Maharashtra Political Crisis Updates in Marathi : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. तर ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. राज्यातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट हे एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today, 29 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…
वसईत मोबाईल खेळण्याच्या नादात एका साडेतीन वर्षीय मुलीचा तोल जाऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वसईच्या पश्चिमेला असलेल्या अग्रवाल कॉम्प्लेक्स मधील रेजन्सी वीला या इमारतीत आज (शुक्रवार) सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गट आणखी एक धक्का देण्याच्या तयारी आहे. उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी काही दिसवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
सरकारी एमबीबीएस डॉक्टरसह तीन जणांना नक्षल समर्थक म्हणून पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसाची गस्त सुरू असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे बॅनर लावताना हे तिघे सापडले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा एमबीबीएस डॉक्टर पवन उईके, प्रफुल्ल् भट व अन्य एकाचा समावेश आहे. डॉक्टरसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…
शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावल्यानंतर म्युचअल फंडचे बनावट दस्तऐवज तयार करून ७९ नागरिकांची तब्बल १८ कोटी ५६ लाख ७३ हजार ६३४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ऋषभ राजेश सिकची (२७) रा. बियाणी चौक यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असंही त्यांनी सुनावलं आहे.
लोणावळ्यात दोन वर्षांच्या बालकाचा बंगल्यातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर तुंगार्ली भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात वीजेच्या धक्क्याने १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याप्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रशेखर गणपत जाधव (वय-६०, रा. कर्वे रस्ता, पुणे) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
३१ जुलैच्या आत मालमत्ता कराची रक्कम भरणा करणाऱ्या नागरिकांना पालिका पाच टक्के सवलत देते. पालिकेतील ऑनलाईन सेवेतील तांत्रिक अडचणी, नागरिकांचा सवलतीमुळे कर भरण्याचा उत्साह पाहून प्रशासनाने ३१ जुलै ऐवजी सवलतीत कर भरणा करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी १७३ जागांपैकी ४६ जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी (ओबीसी) शुक्रवारी आरक्षित करण्यात आल्या. नव्याने काढलेल्या आरक्षणात बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांना दिलासा मिळाला असला तरी काही माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची संख्या यामध्ये जास्त असून बदललेल्या आरक्षणामुळे कुटुंबातील महिला सदस्याला उमेदवारी द्यावी लागेल किंवा दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, आरक्षण निश्चित झाल्याने निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर बातमी…
रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी खासदार अनिल बोंडेंची यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांना आलेल्या पत्रासंदर्भात ते बोलत होते. तसेच राणा यांना आलेली धमकी गमतीने घेऊ नये, असेही ते म्हणाले.
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात सरासरी भरून काढलेल्या पावसाची त्यापेक्षा अधिकची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जुलैअखेरीस जिल्हा अखेर टँकरमुक्त झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…
अंबरनाथ पूर्वेतील वडवली परिसरात शुक्रवारी दुपारी शिवसेना शाखेसमोर सख्या भावांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तुषार गुंजाळ असे मृताचे नाव असून त्याचा भाऊ गणेश गुंजाळ हा जखमी झाला आहे.
‘मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनांना भरे कापरे…’ या गीताचे समूहगान करीत सहा शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांनी आज (शुक्रवार) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभराव्या जन्मदिनानिमित्त अनोखी मानवंदना दिली. पुरंदरे यांचा जन्म झालेल्या शुक्रवार पेठेतील शिर्के वाडा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. वाचा सविस्तर बातमी…
आगामी पालिका निवडणुकीसाठीचे सर्वसाधारण महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासहचे एकूण ४४ प्रभागांमधील आरक्षण शुक्रवारी पालिका निवडणूक आयोगाने सोडत पध्दतीने जाहीर केले. नागरिकांच्या मागास प्रवर्गामुळे निवडणूक लढविण्यात असलेली संदिग्धता आज खऱ्या अर्थाने संपली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या स्तरावर राबविण्यात येणार असून याअंतर्गत प्रभात फेरी, चित्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, ऐतिहासिक स्थळांना भेटी यांसारख्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
घोडबंदर येथील नागलाबंदर भागात हत्यार बाळगल्याप्रकरणी नरेंद्र मकवाना (२९) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि एक गुप्ती जप्त केली आहे.
घाटकोपर- ठाणे या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या ठाणे शहरात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील ओवळा सिग्नल ते सीएनजी पंप पर्यंत मार्गिकेवर तुळई (गर्डर) टाकण्याचे काम केले जात आहे.
पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता पावसाने विश्रांती घेतल्याने प्रवासाती कसरत कमी झाली असली तरी खड्डे भरण्याच्या कामात मातीचा भरमसाठ वापर केल्याने आता रस्त्यांची धुळधाण झाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव भागातील ज्योतीनगर झोपडपट्टीतील जलकुंभा जवळ पिस्तुल बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेबारा वाजता शिताफीने अटक केली. या तरुणाला पकडल्यानंतर ज्योतीनगर भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
महापालिका निवडणुकीसाठी यापुर्वी जाहीर करण्यात आलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण क़ायम ठेवत र्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले.
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरात भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक लोकवस्तीच्या गरीबाचापाडा प्रभागात गे्ल्या काही दिवसांपासून विजेचा सकाळपासून दिवसभर लपंडाव सुरू राहत असल्याने रहिवासी हैराण आहेत. घरातून कार्यालयीन काम करणाऱ्यांना या लपंडावाचा सर्वाधिक फटका बसतो.
सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत ओबीसी सदस्यांसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. यात ओबीसींसाठी २४जागा आरक्षित करण्यात आल्या. एकूण ८९ सदस्य संख्या असलेल्या उल्हासनगर महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षण मिळाले होते. या आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसला आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. असे असले तरी निवडणुकीचा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत जाहीर केला जाणार नाही, अशी हमी राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला न्यायालयात द्यावी लागली.
कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिका हद्द आणि उल्हासनगर पालिका हद्दीतील आशेळे-माणेरे गावांमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये दुचाकी आपटून एका ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वासू राम वच्छानी (७०) असे अपघातात गंभीर जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या आणि घराजवळ सोडणाऱ्या शालेय बसगाड्या, व्हॅनचे चालक-मालक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत आहे. या गाड्यांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येत असून अग्निसुरक्षेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे.
माजी मंत्री अमित देशमुख यांची बनावट सही करून मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात नोकरी लावतो, असे म्हणून एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभम पाटील नावाच्या व्यक्ती विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत एकनाथ गित्ते यांनी याबाबत देहू रोड पोलिसात तक्रार दिली असून ६ लाख ६६ हजारांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
अनोळखी तरुणीशी झालेली मैत्री एका तरुणाला महागात पडली. मैत्रीच्या आमिषात (हनी ट्रॅप) अडकवून तरुणी आणि साथीदारांनी तरुणाकडून ६७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर दोघा सराइतांना अटक करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…
राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार हे संजय राऊत यांच्यामुळेच आले असल्याची खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरे घरी बसले असून त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.