Maharashtra Political Crisis News in Marathi : राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी ३० जूनला द्धव ठाकरेंनी दिला ठरावासाठी विशेष अधिवेशन पाचारण केलं आहे. मात्र, राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Political Crisis  : राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

17:41 (IST) 29 Jun 2022
सिंघवींनी ३४ बंडखोर आमदारांनी पाठवलेलं पत्र वाचून दाखवलं!

सुनावणीदरम्यान अभिषेक मनु सिंघवी यांनी ३४ बंडखोर आमदारांनी राज्यपालांना पाठवलेलं पत्र वाचून दाखवलं. यावेळी ” सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हे पत्र म्हणजेच आमदार आपलं सदस्यत्व स्वत:हून सोडत असल्याचा पुरावा आहे”, असं सिंघवी म्हणाले.

17:40 (IST) 29 Jun 2022

याआधीच्या तीन प्रकरणांमध्ये न्यायालयानंच हे स्पष्ट केलं आहे की जेव्हा तुमच्या पक्षाविरोधात तुम्ही राज्यपालांकडे तक्रार करता, त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचं पक्ष सदस्यत्व सोडत आहात – सिंघवी

17:38 (IST) 29 Jun 2022
राज्यपाल विरोधी पक्षनेत्यांच्या सल्ल्यानुसार वागू शकत नाहीत – सिंघवी

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार आणि मदतीने वागायला हवं. राज्यपाल विरोधी पक्षनेत्यांच्या सल्ल्यानुसार वागू शकत नाहीत.

17:28 (IST) 29 Jun 2022
अपात्र ठरल्यास आमदारांची मतं अवैध ठरतील – सिंघवी

सुनावणीमध्ये जर हे आमदार अपात्र ठरले, तर त्यांनी उपाध्यक्षांकडे तक्रार केल्या दिवसापासून ते अपात्र मानले जातील. अर्थात, २१ जूनपासून ते अपात्र ठरतील. त्यामुळे अपात्र ठरल्यानंतर या आमदारांची मतं अवैध ठरतील – अभिषेक मनु सिंघवी

17:26 (IST) 29 Jun 2022
बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा काय संबंध – न्यायालयाचा सवाल

बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा काय संबंध – न्यायालयाचा शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सवाल

17:24 (IST) 29 Jun 2022

बहुमत चाचणीमध्ये मतदान करणारे सर्व आमदार पात्र आहेत किंवा नाहीत, हे तपासल्याशिवाय ही चाचणी कशी घेतली जाऊ शकते? – सिंघवी

17:20 (IST) 29 Jun 2022
ही बहुमत चाचणी प्रचंड वेगाने घेतली जातेय – सिंघवी

बहुमत चाचणीसाठी देण्यात आलेल्या पत्रावर २८ जून ही तारीख लिहिली आहे. आम्हाला हे पत्र आज (२९ जून) मिळालंय. सध्या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना करोना झालाय. एक काँग्रेस आमदार परदेशात आहेत. बहुमत चाचणीसाठी हा भयंकर वेग आहे – अभिषेक मनू सिंघवी

17:14 (IST) 29 Jun 2022
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात…

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात…

17:10 (IST) 29 Jun 2022
तुषार मेहता मांडणार राज्यपालांची बाजू!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या निर्देशांना आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी सुनील प्रभू यांची अर्थात राज्य सरकारची बाजू मांडत आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदे अर्थात बंडखोर आमदारांच्या गटाची बाजू मांडत आहेत. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची बाजू मांडत आहेत.

17:05 (IST) 29 Jun 2022
मंत्रीमंडळ बैठकीला सुरुवात, महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला असून मुंबईत मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात हजर झाले आहेूत. नामांतराच्या मुद्द्यावरून या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

17:02 (IST) 29 Jun 2022
“राजीनाम्याची स्क्रिप्ट ठरली”, उद्धव ठाकरेंवर मनसेचा खोचक टोला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत मनसेचं खोचक ट्वीट.. “राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट‘ ठरली. संभाजी नगरच्या नामांतराचा 'आव' आणायचा आणि आपले 'हिरवे' प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे.. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना?? “

16:55 (IST) 29 Jun 2022
अखेर बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडलं, पण जाणार कुठे?

गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी हे महाराष्ट्रातील सत्ताकारणामध्ये प्रचंड महत्त्वाचं ठिकाण बनलं होतं. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमध्येच थांबले होते. अखेर त्यांनी आज गुवाहाटी सोडलं असून ते गोव्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

16:44 (IST) 29 Jun 2022
शिंदे गटाकडून गोव्याकडे रवाना होण्यासाठी तयारी

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याला जाणार असून त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. काही वेळातच एकनाथ शिंदे इतर आमदारांसहित गुवाहाटीमधील हॉटेलमधून रवाना होणार आहेत.

16:26 (IST) 29 Jun 2022
देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर वेगवान घडामोडी घडत आहे. राज्यपालांनी दिलेल्या आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका केली असून त्यावर अद्याप निकाल आलेला नाही. मात्र त्याआधीच भाजपाने बहुमत चाचणीसाठी तयारी करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

सविस्तर बातमी

15:56 (IST) 29 Jun 2022
आजच्या परिस्थितीला संजय राऊत जबाबदार – विजय शिवतारे

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी आपण एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २ हजार कार्यकर्त्यांसह ठराव करून त्याचं पत्र उद्धव ठाकरे यांना थोड्याच वेळात पाठवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

15:25 (IST) 29 Jun 2022
…तेव्हा गद्दारी केली, आता… – मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

भाजपाची भूमिका वेट अँड वॉचची आहे. जशी प्रश्नपत्रिका येईल, तशी उत्तरपत्रिका सोडवू. ही चाचणी त्यांची आहे. यात भाजपाचा विषय नाही. २४ ऑक्टोबर २०१९ला १६१ मतदारसंघात विजय मिळवून आणला. पण आमच्या मित्राच्या मनात बरोबर एक इच्छा निर्माण झाली. खुर्चीच्या पोटी गद्दारी केली. – सुधीर मुनगंटीवार

सविस्तर वाचा

14:43 (IST) 29 Jun 2022
संध्याकाळी ५ वाजता मोठ्या घडामोडी, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तर मुंबईत मंत्रिमंडळ बैठक!

राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी ५ वाजता बैठक. बहुमत चाचणीवर चर्चा होण्याची शक्यता. दुसरीकडे संध्याकाळी ५ वाजताच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर त्याचवेळी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी बहुमत चाचणीत मतदान करण्याची परवानगी मागण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांवर देखील सुनावणी होणार आहे.

13:37 (IST) 29 Jun 2022
बहुमत चाचणी आम्ही जिंकणार – एकनाथ शिंदे

सगळ्या आमदारांनी आज कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. इथे कुणीही जबरदस्तीने आलेले नाहीत. सगळ्यांनी आनंदात दर्शन घेतलं आहे. मुंबईत आम्ही उद्या पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोनतृतियांशपेक्षा जास्त बहुमत आमच्या शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत आम्ही पास होणार आहोत. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. या देशात राज्यघटना आणि कायद्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही.

13:16 (IST) 29 Jun 2022
नवाब मलिक, अनिल देशमुखांची न्यायालयात याचिका

सध्या तुरुंगात असणारे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी ३० जूनला होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात त्यांच्या याचिकेवर आजच सुनावणी होणार आहे.

13:12 (IST) 29 Jun 2022
बहुमत चाचणीचा निर्णय एका रात्रीत कसा निघतो? – अमोल मिटकरी

राज्यपाल दडपणाखाली आहेत का? हे तपासायला हवं – अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट

12:51 (IST) 29 Jun 2022
जिया खानच्या आईविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढा; सूरज पंचोलीचा अर्ज

अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात आरोपी असलेला अभिनेता सूरज पंचोलीने मुंबईतील विशेष सीबीआय नायालयात जिया खानच्या आईविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. सूरज पंचोलीने आपले वकील प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून तसा अर्ज केला आहे. जिया खानची आई राबिया खान हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूरज पंचोलीने आपल्या अर्जात म्हटले आहे. वाचा सविस्तर

12:48 (IST) 29 Jun 2022
देवेंद्र फडणवीस नक्कीच यशस्वी होतील – अपक्ष आमदार राजेंद्र राऊत

विश्वासदर्शक ठरावावर देवेंद्र फडणवीसांनी उचललेलं पाऊल यशस्वी होईल. मी पहिल्या दिवसापासून भाजपाला पाठिंबा दिला होता. आम्ही सात अपक्ष आमदार शेवटपर्यंत फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.

12:46 (IST) 29 Jun 2022
मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित

सकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या मविआच्या बैठकीनंतर आता मातोश्रीवर शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, रवींद्र वायकर हे देखील उपस्थित आहेत.

12:24 (IST) 29 Jun 2022
“…तेव्हा राज्यपालांची भूमिका वेगळी होती, मग आत्ता काय झालं?”, नाना पटोलेंचा सवाल

आता या प्रकरणात माझा साधा प्रश्न आहे की शिवसेनेने आपला गटनेता बदलला आहे. मग कुणाचा व्हीप लागू होईल? न्यायालयात याच प्रकरणाची सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. मग राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत वेगळी भूमिका घेतात. रात्रीतून असं काय घडलं? भाजपा तर नेहमी सगळ्या गोष्टी अंधारातच करते. कालही सगळ्या घडामोडी अंधारातच झाल्या. लगबगीनं अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी काढावेत. ४८ तासांची मुदत द्यावी हा एक मोठा चमत्कार आहे. न्यायिक व्यवस्थेचं उल्लंघन करणारी ही बाब राज्यपाल करत असतील तर महाराष्ट्रासाठी हे खेदजनक आहे.

12:18 (IST) 29 Jun 2022
शिवसेनेचे बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला!

शिवसेना आणि अपक्ष असे शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार दोन बसेसमधून कामाख्या देवीच्या दर्शनाला निघाले आहेत. आज दुपारीच हे सर्व आमदार गोव्याला निघणार असल्याचं सांगितलं जात आहे.

11:49 (IST) 29 Jun 2022
राज्यपालांनी आत्तापर्यंत अनेकदा घटनेचं उल्लंघन केलं आहे – उल्हास बापट

आत्तापर्यंतच्या राज्यघटनेनुसार राज्यपालांनी दिलेले निर्देश घटनाबाह्य आहेत. पण घटनेचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आज जर न्यायालयाने वेगळा निर्णय दिला, तर… – उल्हास बापट

वाचा सविस्तर

11:46 (IST) 29 Jun 2022
एकनाथ शिंदेंकडून आसामला ५१ लाखांची मदत जाहीर

एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे आसाम चर्चेत असताना दुसरीकडे राज्याला पुराचा फटका बसला असल्याने मोठं संकट निर्माण झालं आहे. आसाममधील २१ लाख नागरिक अद्याप पुरात अडकले आहेत. पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. त्यामुळे बंडाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आसामच्या पुराचाही उल्लेख होत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५२ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सविस्तर बातमी

11:29 (IST) 29 Jun 2022
शिंदे गटाकडून आसामच्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत

एकनाथ शिंदे गटाकडून आसामच्या पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत देण्यात आली आहे.

11:28 (IST) 29 Jun 2022
किशोरी पेडणेकरांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी

सरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याचं समोर आलं आहे. याची आपण गांभीर्याने दखल घेतल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

वाचा सविस्तर

10:58 (IST) 29 Jun 2022
शिवसेनेच्या याचिकेवर संध्याकाळी ५ वाजता तातडीची सुनावणी

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं सांगत शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर संध्याकाळी ५ वाजता तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बड

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडींचे सर्व अपडेट्स!