्या इमारतींना लागून मोठे वृक्ष आहेत.
आदित्य ठाकरेंनी रडायचे हा शब्द चुकीचा वापरला आहे. आम्ही सर्वच आमदार स्वतः उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. आपल्याला या आघाडीत राहायचं नाही असं सांगितलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक आपल्याला त्रास देत आहेत. निधी किंवा इतर कामात ते आपल्याला सहकार्य करत नाहीत हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. आमच्याकडून रेटलं जात नव्हतं, म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंना सांगितलं की, तुम्ही आमचे गटनेते आहात, तुम्ही त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे मातोश्रीवर निश्चित गेले असतील, परंतू ते हे म्हणायला नाही, तर आघाडीतून बाहेर पडा ही सर्व आमदारांची इच्छा आहे हे सांगायला गेले असतील.
– संजय शिरसाट (शिंदे गटाचे आमदार)
नागपूर: गोमूत्रात ‘ई-कोलाय’सह १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू असतात. त्यामुळे थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन संस्थेला सादर करण्यात आले असून ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. या धक्कादायक निष्कर्षामुळे गोमूत्रावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
पुणे: फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर पुढील महिन्यात मेट्रोची सेवा सुरू होणार आहे. असे असले तरी खडकी आणि रेंजहिल्समधील नागरिकांना मात्र या सेवेचा फायदा होणार नाही. कारण या मार्गांवरील ही दोन्ही स्थानके मेट्रो सेवेतून सध्या वगळण्यात आली आहेत.
वर्धा: आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे पाऊल टाकले आहे.
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे आता मेट्रोने जोडली जाणार आहेत. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून, त्यानंतर लवकरच या मार्गावर या सेवा सुरू होणार आहेत. यासाठी मे महिन्याच्या मध्यातील मुहूर्त निघण्याची चिन्हे आहेत.
आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं ते सत्य आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन 'मला तुरुंगात जायचं नाही, मला अटकेची भीती वाटते' सांगितलं होतं. त्यांनी अशाप्रकारची चर्चा याच माझ्या मैत्री बंगल्यावर येऊन माझ्याशीही केली होती. तेव्हा आम्ही त्यांना वारंवार समजावत होतो की, आपण प्रसंगाला सामोरं जावं. आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस आहोत. मी त्यांना सांगितलं की, माझ्यावरही असा प्रसंग येईल, मला अटक करतील अशी भीती आहे. मात्र, मी अटकेच्या तयारीत आहे.
– संजय राऊत (खासदार, ठाकरे गट)
ठाणे: घोडबंदर भागातील गृहसंकुलांसाठी ५० दशलक्ष लीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर झाला असला तरी तो कागदावरच असल्याने येथील ३० गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार संजय केळकर पालिका कारभारावर प्रश्न उपस्थित करत पाणी समस्येवर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे.
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शहर परिसरातील अनुयायांची गर्दी होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी वाहतूक बदल करण्यात येणार असून या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. कॅन्सरसह अनेक आजारांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीयेत. त्यामुळे डॉक्टरांच्या चिंता वाढल्या आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पुतिन यांना स्पष्ट दिसत नाहीये. तसेच तीव्र डोकेदुखीसह त्यांची जीभही सुन्न झाली आहे. त्यामुळे त्यांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या चिंता वाढल्या आहेत. डॉक्टरांनी सध्या पुतिन यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला माध्यमं त्यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत.
Sushma Andhare on Aaditya Thackeray Statement: गेल्या ९ महिन्यांपासून राज्यात एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट याचीच चर्चा रंगली आहे. त्या घटनाक्रमाबाबत अनेक दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. यासंदर्भात ठाकरे गट आणि शिंदे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुंदोपसुंदी चालू असतानाच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.