Maharashtra Political Crisis Updates in Marathi : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. तर ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. राज्यातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट हे एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 29 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

11:37 (IST) 29 Jul 2022
टीव्ही बघण्याच्या नादात उंदरांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी टॉमेटो खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

उच्छाद घालणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी विषारी औषध लावलेला टोमॅटो टीव्ही बघण्याच्या नाद्यात चुकून मॅगीमध्ये टाकून खाल्ल्यामुळे मालवणीत २७ वर्षांच्या महिलेचा बुधवारी मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणी उघड झाले.

सविस्तर बातमी…

11:32 (IST) 29 Jul 2022
डोंबिवली : पिसाळलेल्या श्वानाने तब्बल १२ जणांना घेतला चावा; तीन लहान मुलांचाही समावेश

डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली, गोग्रासवाडी भागात एका पिसाळलेल्या श्वानाने १२ जणांना चावा घेतला. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पिसाळलेला श्वान पकडून नेण्यात यावा म्हणून पालिकेत अधिकाऱ्यांना तीन दिवस संपर्क करुनही प्रतिसाद मिळाल नाही, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. वाचा सविस्तर बातमी…

11:27 (IST) 29 Jul 2022
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या या भेटींवरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका असा सल्लाच त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

सविस्तर बातमी

11:26 (IST) 29 Jul 2022
कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्यानंतर आणखी एका तरुणाची हत्या, १४४ कलम लागू

कर्नाटकमधील मंगळुरु जिल्ह्यात अज्ञातांनी एका २३ वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी हत्या केली. दक्षिण कन्नडमधील भाजपाच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येनंतर तणाव असतानाच ही हत्या घडली आहे. प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. दरम्यान तरुणावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी

11:16 (IST) 29 Jul 2022
चंद्रपूर : फुटपाथवर टोपली विकणाऱ्या आईचा मुलगाही भविष्यात मंत्री देखील होऊ शकतो – अजित पवार

“फुटपाथवर टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा आमदार होऊ शकतो. भविष्यात राज्याचा मंत्री देखील होऊ शकतो.”, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. अजित पवार हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेत ‘अम्मा का टिफिन’ या उपक्रमाबद्दल माहिती घेतली. वाचा सविस्तर बातमी…

11:04 (IST) 29 Jul 2022
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू : मुंबई – नवी मुंबई दरम्यानच्या जलद प्रवासासाठी वर्षभराची प्रतीक्षा

मुंबई पारबंदर प्रकल्पातील शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सागरी सेतूमुळे नवी मुंबईतून अवघ्या २० मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचणे शक्य होईल, असा आशावाद महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा

11:03 (IST) 29 Jul 2022
अतिवृष्टी बाधितांच्या मदतीवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली

राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा

10:59 (IST) 29 Jul 2022
पुणे : पंधरा दिवसात रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने फसवणूक

पंधरा दिवसात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने ३० ते ३५ महिलांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:51 (IST) 29 Jul 2022
ठाणे : ओबीसी आरक्षणाचा कुणाला होणार फायदा तर कुणाला बसणार फटका

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी आज, शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये सोडतीद्वारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे या आरक्षणाचा कुणाला होणार फायदा तर कुणाला बसणार फटका, हे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:41 (IST) 29 Jul 2022
मुंबईमधील २३६ प्रभागांतील आरक्षण आज निश्चित होणार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

10:26 (IST) 29 Jul 2022
मंत्रिमंडळ विस्तार विलंबावरुन नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी होणाऱ्या विलंबामुळे विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सराकारवर निशाणा साधला आहे.

वाचा सविस्तर बातमी

10:24 (IST) 29 Jul 2022
‘राक्षसी महत्त्वाकांक्षेने स्थापन केलेलं सरकार’ म्हणत आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकावर निशाणा

ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवरही टीका केल्याचं पहायला मिळालं.

वाचा सविस्तर बातमी…

10:22 (IST) 29 Jul 2022
नागपूर : आमदार विकास ठाकरेंविरुद्ध काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ‘दिल्लीवारी’

काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांना ताबडतोब शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी ठाकरे यांचे पक्षांतर्गत विरोधक दिल्लीत वरिष्ठ नेत्याला भेटून नागपुरात परतले. वाचा सविस्तर बातमी…

10:21 (IST) 29 Jul 2022
पुणे : १ ऑगस्टपासून प्रस्तावित करण्यात आलेली रिक्षाची भाडेवाढ स्थगित

सीएनजी दरवाढीमुळे १ ऑगस्टपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेली रिक्षाची भाडेवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही रिक्षा संघटनांनी आक्षेप घेतल्याने या भाडेवाढीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणाचे सचिव डॉ. अजित शिंदे यांनी दिली. वाचा सविस्तर बातमी…

10:20 (IST) 29 Jul 2022
Pimpri-Chinchwad municipal election : पिंपरी पालिकेची आज ओबीसी आरक्षण सोडत

आगामी महापालिका निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासाठी आज (शुक्रवारी, २९ जुलै) सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे यापूर्वी निश्चित केलेले आरक्षण कायम राहणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:18 (IST) 29 Jul 2022
Pune municipal election : ओबीसी, महिला आरक्षण आज निश्चित केले जाणार

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आणि महिला आरक्षण आज (शुक्रवारी, २९ जुलै) निश्चित केले जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण कायम ठेवून अन्य आरक्षणे नव्याने निश्चित केली जाणार असल्याने किमान सात ते आठ प्रभागातील दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स, महाराष्ट्र पॉलिटिकल क्रायसिस अपडेट्स