Mumbai News Updates Today : राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. एकीकडे विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहे, तर दुसरीकडे काही मुद्द्यांवर महाविकासआघाडीतच मतभेद झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मविआच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी शरद पवारांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली. अशातच अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांनाही उधाण आलं. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह प्रत्येक घडामोडीचा हा आढावा…
Maharashtra Political Crisis Live Updates, 13 April 2023 : राजकारणासह राज्यातील दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट…
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर क्षेत्रात रात्रीच्या वेळेत होणाऱ्या पार्ट्या आणि गोंगाटाला आता आळा बसण्याची शक्यता आहे. येऊरचे प्रवेशद्वार रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत बंद करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभाग आणि पोलिसांना दिले.
ठाणे : महापालिका क्षेत्रातील वाढती बांधकामे आणि वाहन संख्येमुळे धुळ प्रदुषणात वाढ होत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने आता पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धुळ प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने नवी नियमावली तयार केली आहे.
एकाच दिवशी मुंबई विद्यापीठाची सहाव्या सत्राची परीक्षा आणि त्याच दिवशी लग्नाची तारीख. त्यामुळे विवाह सोहळयाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असताना, कल्याण तालुक्यातील वरप गावातील नववधू असलेल्या एका विद्यार्थीनीने गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता तीन तासाचा अर्थशास्त्राचा पेपर दिला. ती त्यानंतर थेट विवाह मंडपात विवाहासाठी हजर झाली.
बुलढाणा पालिकेच्या सुमारे एक वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या विकासकामांचा आढावा आमदार धीरज लिंगाडे यांनी बुधवारी घेतला. विधानपरिषद सदस्य लिंगाडे आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात दीड तास चाललेली बैठक वादळी ठरल्याचे वृत्त आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथे एका ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पाच-सहा पादचारी महिलांना धडक दिली. या अपघातात एक महिला मृत्युमुखी पडली असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महत्त्वाचे प्रकल्प आजपासून (गुरुवार) वाहतूक सेवेत दाखल होत आहे. छेडानगर जंक्शनवरील १२३५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या, तसेच कपाडिया नगर – वाकोला नाला दरम्यानच्या ३.०३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाच्या रखडलेल्या लोकार्पणासाठी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मुहूर्त मिळाला.
चंद्रकांत पाटलांच्या बोलण्यात हुकुमशाहीची वाटचाल दिसते. त्यांनी कोण धंगेकर यासारखी अनेक विधानं केली आहेत. परवा बाबरी मशिदीवरून शिवसैनिकांवर घसरले. ते आता काहीही बोलू शकतात. आमच्या हातात सत्ता आहे आणि कुणालाही उद्ध्वस्त करू शकतो, अशी त्यांची बेताल वक्तव्ये आहेत. हा पाहुणा आपल्याकडे आला आहे, तो किती दिवस सांभाळायचा एवढाच विषय आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोल्हापूरला पाठवायचं का हा पुणेकरांचा विषय आहे.
– रवींद्र धंगेकर (आमदार, काँग्रेस)
‘डोळे’ ही इश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी. आताच्या काळात ‘अमृत’ पिऊन अमरत्व प्राप्त करता येत नसले तरी आयुष्यात आपण केलेली चांगली कामे मरणानंतरही अमरत्व प्राप्त करून देतात! याचेच उदाहरण म्हणजे कलाबाई निंबाळकर.

भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणीसाठी फोन करणारा जयेश पुजारी ऊर्फ सलीम शाहिर हा बेळगाव कारागृहात बंदिस्त असलेल्या दाऊद गँगच्या दोन सदस्यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने दाऊद गँग, अल-कायदा, पीएफआय आणि लष्कर- ए- तोएबा यांच्याकडून आसाममध्ये शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
आता माझ्यावरील प्रश्न मी कसा विचारणार? मलाच स्वतःला हा प्रश्न पडला आहे. स्थानिक लोकांच्या आर्थिक उलाढाल वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून होत आहे. माझ्यासाठी तो कारखाना नसून गोपीनाथ मुंडे यांची समाधी आहे. मी त्यासाठी समर्पितपणे काम करत असते.
– पंकजा मुंडे (भाजपा नेत्या)
बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून अजूनही वंचित आहेत. यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज संतप्त शेतकऱ्यांसह कृषी कार्यालयात ठिय्या मांडला.आज, गुरुवारी दुपारी करण्यात आलेल्या या अनपेक्षित आंदोलनामुळे कृषी व पीक विमा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
‘डोळे’ ही इश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी.अशा स्त्रिया मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत ही मध्ययुगीन पुराणमतवादी मानसिकता घटस्फोटीत नोकरदार स्त्रीलाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
मार्च उलटून १२ दिवस होऊनही येथील शासकीय कोषागारात कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व शासकीय कार्यालये आणि यंत्रणा यांना ठरवून दिलेला निधी खर्च करण्याची मुदत असते. या शेवटच्या दिवशी कोषागारात १९५ कोटींची ३९५ देयके सादर करण्यात आली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. त्यांच्या पदाचा अधिकाधिक लाभ करून घेण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मगण्यांचा सपाटाच लावला.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला भाजपचा नाही ,तर स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. विरोधकांनी आमच्या नेत्याबद्दल वैयक्तिक टीका केल्यास आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला ,
गर्भवती महिलांची ठराविक कालावधीमध्ये सोनोग्राफी चाचणी करावी लागते. गर्भवती महिला व बालरुग्णांची कामा रुग्णालयामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सोनोग्राफी करण्यात येत होती.
गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील मूळ ६७२ रहिवाशांची थकीत घरभाडे देण्याची मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. रहिवाशांना दर महिना २५ हजार रुपयांप्रमाणे २०१८ पासूनचे घरभाडे देण्याच्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रस्तावाला गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मान्यता दिली असून बुधवारी यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानावर शासनाकडून मदतीची फुंकर देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चार कोटी ४९ लाख ८५ हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तीन हजार ६५१ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येईल.
चार जिल्ह्यात क्रिकेट सट्टा चालविणारी टोळी जाळ्यात अडकली असून सूत्रधार आरोपीस बुटीबोरी येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक भामटीपुरा येथील गणेश राठी हा सार्वजनिक ठिकाणी झाडाच्या ओट्यावर बसून सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील तीन मेट्रो स्थानकांचे अखेर नामांतर करण्यात आले. रहिवाशांच्या मागणीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलली आहेत. त्यानुसार आता पहाडी गोरेगाव मेट्रो स्थानक बांगुर नगर मेट्रो स्थानक या नावाने ओळखले जाणार आहे.

ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह गुवाहाटीला गेले होते, त्यावेळेस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना सतत फोन करत होते आणि मुख्यमंत्री वाचविण्यासाठी रडत होते, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. दिल्लीप्रमाणे राज्यातही पप्पू तयार झाला आहे, असा आदित्य यांचा उल्लेख करत त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे सातत्याने होणारे नुकसान व नापिकीला कंटाळून चिंचोली गणू येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतकरी शांताराम मोतीराम गव्हाळे (५४) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील चार वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीतील घरांची संख्या आणि किंमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील ३८२० घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून सर्व उत्त्पन्न गटातील घरांचा यात समावेश आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने गुरुवार, २७ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला. अटकपूर्व जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर अटक टाळण्यासाठी हनस मुश्रीफ यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवता, तर मग बाळासाहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? असा सवाल त्यांनी शिंदे गटाला विचारला होता. तसेच बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्या मंत्रिमंडळात असतील, तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात, असे ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपने कर्नाटकच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केली असली तरी, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या हुबळी-धारवाड (मध्य) विधानसभा मतदारसंघाचा समावेश केलेला नाही.
संघर्ष यात्रेसाठी विनापरवानगी गर्दी जमवल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आमदार नितीन देशमुख यांनी श्री राजराजेश्वर मंदिरासमोरून जिल्ह्यातील ६९ गावे पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली.
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी (१३ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.