Maharashtra Political Crisis Updates in Marathi : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. तर ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. राज्यातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट हे एका क्लिकवर…
Maharashtra News Today, 29 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…
ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता “तंटामुक्त हाउसिंग सोसायटी अभियान” यासंदर्भात मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्याापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला.
वृषाली तुषार थिटे (वय ३८, रा. सुदत्त संकुल, शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे.
माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक जयस्वाल राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात अजित पवार यांनी जयस्वाल यांना खडे बोल सुनावले. तेव्हापासून ते कमालीचे अस्वस्थ आहेत.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले मार्गावर काही दिवसांपुर्वी वृक्ष छाटणीची कामे करण्यात आली असून छाटणी केलेल्या फांद्या तसेच पालापाचोळा उचलण्यात आलेल्या नसल्यामुळे त्यांचे रस्त्याकडेला ढिग लागल्याचे चित्र होते.
महावितरणाकडून एकीकडे वीज बिलांची वसुली आग्रही पद्धतीने केली जात असतानाच वीज चोरी करणाऱ्यांचाही छडा लावला जातो आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसात उल्हासनगरात वीज चोरी करणाऱ्याविरूद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून मुंबई विमानतळ परिसरातील उभ्या राहिलेल्या ४८ इमारतींवरील कारवाई अटळ आहे. उंचीचे नियम मोडून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या मजल्यांवरील पाडकामाची कारवाई कशी करणार ? असा प्रश्न करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
रिक्षासाठी खुले केलेले परवाने त्वरित रद्द करावे, मॅक्सीकॅबला वेसण घालावी आदी विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीची शनिवारी मुंबईतील काळबादेवी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत झालेला शिक्षक भरतीचा घोटाळा आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. हा घोटाळा उघडकीला आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीने चौकशी करून अधिक माहिती घेण्यासाठी बोलावले असून, या शिक्षक भरती घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला संशय आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा फटका माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांना बसला आहे. या सर्वांचे प्रभाग आरक्षित झाले असून आगामी निवडणूक लढविण्यासाठी या मंडळींना आसपासच्या प्रभागात चाचपणी करावी लागणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावलाय. ते वर्धा जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणाऱ्या कथित अल्पसंख्यांक व्यक्तीने याबाबत खासदारांना पत्र पाठवून महिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात मागील २८ दिवसांच्या कालावधीत तब्बल १६५३.५० मिमी इतका पाऊस झाल्याने जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १५६.८० टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद ही अंबरनाथ तालुक्यात करण्यात आली आहे.
“जगातील वाघांच्या एकूण संख्येच्या तुलनेत भारतात ७५ टक्के वाघ आहेत. त्यादृष्टीने भारत मोठी शक्ती आहे, असे केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव म्हणाले. वाचा सविस्तर बातमी…
शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रती खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
केंद्र सरकारने आधीच अन्नधान्यांवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावून व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा टाकला आहे. त्यातच आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्याने काही वस्तूंवर सेस लावल्याने त्यात आणखी भर पडणार आहे, त्यामुळे बाजार समितीने सेस त्वरित रद्द करावा
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरात कीटकजन्य आजारांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. जुलै महिन्यात शहरात ५२ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे.
भाजपा नेत्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना संबंधित ट्वीट तात्काळ डिलीट करण्याचा आदेश दिला आहे. गोव्यातील एका रेस्तराँ प्रकरणी हे आरोप करण्यात आले आहेत. हा रेस्तराँ स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचा असून यामध्ये बेकायदेशीरपणे मद्यालय चालवलं जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. स्मृती इराणी यांनी याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोर्टाने काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांना समन्स बजावलं आहे.
राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना येत्या ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल .
जिल्ह्यात २४ तासांत एक करोनाग्रस्ताचा मृत्यू तर २६९ नवीन रुग्णांची भर पडली. सातत्याने येथे रुग्ण वाढत असतानाच आता शासकिय रुग्णालयात (मेडिकल ) अपघात, विषबाधासह इतर कारणांनी दगावलेल्यांमध्येही करोना असल्याचे आढळत आहे. गेल्या महिन्याभरात येथे असे सहा रुग्ण नोंदवले गेले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ६३ प्रभाग आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी ३२ प्रभाग इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. प्रभाग आरक्षित झाल्यामुळे काही माजी नगरसेवकांना आगामी निवडणूक लढविण्यासाठी अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथील शेतकरी शेतात जात असताना रानडुक्कराच्या एका कळपाने त्यांना धडक दिली. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना फुरडी – हेटी गावालगत आज, शुक्रवारी घडली.फुरडी हेटी, वढोली शेतशिवारात रानडुक्करांनी हैदोस घातला आहे.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले. यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांचे हे ट्वीट म्हणजे ”आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा आशयातचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कांदिवली पूर्व येथे गुरुवारी २७ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या प्रियकराला कुरार पोलिसांनी अटक केली. या महिलेच्या डोक्यावर आणि गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर अखेऱ शिदें गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत त्यांनी कोणतंही अधिकृत विधान त्यांनी केलं नव्हतं. मात्र आज सकाळी अर्जुन खोतकर दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ३१ जुलैला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती आहे.
वारंवार आदेश देऊनही अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिफारस करणारी समिती स्थापन करण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने ही समिती स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला १९ ऑगस्टपर्यंत मुदत दिली.
इयत्ता बारीवीच्या विद्यार्थिनीचे वर्गमित्राशी सूत जुळल्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, मुलगी गर्भवती झाल्यामुळे दोघेही घाबरले. बदनामी होऊ नये म्हणून विद्यार्थिनीने परस्पर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या तपासणीत मुलीचे बिंग फुटले. वैद्यकीय अहवालावरून मुलीच्या वर्गमित्रावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दीपक मसराम ( पाचगाव, ता. उमरेड) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर आता पालिका निवडणुकांसाठीही हेच पर्यटनाचे सुत्र इच्छुक नगरसेवकांनी अवलंबण्यास घेतले आहे. ओबीसी आरक्षणाची सोडत पूर्ण झाल्यानंतर प्रभागांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पावसाळ्याचा मुहुर्त साधत अनेकांनी मतदारांसाठी वर्षा सहलींचे आयोजन केले आहे. याच्या जाहिरातीसाठी राज्यात गेल्या काही दिवसात गाजलेल्या ‘काय झाडी, काय डोंगर’ या संवादाचाही आधार घेतला जातो आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यात आढळलेल्या मंकीपॉक्सच्या दहा संशयित रुग्णांपैकी आठ जणांना या आजाराची बाधा झालेली नाही, असे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोघांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करुन दुचाकी, चारचाकी चालविणाऱ्या २५ हून अधिक वाहन चालकांवर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने कारवाई केली. या दुचाकी स्वारांकडून दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असा एकूण ७० हजार रूपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली. वाचा सविस्तर बातमी…
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरून मतदान होते. मात्र, तेच मतदार पालिका निवडणुकीत शिवसेनेकडे पाठ फिरवतात. मोठ्या निवडणुका व स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला वेगवेगळा कौल मिळतो, ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासारखे ताकदीचे नेतेही आता पक्ष सोडून गेले. ते असतानाच पक्षाचे तीन तेरा वाजले होते. आता त्यांच्याशिवाय पालिका निवडणुकांना सामोरे जाताना काय चित्र असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वाचा सविस्तर बातमी…