भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहेत. मात्र आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील प्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचे औक्षण केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या गटातील एकूण ९ आमदारांनी पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचं स्वागत केलं होतं.
आणखी वाचा : “सर्वात जास्त अपमान अन्…”, अजित पवारांचा उल्लेख करत धनंजय मुंडेचं भावनिक भाषण

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (१६ जुलै) पंकजा मुंडे यांच्या वरळीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याचा एक व्हिडीओ नुकताच धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचं औक्षण करत आहेत. यावेळी त्या चांदीच्या ताटात दिवा ठेवून भावाची ओवाळणी करत आहेत. यानंतर त्यांनी एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड केलं. यावेळी त्या दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. यावेळी ते दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

“राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे”, असे कॅप्शन धनंजय मुंडेंनी यावेळी दिले आहे.

आणखी वाचा : बीडमध्ये तुम्ही आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “हो, आम्ही…”

दरम्यान यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे, तोंडसुख घेणारे भाऊ-बहिण एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या धनंजय मुंडे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतानाही दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis pankaja munde congratulate and welcome brother dhananjay munde reunite watch video nrp
Show comments