Balasahebanchi Shivsena and Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर काल रात्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांना नावं देण्यात आली होती. तसेच उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले. मात्र, यावेळी शिंदे गटाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नव्हता. आज शिंदे गटा चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. धन्युष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज (मंगळवारी) किंवा उद्या (बुधवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Mumbai-Maharashtra Live News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट
नाना पाटेकर यांनी राजकारणात वापरली जाणारी शिवराळ भाषा तसेच असंसदीय शब्दांच्या होत असलेल्या वापरावर शिंदे-फडणवीस या द्वयींना प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना नाना पाटेकर यांनी देंवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही उल्लेख केला. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख करतातच देवेंद्र फडणवीस यांनाही हसू फुटले. वाचा सविस्तर
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. तर, भाजपाने राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे. ही यात्रा महाराष्ट्रात चार जिल्ह्यातच गुंडाळली जाणार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. वाचा सविस्तर बातमी…
निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह दिलं आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय दिले होते. यामध्ये ‘तळपता सूर्य’, ‘ढाल-तलवार’ आणि ‘पिंपळाचं झाड’ यांचा समावेश होता. शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्ह पहिली पसंती होती. पण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला हे चिन्ह देण्यास नकार दिला. यामागील कारणही निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्याबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाच्या चिन्हाचा निर्णय रोखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा…
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्याबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दोन्ही गटाला नवे नाव दिले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा…
नाट्यगृहाच्या उदघाटणासाठी मिरा भाईंदर मध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चक्क भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असल्याची घटना घडली आहे. यात पालिकेने जातीने भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयन्त केला असल्याचे आरोप करत भाजप माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळीच ठिय्या आंदोलन केले.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल(सोमवार) निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज(मंगळवार) नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. वाचा सविस्तर बातमी…
दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. असे असतानाच आता शिंदे गटातील नेत्या तथा आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाला रावणाची उपमा दिली आहे. आमची धगधगती मशाल ४० मुंडक्याच्या रावणाला जाळेल, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. समाजमाध्यमाच्या माध्यमातून त्यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
राज्यातील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरु असलेला संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत असून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. वाचा सविस्तर
भाजपाचे नेते राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेसला हिंदूत्वाचा एवढा तिटकारा का आहे? तुमचे सरकार असताना तुम्ही हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी का दर्शवली नाही, असे सवाल केले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर
शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाला बाळासाहेबांच्या नावाने मान्यता मिळाली आहे. एकनाथ शिंदे हेच असे चिन्ह आहेत की सामान्य माणूस त्यांना हे आमचे मुख्यमंत्री आहेत असे आदराने म्हणतो. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते आम्हाला मान्य असेल, असे सत्तार म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे यांनीही मशाल या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मशाल काळोखातून मार्ग काढण्यासाठी असते. आता सगळीकडे उजेड आहे. लोकांपुढे नोकरी, अन्नधान्य, घर असे प्रश्न आहेत. जवळ धनुष्यबाण असताना क्रांती करू शकले नाहीत. आता मशाल घेऊन काय क्रांती करणार? असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरात ईदनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलिसांसमोर वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारावर भाजपा खासदार अनिल बोंडे आणि निवेदिता चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला. सविस्तर वाचा
शिवसेनेकडून ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार छगन भुजबळ यांनीही ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी ‘मशाल’ हे चिन्ह का निवडले याचे कारण त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा
एका चोरट्याने हनुमानजींच्या मंदिरात प्रवेश केला. हनुमानजींचे दर्शन घेतले. मंदिराला प्रदक्षिणा मारल्या आणि प्रसाद ग्रहण केला. बातमी वाचा सविस्तर …
राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यावर भाष्य करु नका असा आदेश दिला आहे. त्यातच आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, राज ठाकरेंनी यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलतर्फे इरासमस प्लस सीबीएचई प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांतील शिक्षकांचे सर्वेक्षण करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. सविस्तर वाचा…
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये निवडणुकीच्या आयोगाच्या निर्णयामुळे अजून भर पडत आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल आहे. त्याआधी आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवलं. दरम्यान उद्धव ठाकरे गटाला नाव आणि पक्षचिन्ह मिळालं असलं तरी, शिंदे गटाला मात्र अद्याप पक्षचिन्ह मिळालेलं नाही. यासंबंधी आज आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.
कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील आयसीआयसीआय बँकेतील ३४ कोटी रुपये या बँकेतील तिजोरी संरक्षक व्यवस्थापकाने लुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच, कल्याण मध्ये काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्या आणि २६ कर्जदार, विकासकांनी संगनमत करुन सहा कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
कल्याण : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार यांची ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता पदावर नेमणूक करण्याची मागणी भाजप नेते, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांकडून टीका-टीप्पणी करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मेळावे सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी विक्रोळी झालेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा
पुणे : मेट्रो मार्गिका आणि स्थानकांचे काम करताना खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्तीची जबाबदारी महामेट्रोची आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक आणि ज्या ठिकाणी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे, त्या ठिकाणचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी महामेट्रोला दिले. बातमी वाचा सविस्तर …
राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान सोमवारी निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतला. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केलं आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया उमटत असून संजय राऊत यांनीही त्यावर भाष्य केलं आहे. सविस्तर वाचा
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला रविवारीपासून सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मेळावे सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी विक्रोळी झालेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी न्यायालयात संजय राऊतांच्या भेटीदरम्यानचा प्रसंग सांगितला.
निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया उमटत असून संजय राऊत यांनीही त्यावर भाष्य केलं आहे. शिवसेनेचे नवे चिन्ह कदाचित क्रांती घडवेल, असं प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं आहे.