Maharashtra Breaking News Updates, 30 September 2022 : राज्यात सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा पारंपारिक दसरा मेळावा होणार आहे. तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार ताकद लावली जात आहे. तसेच,मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट बस कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
यासह अन्य सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Latest News Updates, 30 September 2022 : राज्यभरातील अन्य सर्व घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर
ठाणे रेल्वे स्थानकात मागील अर्ध्या तासापासून तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. ज्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामना करावा लागत आहे.
ठाणे : दिवा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चार जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर ...
भाजी फळे अगदी छोट्या गावात तालुक्यात दही सुद्धा फिरून विकणारे फेरीवाली सर्वत्र आढळून येतात.एवढेच काय कपड्यावर भांडी विकणारी भोवारीण आजही ग्रामीण भागात आढळून येते. मात्र उरण पनवेल परिसरात अशाच पद्धतीने मद्य विकले जाते.वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे सत्य आहे असाच फिरून मद्य विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून त्याच्या कडून २१ देशी दारूच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत.
चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी २०२२ ला ९ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठक व चर्चा होऊन आता सारस संवर्धन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातून नामशेष झालेला सारस पक्षी पुन्हा चंद्रपुरात आणण्यात यावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर ...
शहरातील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत ७० वर्षीय जुनी तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. बातमी वाचा सविस्तर ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री किंवा आपण थेट सांगितले तरच ते काम करावे. अन्य कुणाचे आदेश मानू नयेत, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या आहेत. म्हाडा व झोपु प्राधिकरणाची आढावा बैठक म्हाडाच्या गृहनिर्माण भवनात बोलविण्यात आली होती. सविस्तर वाचा…
विरार : नालासोपारा येथे वसई विरार महापालिकेच्या परिवनह सेवेला शुक्रावरी दुपारी अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली. बातमी वाचा सविस्तर ...
प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या भिकाजी निर्गुणे (३९) यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशापद्धतीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. भिकाजी यांना एकप्रकारे हा दुसरा जन्मच असल्याचे त्यांचे कुटुंबिय सांगत होते. सविस्तर वाचा…
ठाणे : महापालिका क्षेत्रातील सफाई कामगारांना एका खासगी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट घड्याळ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यातील जीपीएस प्रणालीद्वारे कर्मचारी त्याच्या नेमुन दिलेल्या ठिकाणी काम करतो आहे की नाही, याची माहीती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. बातमी वाचा सविस्तर ...
डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते कृष्णा परुळेकर यांना गुरुवारी दुपारी एका इसमाने धक्काबुक्की करुन मारहाण केली. नेहरु रस्त्यावरील रेल्वे पादचारी पुलाजवळ हा प्रकार घडला. परुळेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. बातमी वाचा सविस्तर ...
महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. सविस्तर वाचा…
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका येथील रस्ते कामासाठी खोदण्यात आलेली माती, दगड बाजुच्या नाल्यात पडली आहे. हा नाला मातीने भरुन गेल्याने एमआयडीसीतून वाहून येणारे सांडपाणी विको नाका भागात जागोजागी तुंबून राहत असल्याने गोळवली, विको नाका परिसरात राहत असलेले रहिवासी, व्यापारी, हाॅटेल चालक हैराण आहेत. बातमी वाचा सविस्तर ...
करोनाकाळात बंद झालेली रेल्वेची मोबाइल तिकीट ॲप सेवा पुन्हा सेवेत दाखल झाल्यानंतर त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद वाढू लागला आहे. तिकीट खिडकी समोरील रांगेत उभे राहून तिकीट वा पास काढणारे प्रवासी आता हळूहळू कागदविरहित मोबाइल ॲप तिकीट सेवेला पंसती देऊ लागले आहेत. सविस्तर वाचा…
डोंबिवलीतील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे एका तरुणीवर प्रेमसंबंध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला संबंधित तरुणा बरोबर विवाह करण्यास नकार दर्शविला होता. कुटुंबीयांनी तरुणाला हे लग्न होणार नाही, असे स्पष्ट शब्दात सुनावले होते. याचा राग आल्याने संतप्त झालेल्या तरुणाने तरुणीच्या कुटुंबीयांना अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वताच्या अपहरणाचा डाव रचला. सविस्तर वाचा…
भंडारा : शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात घडली. बातमी वाचा सविस्तर ...
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्या सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या जरी राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे आता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. परळीतील दांडिया महोत्सावत त्यांनी झिंगाट गाण्यावर अन्य महिलांच्या सोबत ठेका धरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वाचा सविस्तर बातमी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आज(शुक्रवार) स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 चा शुभारंभ झाला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी याबाबत थोडक्यात माहिती दिली. वाचा सविस्तर बातमी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्याची जाहीरपणे कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांनी आमचं नातं आता बहीण भावाचं राहिलेलं नाही असं सांगितल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडेंच्या या विधानावर पंकजा मुंडे यांनीही भाष्य केलं असून, रक्ताचं नातं संपत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आपण राजकारणात कोणालाही वैरी मानत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
वाई : धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने एक वर्षासाठी वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे. ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. बातमी वाचा सविस्तर ...
ठाणे : महापालिका आयुक्त पदावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते शुक्रवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. बातमी वाचा सविस्तर ...
वर्धा : लग्नास नकार दिला म्हणून तृतीयपंथीयास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहित युवकास अटक करण्यात आली आहे. मंगेश उर्फ बाळू मनोहर सौरंगपते असे या विकृत युवकाचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर ...
भंडारा : ‘तूने मेरेको चाकू से मारा था. अब तेरेको मारना है…’ आणि सुरू होतो पाठलाग. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकजण वाट दिसेल तिकडे पळत सुटतो. त्याच्या मागे हातात चाकू घेतलेला ‘तो’ असतो. पळणारा थेट न्यायाधीशांच्या कक्षात शिरतो. न्यायाधीशही प्रसंगावधान दाखवतात. पोलिसांना पाचारण करतात आणि आरोपीला अटक होते. बातमी वाचा सविस्तर ...
नागपूर : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या महापालिका हद्दीतील नागरिकांना / गृह निर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्तेसाठी मालमत्ता करात शासनाचे कर वगळून २ टक्के सूट दिली जाणार आहे. महापालिकेत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. बातमी वाचा सविस्तर ...
नागपूर : ‘एटीएम’ मशीनचे तांत्रिक ज्ञान घेतल्यानंतर देशभरातील शेकडो ‘एटीएम’ मशीन फोडून लाखो रुपये चोरणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला तहसील पोलिसांनी अटक केली. या टोळीने नागपुरातील तब्बल ३३ ‘एटीएम’ फोडून रक्कम उडवली आहे. बातमी वाचा सविस्तर ...
नागपूर : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही केंद्र सरकारची दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या किंवा खासगीकरण करण्याच्या चर्चेला जोर चढला असताच केंद्र सरकार ‘बीएसएनएल’ला २८ हजार कोटींची मदत करणार असून देशभरात लवकरच ‘४जी’ सेवा सुरू होणार असल्याची माहिती महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. बातमी वाचा सविस्तर ...
नागपूर : न्यायालयीन पेशीवर आलेल्या एका कैद्याला नागपूर पोलिसांच्या वाहनात बसून चहा-कॉफी, नाश्ता आणि मोबाईल फोनची सुविधा देण्यात येत होती. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत सुरू होता. कैद्यांना ‘विशेष’ सुविधा देण्याचा हा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयाजवळ उघडकीस आला आहे. बातमी वाचा सविस्तर ...
कोणीही चुकीचं अन्न खाऊ नये, तसंच हिंसाचाराशी संबंधित अन्न टाळावे असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. भारत विकास परिषदेच्या पश्चिम क्षेत्राची चिंतन बैठकीत ते बोलत होते. नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी त्यांनी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासावर भाष्य केलं.
मुंबईतील अंधेरी परिसरात एका ४० वर्षीय मॉडेलने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. , मॉडेलचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर बातमी...
वेदान्त-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात होऊ घातलेला प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. रोज सत्ताधारी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या पुणे दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांवर बोट ठेवत तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. कालही त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी महाराष्ट्रात इतर प्रकल्प का होऊ शकले नाहीत, याचे उत्तर विरोधकांनी द्यावे, अशी प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी...
मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी...