Uddhav Thackeray vs Eknath Shinde Latest News: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला सत्तेचा सारीपाट अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिल्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दरम्यानच्या काळात भाजपाकडून सावध पवित्रा घेतला जात असला, तरी देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप यावर सविस्तर भूमिका स्पष्ट केलेली नसल्यामुळे भाजपाच्या गोटात नेमकं काय चाललंय, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Today : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत राजकीय गुंता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. Read in English

00:21 (IST) 29 Jun 2022
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून त्याबाबतचं एक पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सविस्तर बातमी

00:01 (IST) 29 Jun 2022
गुवाहाटीत शिंदे गटाची बैठक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या बैठकीनंतर त्यांनी राज्यपालांना पत्र देऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. यानंतर गुवाहाटीत देखील शिंदे गटाची बैठक सुरू आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

22:15 (IST) 28 Jun 2022
बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना भाजपाचं पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. फडणवीसांसह तीन भाजपा नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. मागील अर्ध्या तासापासून राजभवनावर ही बैठक सुरू आहे. या बैठकीत भाजपाने बहुमत चाचणी घेण्यासाठी राज्यपालांना पत्र देण्यात आलं आहे.

22:08 (IST) 28 Jun 2022
अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग; फडणवीसांसह भाजपा नेते राजभवनावर दाखल

देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत आगमन होताच ते इतर सर्व भाजपा नेत्यांसोबत राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि धनंजय महाडिक हे नेतेही त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत अमित शाह आणि नड्डांची भेट घेतल्यानंतर भाजपा नेते आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. सविस्तर बातमी

21:15 (IST) 28 Jun 2022
मंत्रिमंडळाची बैठक संपली, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना देखील काम थांबलं नाही, मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व आमदार काम करत आहोत. या बैठकीत पीक-पाण्याचा प्रश्न, पाऊसमान, कोविड स्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आगामी काळात कोणते प्रस्ताव येऊ शकतात? याबाबत विचारलं असता गोपनीयतेचं कारण देत त्यांनी बोलणं टाळलं आहे.

19:56 (IST) 28 Jun 2022
उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपली; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं प्रशासकीय काम थांबवलं नाही. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. यानंतर आजही मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबत गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सविस्तर बातमी

19:12 (IST) 28 Jun 2022
“खरोखर शिवसैनिक असाल तर…”, बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

मागील एक आठवड्यापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून ते ४० हून अधिक शिवसेना आणि अपक्ष आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी याठिकाणी गेले आहेत. पण आसाममध्ये सध्या पूरस्थिती आहे. ३५ पैकी ३२ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून जवळपास ५५ लाख नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना खोचक टोला लगावला आहे. सविस्तर बातमी

18:57 (IST) 28 Jun 2022
आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हटलं : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा, तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?”

18:54 (IST) 28 Jun 2022
आम्ही स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो आहोत : आमदार शहाजीबापू पाटील

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.”

16:12 (IST) 28 Jun 2022
बाळासाहेबांनी हयात असतानाच उद्धव ठाकरेंना त्यांचा राजकीय वारसदार म्हणून निवडलं : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आज माँ व बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. माँची संवदेनशीलता उद्धव ठाकरेंमध्ये दिसते. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरही लहानपणापासून खूप प्रेम केलं. त्यांनी हयात असतानाच त्यांचा राजकीय वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांना निवडलं होतं. ते आज प्रेमाने आवाहन करत असतील तर ते महत्त्वाचं आहे. त्यांचा तो खरेपणा आहे. राजकारणात चढउतार येत राहतात, शेवटी माणसं व नात्यांमधील ओलावाच टिकतो.”

15:18 (IST) 28 Jun 2022
उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन!

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

14:23 (IST) 28 Jun 2022
कारस्थानांना कंटाळून गुवाहाटीला आलो – उदय सामंत

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे, त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे – उदय सामंत

14:17 (IST) 28 Jun 2022
बंडखोर आमदार गुवाहाटीत सहलीला गेलेत – जयंत पाटील

आमचं सरकार चालू आहे. चिंतेचं कारण नाही. सभागृहात आमच्या सरकारविषयी कुणी नाराजी व्यक्त केलेली नाही. बंडखोर आमदार सहलीलाच गेले आहेत. काही डोंगर बघतायत, काही झाडी बघत आहेत.

14:14 (IST) 28 Jun 2022
ठाण्यातील शिवसेना जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदेंची पक्षातून हकालपट्टी!

ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची पक्षविरोधी कारवायांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेतून हकालपट्टी – खासदार विनायक राऊत यांची घोषणा

13:57 (IST) 28 Jun 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे मुख्य सचिवांना पत्र

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी तीन दिवसांमध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती विचारलेली आहे. वाचा सविस्तर

13:45 (IST) 28 Jun 2022
गुवाहाटीतल्या हॉटेलबाहेरून एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका…

आमची भूमिका तुमच्यापर्यंत वारंवार आमचे प्रवक्ते दीपक केसरकर माहिती देत आहेत. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेला पुढे घेऊन जाऊ. आमच्या पुढच्या निर्णयाविषयी तुम्हाला लवकरच माहिती देऊ. इथले सगळे आमदार आनंदात आहेत. बाहेरून जे म्हणत आहेत की त्यांच्या संपर्कात आमदार आहेत, कृपया त्यांची नावं त्यांनी जाहीर करावीत. यात दिशाभूल करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. इथे असलेले ५० आमदार स्वत:च्या मर्जीने आले आहेत. आनंदी आहेत. हिंदुत्वाची भूमिका घेऊन इथे हे सगळे आले आहेत.

13:32 (IST) 28 Jun 2022
आज शेवटचा दिवस असेल की मी उद्धव ठाकरेंना आवाहन करू शकेन – दीपक केसरकर

आज माझ्या दृष्टीने शेवटचा दिवस आहे. आमच्या पक्षप्रमुखांचं आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे अशी इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा मी हे आवाहन करू शकेन. त्याचा विचार होणार नसेल आणि उद्या आम्हाला जायला लागलं, अविश्वास ठरावावर मतदान करावं लागलं, तर ते मतदान उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसेल, एवढंच आमचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. भाजपासोबत बोलणी फिसकटल्यानंतर आम्ही सगळे आमदार त्यांच्यासोबत उभे होतो. नंतर जी परिस्थिती उद्भवली, ती त्यांच्यासमोर वेळोवेळी मांडली आहे.

13:09 (IST) 28 Jun 2022
कळकळीची विनंती करतो, शेवट गोड करा – दीपक केसरकर

आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात आहात. एक आमदार फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल देऊ शकत नाही का? मग तुम्ही का आमच्यावर आरोप करत आहात? तुम्हाला कळकळीची विनंती आहे, शेवट गोड करा. त्यात महाराष्ट्राचं हित आहे, पक्षाचं हित आहे – दीपक केसरकर, बंडखोर शिवसेना आमदार

13:01 (IST) 28 Jun 2022
शापूरजी पालोनजी उद्योग समुहाचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे निधन

शापूरजी पालोनजी उद्योग समुहाचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दक्षिण मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. तशी माहिती उद्योगस समूहाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाचा सविस्तर

13:01 (IST) 28 Jun 2022
शिवसेनेची अवस्था म्हणजे एक टुकडा इथर, एक टुकडा उधर… – किरीट सोमय्या

शिवसेनेचे तुकडे तुकडे झाले आहेत. एक तुकडा इधर, एक तुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंच्या हिश्श्यात जो तुकडा आलाय, त्यात एक डझन आमदारही दिसत नाहीयेत. आधी त्याच्याकडे बघा. १० दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणायचे, आमचे नेता उद्धव ठाकरे नॉट रीचेबल आहेत. आज ठाकरेंची दयनीय अवस्था अशी आहे की एकही आमदार उद्धव ठाकरेंना रीचेबल नाहीयेत – किरीट सोमय्या

वाचा सविस्तर

12:44 (IST) 28 Jun 2022
मुंबई…दिल्ली…गुवाहाटी…राजकीय घडामोडींना वेग

मुंबईत आज दुपारी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्याचवेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी पक्षातील वरीष्ठ नेत्यांशी सत्तास्थापनेविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. तिकडे गुवाहाटीमध्ये देखील दुपारी एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा सविस्तर

12:22 (IST) 28 Jun 2022
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

राज्यातील सत्तापटलावरच्या घडामोडींना दिल्लीत वेग! देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले असून दुसरीकडे गुवाहाटीत एकनाथ शिंदे बंडखोरांसोबत बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

12:21 (IST) 28 Jun 2022
समाधान सरवणकर यांची युवासेनेतून हकालपट्टी

बंडखोर आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे – सूत्रांची माहिती

11:54 (IST) 28 Jun 2022
उद्धव ठाकरेंनी खरंच फडणवीसांना फोन केला होता? शिवसेनेकडून स्पष्टीकरण

'सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला' अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये – शिवसेना

11:53 (IST) 28 Jun 2022
संजय राऊत ईडीकडून हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागणार!

संजय राऊत यांचे वकील ईडी कार्यालयात पोहोचले. संजय राऊत यांना आज ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलावलं होते. नियोजित दौऱ्यामुळे संजय राऊत आज अलिबागला गेले आहेत. ईडीकडे संजय राऊत वकिलाच्या माध्यमातून आज वेळ वाढवून मागणार आहेत.

11:44 (IST) 28 Jun 2022
बंडखोर आमदारांमध्येही फूट? अनिल देसाईंचा खळबळजनक दावा!

बंडखोर आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई मागे घेतलेली नाही. ११ तारखेला सुनावणी पुन्हा सुरू होईल. २० पेक्षा जास्त आमदार आमच्या नेतृत्वासोबत संपर्कात आहेत. त्यांचं म्हणणं ठाम आहे की आम्ही सभागृहात जेव्हा येऊ, तेव्हा आम्ही शिवसेनेसोबत उभे राहू – अनिल देसाई

11:31 (IST) 28 Jun 2022
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे फडणवीस? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले “जे बोलतात पुन्हा येईन…”

जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे याचं मला दु:ख वाटतं असं राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील आमदारांचे सूरतमध्ये, गुवाहाटीला असे हाल होतात. याच्या मागे कोण आहे. कोणती अदृश्य शक्ती, पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन ते आहेत का? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कर्जतमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

सविस्तर बातमी

11:30 (IST) 28 Jun 2022
उद्धव ठाकरे भेटीनंतर नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले “आमदारांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन…”

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात सत्तापेच निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांची खाती काढून घेतली असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने मात्र १२ जुलैपर्यंत त्यांना दिलासा दिला आहे. बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैठका आणि भेटींचा वेग वाढला आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांना इंजेक्शन देऊन मारहाण केली जात असल्याचा उल्लेख केला.

सविस्तर बातमी

11:14 (IST) 28 Jun 2022
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ – रुपाली ठोंबरे-पाटील

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. तुमच्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा घाट सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्याचा घाट सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते, तर त्यांनी हो होऊ दिलं नसतं. या दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला सावरण्याची ही वेळ आहे.

वाचा सविस्तर

11:07 (IST) 28 Jun 2022
“मंत्री, खासदार, आमदार फुटतील, पण शिवसेनेची मतं फुटणार नाहीत”

शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक फुटू शकतील. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मते कधीही फुटणार नाहीत. शिवसेनेची मते बाळासाहेबांना मानणारी आहेत, असा विश्‍वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Eknath Shinde Live Updates Today : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथींचे सर्व अपडेट्स