Maharashtra News Updates, 28 September 2022 : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचचलं असून ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अँड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.

दुसरीकडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिली जात आहे.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates, 28 September 2022 : राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.

13:13 (IST) 28 Sep 2022
बदलापूर : केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी ; मंत्री कपिल पाटील यांच्यातर्फे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार

केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा

13:04 (IST) 28 Sep 2022
डोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल

डोंबिवली जवळील २७ गावांमधील विकासकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (महारेरा) दिशाभूल करुन त्यांच्याकडून या बेकायदा बांधकामांना रेराची मान्यता असल्याचे दाखवून ग्राहक आणि कल्याण डोंबिवली पालिकेची फसवणूक करणाऱ्या २७ गावांमधील २७ विकासकांविरुध्द बुधवारी रात्री फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:45 (IST) 28 Sep 2022
समुद्रात येणाऱ्या लाखो टन कचऱ्यामुळे निर्माण होतेय जलप्रदूषणची गंभीर समस्या

उरण : समुद्रात टाकण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या लाखो टन कचऱ्यामुळे सागरी उदर सध्या कचराभूमीचे आगर बनू लागलं आहे. त्यामुळे समुद्रात जल प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. या कचऱ्या बरोबरच समुद्रातून चालणाऱ्या महाकाय जहाजांतून गळती होणाऱ्या तेलामुळे ही जलप्रदूषण वाढू लागले आहे. बातमी वाचा सविस्तर …

12:44 (IST) 28 Sep 2022
मुलासह आझम खान फरार; न्यायालयात अनुपस्थित राहिल्यावर पोलिसांची माहिती, पिता-पुत्रांनी राज्य सरकारची सुरक्षाही नाकारली

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील माजी मंत्री आझम खान मुलासह फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रामपूरचे आमदार आझम खान आणि त्यांचे पुत्र आमदार अब्दुल्ला खान काही काळापासून न्यायालयात हजर होण्यास टाळाटाळ करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 28 Sep 2022
पीएफआय ‘सायलंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, संघटनेबाबत केला मोठा खुलासा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

सविस्तर वाचा…

12:24 (IST) 28 Sep 2022
पैशाच्या वादातून मित्राच्या कानशिलावर पिस्तूल ताणली अन गोळी झाडली पण…

नागपूर : पैशाच्या वादातून एकाने मित्राच्या कानशिलावर पिस्तूल ताणली आणि गोळी झाडली. परंतु, ती गोळी पिस्तुलाच्या नळीत फसल्याने दैव बलवत्तर असलेल्या युवकाचा जीव वाचला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोखारा येथे घडली. बातमी वाचा सविस्तर

12:24 (IST) 28 Sep 2022
पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

दुरावस्था झालेल्या पालिका शाळांना दुरुस्तीची प्रतीक्षा असतानाच या शाळांचा दर्जा सुधारून या शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याच्या हालचाली अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केल्या आहेत. नुकतीच पालिका शाळांच्याबाबत पालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि कक्ष समन्वयकांची बैठक पार पडली.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 28 Sep 2022
मुंबई : गोराईत साकारणार सिंगापूरच्या धर्तीवरील कांदळवन उद्यान ; देशातील पहिले कांदळवन उद्यान मार्च २०२३ पर्यंत खुले होणार

सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारे भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत आकाराला येणार असून मार्च २०२३ पर्यंत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.

सविस्तर वाचा

11:53 (IST) 28 Sep 2022
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर कराराची होळी

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी शहरातील जगनाडे चौकात ‘जा रे मारबत…. विदर्भ वेगळा झाला पाहिजे’ अशा घोषणा देत कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर …

11:53 (IST) 28 Sep 2022
गडचिरोलीमध्ये लोहखनिज वाहतूक जिवावर उठली

गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील नागरिक सध्या सूरजागड लोहखाणीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहे. मंगळवारी प्रकल्पातील भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी जवळपास १० ट्रक पेटवून दिले. बातमी वाचा सविस्तर …

11:26 (IST) 28 Sep 2022
‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…”

राज्यात सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

11:25 (IST) 28 Sep 2022
VIDEO: चोर दुचाकी घेऊन पळून जात असतानाच गेटवरील सुरक्षारक्षकाने पाहिलं, गेट बंद करण्यासाठी धावला अन् तितक्यात…

महापालिका अधिकारी असल्याचं सांगत दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना एका सुरक्षारक्षकाने जन्माची अद्दल घडवली आहे. हे चोर एका डिलिव्हरी एजंटची दुचाकी चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखवत गेट बंद केला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. दिल्लीमधील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सविस्तर बातमी

11:17 (IST) 28 Sep 2022
Uttarakhand Resort Murder: राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपा आणि RSS चा उल्लेख करत म्हणाले “तिच्या मृत्यूचं एकमेव…”

उत्तराखंडमध्ये १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या खूनानंतर राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अंकिता भंडारीचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांनी ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ‘रिसॉर्ट’ला आग लावली. अंकिताच्या खुनाचा आरोप असलेल्या पुलकित आर्य याच्या मालकीचे हे ‘रिसॉर्ट’ आहे. भाजपाचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकितच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. केरळमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सभेत ते बोलत होते.

सविस्तर बातमी

10:54 (IST) 28 Sep 2022
देशात संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या पाहून बसेल धक्का; टक्का आणखी घसरला

देशातील प्राचीन भाषा संस्कृतविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. भारतात संस्कृत केवळ २४ हजार ८२१ लोक बोलतात, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या जनगणना आयुक्त कार्यालयाच्या भाषा विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 28 Sep 2022
Anti Hijab Protest: गायिकेनं चक्क स्टेजवर कापले केस; कारण जाणून आश्चर्य वाटेल, पाहा व्हिडीओ

तुर्की गायिका मेलेक मोस्सोने इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ एका स्टेज शो दरम्यान मेलेकने केस कापले आहेत. तिच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जगभर व्हायरल झाला आहे.

सविस्तर वाचा…

10:39 (IST) 28 Sep 2022
संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची तक्रार, ठाकरे म्हणाले “एक काम कर…”

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत असून, वादात अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.

सविस्तर बातमी

10:24 (IST) 28 Sep 2022
“पंकजा मुंडेंनी मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर…” एकनाथ खडसेंचं मोठं विधान!

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेलं विधान सध्या खूपच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी

10:23 (IST) 28 Sep 2022
“सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी

10:22 (IST) 28 Sep 2022
गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल? नेत्याने स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. पण गिरीश महाजनांवर खरंच असा गुन्हा दाखल केला आहे का? याबाबतचं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी स्वत: दिलं आहे. सविस्तर बातमी

10:21 (IST) 28 Sep 2022
महत्त्वाची बातमी! ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी…

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सीमी’चे सदस्य असल्याची माहिती दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहेत. सविस्तर बातमी

केंद्र सरकारने पीएफआय संघटनेसह इतर सलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.