Uddhav Thackeray vs Eknath Shinde Latest News: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला सत्तेचा सारीपाट अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिल्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दरम्यानच्या काळात भाजपाकडून सावध पवित्रा घेतला जात असला, तरी देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप यावर सविस्तर भूमिका स्पष्ट केलेली नसल्यामुळे भाजपाच्या गोटात नेमकं काय चाललंय, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Maharashtra Political Crisis Live Today : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत राजकीय गुंता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. Read in English
रायगड आणि जळगावमधील बंडखोर शिवसेना आमदारांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आमदारांना पाठिंबा देत निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या असून ते भाजपासह इतर पर्याय तपासून पाहत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी दोन वेळा राज ठाकरे यांनादेखील फोनवरुन संपर्क साधला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दाखल देता परतण्याचा सल्ला जपून घेण्यास सांगितले आहे. वाचा सविस्तर
दीपक केसरकर बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत आले. ते काय पक्षाबद्दल बोलणार? त्यांना म्हणावं सावंतवाडीत निवडून येऊन दाखवा.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या १५ लोकांना ईडीच्या नोटिसा जाणार आहेत. त्यामुळे हे सरकार कोण बनवतंय? भाजपा की केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे. पण काहीही करा, आम्ही घाबरणारे लोक नाहीत. हवंतर मला इथून अटक करून घेऊन जा. हा देशात दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे.
एकनाथ शिंदे अजूनही आमचे सहकारी आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. ते अजूनही मुंबईत येऊ शकतात. त्यांच्याविषयी माझ्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचं कारण नाही. त्यांनी कुठेही जावं.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ११६ आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नव्हता. हा विरोधी पक्ष विधायक काम करू शकतो ही आमची भूमिका आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. पण त्यांनी सध्या जे इथे डबकं झालं आहे, त्यात उतरू नये. त्यांची अप्रतिष्ठा आहे असं माझं त्यांना मित्र म्हणून सांगणं आहे. काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत: डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या पक्षाची, मोदींची आणि स्वत: फडणवीसांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं मत आहे. मला खात्री आहे की ते त्या डबक्यात किंवा नरकात उडी मारणार नाहीत.
अडीच वर्षांपासून १२ आमदार राजभवनाच्या झाडीझुडपात टेबलावर पडून आहेत. त्याची माहिती त्यांनी आधी घेतली पाहिजे. ठीक आहे. राज्यपालांचा करोना बरा झाला आहे. ते कामाला लागले असतील, तर त्या १२ आमदारांची फाईल त्यांनी ताबडतोब क्लीअर करावी.
शिवसेनेला मानणारी जनता अशा प्रकारच्या कोणत्याही विचाराला स्थान देत नाही. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. समोरून वेट अँड वॉच कुणी करत असेल, तर आमचंही वेट अँड वॉच आहेच. – संजय राऊत
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा आम्ही सगळेच त्यातल्या काही लोकांना बंडखोर मानायला तयार नाही. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत ज्यांना आम्ही बंडखोर मानायला तयार नाही. जोपर्यंत ते मुंबईत येत नाहीत तोपर्यंत आम्ही आशावादी आहोत. काल न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्यात पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. – संजय राऊत
गुवाहाटीच्या डोंगरात आमदार बसले आहेत. नदी, डोंगर, पाणी.. त्यांना ११ जुलैपर्यंत आराम करण्याचे निर्देश आहेत. महाराष्ट्रात त्यांचं काही काम नाही. पण ११ तारखेनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. – संजय राऊत
सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर या बैठकीमध्ये बंडखोर आमदार परत आल्यास त्यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांना तयार राहण्यासंदर्भातील निर्देश दिला जाण्यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं सूचक ट्वीट
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022
Eknath Shinde Live Updates Today : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथींचे सर्व अपडेट्स