Maharashtra News Updates, 28 September 2022 : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचचलं असून ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अँड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.
दुसरीकडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिली जात आहे.
या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Updates, 28 September 2022 : राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.
नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले तरी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आणि त्याच्या राजकीय प्रवाहाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून पाणी आणण्याच्या योजनेला अधिकृतपणे हिरवा कंदील दिलेला असला तरी इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. दुसरीकडे कागल तालुक्यात विरोधाच्या राजकीय लाटा पुन्हा उसळल्या. सविस्तर वाचा…
देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम सध्या सुरु आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी दांडिया गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोना निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त परिस्थितीत साजरा होणाऱ्या या नवरात्रोत्सवावर यंदा राजकारणाचाही साज चढतांना दिसतो आहे. एरवी राजकारणाच्या मैदानावर आपले कसब दाखवणारे राजकारणी या निमित्ताने गरब्यावर ठेका धरतांना पहायला मिळत आहेत.
दांडीया खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवत त्याच रात्री त्या युवकाने हातोड्याने डोक्यावर, अंगावर घाव घातले. यात तीन जण जखमी असून त्यातील एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. यातील आरोपीचे नाव जितेंद्र बाबूलाल पटवा असे आहे. तर आकाश जैस्वाल असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर वाचा…
शिवसेनेच्या ठाण्यातील गेल्या तीन दशकातील सत्तेचा केंद्र बिंदू राहिलेल्या पाचपाखडी येथील महापालिका मुख्यालयात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून मोठी गर्दी जमाविण्याचे लक्ष्य यावेळी उपस्थितांना ठरवून देण्यात आले. सविस्तर वाचा…
‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’ ही संघटना ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ॲाफ इंडिया’ची (सिमी) प्रतिरूप असल्याचे दहशतवादविरोधी विभागाच्या तत्कालीन उच्चपदस्थ अधिकाऱ्याने (जे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत आहेत) सांगितले होते. त्यावेळेस तसा अहवालही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला होता. तेव्हापासून `पीएफआयʼच्या कारवायांवर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह गुप्तचर यंत्रणेकडूनही पाळत ठेवण्यात आली. त्यातूनच अलीकडे झालेल्या मोठ्या कारवाईनंतर बंदीचा निर्णय घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पुणे : मेट्रोकडून कल्याणीनगर स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून गुरुवारपासून (२९ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदल २७ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. शिवाजीनगर न्यायालय ते नगर रस्त्यावरील रामवाडी दरम्यान मार्गिकेचे काम सुरू आहे. बातमी वाचा सविस्तर ...
नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात नायगाव पूर्वेच्या जूचंद्र वाकीपाडा येथील भागात कॉस पावर नावाचा कारखाना आहे. सविस्तर वाचा…
नाशिक : बीएसपीएस स्वामीनारायण सांप्रदाय हा १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतीयांचे विचार आणि संस्कृतीला या सांप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे. बातमी वाचा सविस्तर ...
उल्हासनगर : जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे उल्हासनगर येथे बालकांचे निरीक्षण गृह, अपंग बालकांचे बालगृह, मुलांचे वसतिगृह, महिलांसाठी आधारगृह चालविण्यात येते. यासर्व ठिकाणचे मागील काही महिन्यांचे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिकचे विद्युत देयक थकल्याने महावितरणातर्फे यासर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे . बातमी वाचा सविस्तर ...
‘म्हाडा’च्या कोकण मंडळाच्या २०१८ साली काढण्यात आलेल्या सोडतीतील घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली असून घराची किंमत ४३ लाख रुपयांवरून थेट ५९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. घराची किंमत कमी करण्यात यावी अशी मागणी वारंवार विजेत्यांकडून करण्यात येत आहे. सविस्तर वाचा…
आपल्या क्रेडिट कार्ड वरील दोन लाख रुपयांची खर्च मर्यादा वाढून तुम्हाला नवीन क्रेंडिट कार्ड देतो असे सांगून डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेची एका भामट्याने फसवणूक केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा…
राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यानतंर विरोधक टीका करत असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.
मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. माधुरी सुशांत वाघमारे (वय २३, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सविस्तर वाचा…
पाँप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी आणल्यानंतर नवी मुंबईतील नेरूळ येथील पी.एफ.आय च्या कार्यालयाचा बोर्ड स्थानिक पोलीस प्रशासनाने काढाण्यास लावला आहे. पी.एफ.आय चे नेरूळ प्रमुख शेख मोहम्मद आसिफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत स्थानिक पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यालयावरील बोर्ड काढला असल्याची माहिती दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं. यानंतर वाद निर्माण झाला. राज्यात भाजपाने आक्रमक होत ठिकठिकाणी भुजबळांचा निषेध केलाय. तसेच माफीची मागणी केली. अशातच आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. ""कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल," असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच पंकजा मुंडे नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडे यांनीच आपल्या संपूर्ण भाषणाच्या व्हिडीओची लिंक पोस्ट करत या वादावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी 'सनसनीखेज' बातम्यांतून जमले, तर हेही पहा, असं मत व्यक्त केलं.
आमदार बच्चू कडू त्यांच्या आक्रमक कामाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते लोकांमध्येही चर्चेचा विषय ठरतात. मात्र, त्यांच्या याच पद्धतीमुळे ते अनेकदा वादातही सापडले आहेत. असाच एक प्रकार अमरावतीतील जिल्ह्यात घडला आहे. अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र, तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. भारतीय सुरक्षा दलांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) कुलगाममधील अहवाटू या गावात ही कारवाई केली. मोहम्मद शफी गनी (बटपोरा, कुलगाम) आणि मोहम्मद आसिफ वानी उर्फ यावर (तकिया, कुलगाम) अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवरील कारवाईचं समर्थक केलं आहे. "पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे," असं मत व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. २०२३पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असल्याने उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सविस्तर वाचा…
यवतमाळ : विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या माहूरगड येथे आई रेणुका मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात प्रारंभ झाला. माहूर येथील आदिमाया रेणुका देवीचे हे तीर्थक्षेत्र साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले आणि मूळ शक्तिपीठ आहे. बातमी वाचा सविस्तर ...
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली गाडगेबाबांची दशसूत्री काल-परवा शिंदे सरकारने काढून टाकली. सत्तेतील भुकेलेल्यांना खोके आणि उघड्या-नागड्यांना राजवस्त्रे मिळालीत म्हणून या दशसुत्रीचा उद्देशच संपुष्टात आला, असा समज यामागे आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.
पनवेल : शवांची अदलाबदल झाल्यानंतर नातेवाईकांची कशी तारंबळ उडते याचा अनुभव पेझारी व सोमटणे येथील गावक-यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी आला. बातमी वाचा सविस्तर ...
हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान जुलै २०२१ मध्ये एका व्यक्तीचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देणारा मुख्य आरोपी विकास उर्फ आशाराम स्वामीदयाल पासवान याला वडाळा रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली .
पाच पेक्षा अधिका नागरिकांनी जमावाने एकत्र येऊ नये असा ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्या आदेशाचा भंग केला म्हणून शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील मलनिःसारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध केलेले पाणी समुद्रात सोडले जात होते कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रक्रिया केलेले वापरायोग्य पाणी समुद्रात सोडण्याची वेळ महापालिकेवर दोन हजार नऊ पासून आली होती. बातमी वाचा सविस्तर ...
शहर परिसरातून दुचाकी तसेच रिक्षा चोरणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात देशभरात १५ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याच दरम्यान देशविरोधी कारवाया आणि घोषणाबाजी केल्यामुळे पीएफआयवर केंद्र सरकारने पाच वर्षांकरिता बंदी घातली आहे. बातमी वाचा सविस्तर ...
सामाजिक जागृतीच्या दृष्टीने नियमित विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या डोंबिवलीतील एका महिला डाॅक्टरने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून डोंबिवली शहर परिसरात नऊ दिवस व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा