Maharashtra New Updates Today, 04 July 2023 : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आमदार-खासदारांशी संपर्क होत आहे. शिवाय आपले दावे कसे खरे हे सांगण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. असं असलं तरी स्वतः शरद पवार यांनी मात्र मैदानात उतरत लोकांमध्ये जाणे पसंत केलं आहे. यानंतर अजित पवार गटात मानले जाणारे अनेक आमदार-खासदार सतर्क होऊन आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणासह प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींच्या अपटेट्स एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Mumbai Maharashtra Updates : राष्ट्रवादीमधील बंडखोरीसह महाराष्ट्रातील राजकारणासह प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींच्या अपटेट्स एका क्लिकवर…

12:43 (IST) 4 Jul 2023
धुळे: कंटेनर थेट हाॅटेलमध्ये; शिरपूर तालुक्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू

धुळे: जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर (ता.शिरपूर) शिवारात मंगळवारी सकाळी भरधाव कंटेनर महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये शिरुन उलटला.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 4 Jul 2023
नाशिक: १३ लाखांचे डाळिंब लंपास

नाशिक: गुवाहाटी येथे व्यापाऱ्याने पाठविलेली साडेतेरा लाखांची डाळिंबे वाहनचालक आणि सहायकाने परस्पर लंपास केल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 4 Jul 2023
शरद पवार वाय. बी. सेंटरमध्ये दाखल, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

शरद पवार वाय. बी. सेंटरमध्ये दाखल, राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत चर्चा करणार

12:25 (IST) 4 Jul 2023
अजित पवार मंत्रालयात दाखल, मंत्रीमंडळ बैठकीला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात दाखल, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन, मंत्रीमंडळ बैठकीला सुरुवात

12:21 (IST) 4 Jul 2023
मुंबई: आज आणि उद्या समुद्राला मोठी भरती, पावणेपाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी दुपारी १२.४९ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर ४.७२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

सविस्तर वाचा

12:07 (IST) 4 Jul 2023
अवैध वाहतूक करणाऱ्या ७४ बसवर RTOची कारवाई

नवी मुंबई: खासगी बसेस मधून होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओकडून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 4 Jul 2023
चंद्रपूर: मित्रांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलीस शिपाई निलंबित

चंद्रपूर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसी धाक दाखवून विनयभंग करणाऱ्या पोलिस शिपाई व चार मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस शिपाई बावणे याला निलंबित केले आहे.

सविस्तर वाचा

11:58 (IST) 4 Jul 2023
मुंबईसह ठाण्यात पुढील तीन-चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : गेले दोन दिवस पावसाने काही भागात विश्रांती घेतली, तर काही भागात रिमझिम सरी कोसळत होत्या. मात्र मंगळवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून पुढील तीन – चार तास मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सविस्तर वाचा

11:53 (IST) 4 Jul 2023
“मागच्या वर्षी ५१ आमदारांनी शरद पवारांना भाजपाबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण…”, प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण, शरद पवार वेळेवर निर्णय घेण्यास अयशस्वी ठरले, असा गौप्यस्फोट खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली आहे.

वाचा सविस्तर…

11:50 (IST) 4 Jul 2023
प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला? उज्ज्वल निकम म्हणाले…

सोमवारी ( ३ जुलै ) जयंत पाटील यांची हकालपट्टी करत सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील, अशी घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. पक्षाच्या प्रतोदपदी अनिल पाटील हेच असतील, असेही पटेल यांनी सांगितलं. तर, राष्ट्रवादीकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. पण, प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोद नेमण्याचा अधिकार कोणाला आहे? यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.

वाचा सविस्तर…

11:30 (IST) 4 Jul 2023
Citylink बससेवेत अपंगांना मोफत प्रवास कार्डला मुदतवाढ

नाशिक: महानगर पालिका हद्दीत राहणाऱ्या अपंग प्रवाश्यांना मोफत प्रवास करता यावा यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) वतीने मोफत कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 4 Jul 2023
नागपूर: शोकाकुल वातावरणात ‘त्या’ तरुणांवर अंत्यसंस्कार; डॉ. प्राजक्तमवर रुग्णालयात उपचार सुरु

नागपूर: मोहगाव झिल्पी तलावावर पार्टी करायला गेलेल्या सहा तरुणांपैकी पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 4 Jul 2023
नोकरभरतीतील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी ‘हे’ करा; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची काय आहे मागणी

नागपूर: राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 4 Jul 2023
सातारा: उदयनराजें कडून देवेंद्र फडणवीस यांना तलवार आणि वाघनखांची भेट

वाई: खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर खा.उदयनराजेंकडून देवेंद्र फडणवीस यांना तलवार आणि वाघनखं भेट दिली.यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन,प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा

11:17 (IST) 4 Jul 2023
समृद्धीवरील ‘त्या’ विचित्र अपघातातील मुलाचा मृत्यू, वडील अत्यवस्थ

नागपूर : समृद्धी महामार्गाच्या नागपुरातील प्रवेशद्वारावर एका कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिली होती. त्यामुळे ट्रॅक्टर आणि चौकातील ग्रिलमध्ये चेपून बाप-लेक असे दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी मुलाचा सोमवारी मृत्यू झाला असून वडील अत्यवस्थ आहे.

सविस्तर वाचा

11:16 (IST) 4 Jul 2023
पिंपरी-चिंचवडमधील ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी अजित पवारांबरोबर

पिंपरी : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार यांची पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलकदेखील शहरात झळकले आहेत.

सविस्तर वाचा

11:15 (IST) 4 Jul 2023
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चौधरींची खुर्ची धोक्यात! विनानिविदा कामे दिल्याचा अहवाल

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठातील काही विकास कामे निविदा कार्यवाही न करता केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याचा अहवाल अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा

11:15 (IST) 4 Jul 2023
मुंबई: मेट्रो स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र उपलब्ध

मुंबई : महिला प्रवाशांचे आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) आता मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो २ अ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकावरील स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

11:13 (IST) 4 Jul 2023
गुन्हेगारांच्या टोळ्या संपवून शहर अंमली पदार्थमुक्त करणार! गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांचा संकल्प

नागपूर : सध्याची युवा पिढी ड्रग्स, गांजा आणि हुक्क्यासारख्या अंमली पदार्थांच्या नशेसाठी आपले आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. हा व्यसनाचा भस्मासूर आता तर शाळकरी मुला-मुलींपर्यंतही पोहचू पाहत आहे. हे चित्र बदलण्यासाठी या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या संपवून शहर अंमली पदार्थमुक्त करू, असा संकल्प गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आयपीएस मुमक्का सुदर्शन यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 4 Jul 2023
आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ?

अजित पवार व सुनील तटकरे यांचे घनिष्ठ संबंध वगळता प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील वा हसन मुश्रीफ या पहिल्या फळीतील नेत्यांचे अजितदादांशी कधीच फारसे सख्य नव्हते. पण भाजपबरोबर घरोबा करण्याकरिता या साऱ्या नेत्यांनी अजित पवारांशी जुळवून घेतले.

वाचा सविस्तर…

11:02 (IST) 4 Jul 2023
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात स्पष्टच म्हणाले, “ज्याची संख्या…”

ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता होईल. काँग्रेसची संख्या अधिक असेल, तर आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ. काँग्रेस विधीमंडळाची बैठक आहे. आमचे प्रभारी येत आहेत. दिल्लीतील आमच्या वरिष्ठ नेत्यांशीही आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ.

– बाळासाहेब थोरात (विधीमंडळ नेते, काँग्रेस)

10:46 (IST) 4 Jul 2023
“मागच्या वर्षी ५१ आमदारांनी शरद पवारांना भाजपाबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण…”, प्रफुल पटेल यांचा मोठा दावा

मागील वर्षी महाविकासआघाडी सरकार कोसळण्याच्या टप्प्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी भाजपाबरोबर जावं अशी इच्छा शरद पवारांकडे व्यक्त केली. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीचं नेतृत्व निर्णय घ्यायला अपयशी ठरलं आणि एकनाथ शिंदेंनी संधीचा फायदा घेत देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं.

– प्रफुल पटेल (एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा)

10:38 (IST) 4 Jul 2023
विश्लेषण : भाजपची ‘फोडा आणि राज्य करा’ रणनीती आतापर्यंत कुठे यशस्वी?

भाजप विरोधी पक्षांची सरकारे पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कराड येथे केला. रविवारीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात फूट पडली. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे राज्यात उपमुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर देशभरातील विरोधकांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना कमकुवत करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच भाजपचे बिहारमधील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनीही त्यांच्या राज्यात महाराष्ट्रासारखी स्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. पाटण्यात जून महिन्यात विरोधकांची बैठक झाली. आता त्याच राज्यात विरोधकांमध्ये फूट पडणार काय, याची चर्चा सुरू आहे.

सविस्तर वाचा…

10:37 (IST) 4 Jul 2023
मोठी बातमी! अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेत खासदारकीचा राजीनामा देणार, कारण सांगत म्हणाले…

अजित पवार यांनी राष्ट्रवातीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह ९ मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले. मात्र, सोमवारी (३ जुलै) अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं. आता त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचं जाहीर केलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा…

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)