शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेबरोबर असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी गुवाहाटीमध्ये जाऊन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. कृषीमंत्री दादा भुसे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी पाच आमदार शिंदे गटात गेले. यादरम्यान भास्कर जाधव कुठे आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र भास्कर जाधव हे चिपळूणमध्येच असून त्यांनी न्यूज १८ शी बोलताना यासंबंधी माहिती दिली.
भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नॉट रिचेबल नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आपण चिपळूणमध्येच आहोत असं सांगितलं. अफवा पसरवल्या जात असून काहीही सांगितलं जात आहे असं सांगत भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.
भास्कर जाधव यांच्या भावावर शस्त्रक्रिया झाली असून त्यामुळ ते गावी आहेत. भास्कर जाधव यांनी वरिष्ठ नेत्यांना आपण गावी असणार आहोत याबद्दल कल्पनाही दिली होती अशी माहिती आहे.
राज्यात सध्या नेमकी काय स्थिती?
महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पवार यांच्या विधानामुळे आता सत्तेचा लढा विधानसभेतच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आघाडीचे नेते संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे सूचित झालं आहे.
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, “अशाप्रकारे निलंबन करण्याचा अधिकारच नाही. आमच्याकडे बहुमत असताना अशी कारवाई होऊ शकत नाही. बैठकीला हजेरी लावली नाही म्हणून अपात्र ठरवणं हे तर देशातील पहिलं उदाहरण ठरेल. जो अधिकारच नाही तो बजावता येणार नाही. या देशात कायदा, राज्यघटना आहे त्याप्रमाणेच चालावं लागेल. वाटेल तसं वागता येणार नाही”.