Mumbai Maharashtra News Today, 12 July 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून हा पक्ष देशभर चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘कलंक’ म्हटलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भाजपा नेते यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. तर भाजपा कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आज दिवसभरात या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया येतील. यासह मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांमध्ये होणारं खातेवाटप, आमदारांमधील नाराजी यासंबंधीच्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.
Mumbai Maharashtra Live News Updates
अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील आनंद नगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील दशमेश फोम कंपनीला बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली.
अकोला: हैदराबाद येथे नोकरी लावून देण्याच्या नावावर नेऊन १८ वर्षीय मुलाचे धर्मपरिवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्याच्या चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत आलेगाव येथे उघडकीस आला.
मुंबईः मालकाला मुलगा झाल्यामुळे मोफत धान्य वाटण्यात येत असल्याचे सांगून बोलबच्चन टोळीने आमदाराच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या अंगावरील दागिने पळवल्याची घटना दादर परिसरात घडली.
सांगली: दोन मुलीसह पत्नी गायब होण्याला जबाबदार असल्याच्या संशयावरून जावयाने सासूवर ब्लेडने हल्ला करून जखमी करण्याची घटना शिराळा येथे घडली.
मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी किमान १५ झोपड्या असणे आवश्यक असतानाही विलेपार्ले येथील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर झोपु योजना लादून हा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ठाणे: शहरातील अपगांना महापालिकेकडून वाटप करण्यात येणाऱ्या चहा स्टाॅल वाटप योजनेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.
मुंबई: पावसाळ्यात रेल्वेतून प्रवास करताना बाहेरचे पाणी पिताना प्रवाशांच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. बाटलीबंद पाण्याने तहान भागविणे काही प्रवाशांना परवडत नाही.
डोंबिवली – डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कंपनी चालक आणि निवासी विभागातील रहिवाशांना महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने मागील सहा वर्षांच्या काळात दिलेल्या सेवासुविधांवरील १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्याजासह भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. अचानक आलेल्या या नोटिसांमुळे उद्योजक, रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे पाणी साचणाऱ्या सखल भागांचा अभ्यास करून आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांना फारसे यश मिळत नसतानाच, ठाणे महापालिकेने या भागांचा आता पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासादरम्यान प्रथमदर्शनी आढळून आलेल्या बाबींच्या आधारे पालिकेकडून काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे काही प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकेल, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.
अजित पवारांना अर्थमंत्रिपद देण्याला शिवसेनेच्या शिंदे गटाचा विरोध असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात सध्या विदर्भात शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता सामंत म्हणाले, “अर्थखातं कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाहीत. एकनाथ शिंदेंवर शिवसेनेच्या सर्व आमदारांचा पूर्ण विश्वास आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री आहे.
जळगाव: भडगाव येथील वडधे गावानजीकच्या गिरणा नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करीत चोरटी वाहतूक करीत असताना चार ट्रॅक्टर, दोन जेसीबी आणि डंपर असा सुमारे ६३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्यातील प्रदेश काँग्रेसच्या तीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसमोर गाऱ्हाणे मांडण्याची संधी मिळाली असल्याने दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयातील बैठक पाच तास सुरू होती. बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लक्ष्य ठरले खरे पण, खरगेंनी शिताफीने परिस्थिती हाताळली आणि झाले ते पुरे झाले, एकजुटीने कामाला लागा, असा इशारा दिला.
उरण : केंद्रीय बंदर मंत्रालयाने नेमलेल्या बक्षी वेतन समितीच्या शिफारशी या कामगारांवर अन्याय करणाऱ्या असल्याने त्या विरोधात जेएनपीए बंदरातील कामगारांनी प्रशासन भवनासमोर निदर्शने केली. भारतीय मजदूर महासंघातर्फे बंदर कामगारांच्या अखिल भारतीय वेतन करारासाठी नेमण्यात आलेल्या बक्षी समितीच्या अहवालाविरोधात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी भारतीय मजदूर महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, जेएनपीएचे कामगार विश्वस्त रविंद्र पाटील तसेच कामगार उपस्थित होते.
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे राज्य सरकारकडून विविध पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मागणीपत्र आल्यानंतरही अनेक पदांसाठी अद्यापही जाहिरात न आल्याची विद्यार्थ्यांची ओरड आहे. राज्य सरकारकडून एप्रिल महिन्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी मागणीपत्र देण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनही सहाय्यक प्राध्यापक भरतीची जाहिरात आलेली नाही.
शिवसेनेतील शिंदे गटाने मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप करत बंडखोरी केली. मात्र, आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचं वाटप करावं लागत आहे. अशातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांना मिळणारं मंत्रीपद आणि आमदारांची नाराजी यावर प्रतिक्रिया दिली.
नाशिकमधील वणी येथे सप्तश्रृंगी घाटात ३५ प्रवासी असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटातून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही त्यांचा खातेवाटप झालेला नाही. याशिवाय आधीच मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले शिंदे गट आणि भाजपातील आमदारही नाराज असल्याची चर्चा होत आहे. अशातच सत्ताधारी पक्षाचे बहुतांश आमदार मुंबईत आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व आमदार मुंबईले गेले असताना अपक्ष आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू नागपूरमध्ये आहेत. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पुणे: पुणे स्टेशन परिसरात उभ्या केलेल्या रिक्षावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस शिपायाला रिक्षाचालकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली.
अमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून चांदूर बाजार आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ६८.९ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर आणि ६१.२ मिमी पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झाला आहे.
नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.
वर्धा: इतिहासातील पाने चाळताना काही बाबी आजही प्रासंगिक वाटतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाते एका घटनेने जुळले होते.
दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमिर खान या जोडगोळीने केलेल्या ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ या दोन्ही चित्रपटांनी अमाप यश मिळवले. आता जवळपास दशकभराने पुन्हा ही जोडी एका नव्या चरित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.
नाशिक: बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात पडणाऱ्या पावसामुळे धरणात जलसाठा होतो आणि तालुक्यासह इतर भागातील जनतेची तहान भागते. परंतु, ज्या आदिवासी बांधवांच्या भागात पाऊस कोसळतो, तिथे मात्र नंतर वर्षभर टंचाईला तोंड द्यावे लागते. डोंगरदऱ्यात शाश्वत जलस्रोत नाही. रस्त्याअभावी शासकीय टँकरचा पाणी पुरवठाही अशक्य ठरतो.
नाशिक: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सामील झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार, याबद्दल चर्चा होत असली तरी पालकमंत्री कोण असणार हे निश्चित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर: छत्तीसगडच्या इंद्रावती टायगर रिझर्व येथे वनपथकाने जप्त केलेल्या वाघाचे चामड्याचे कनेक्शन चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश झाल्यानंतर रायगडमधील राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात संघर्षांची पहिली ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यास जिल्ह्यातून विरोध होत आहे. जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या सर्व आमदारांनी आदिती यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शवला असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं होतं. आज पुन्हा एकदा गोगावले यांनी त्यांचं मत मांडलं. भरत गोगावले यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी गोगावले यांनी सांगितलं की, रायगडचा पालकमंत्री हा भरतशेटच, अशी मागणी रायगडच्या सर्व आमदारांची आहे. ही मागणी शेवटपर्यंत राहील.
अमरावती : वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात राहणाऱ्या जैबुन्निसाची प्रकृती बिघडली. तिला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रक्ताची नितांत आवश्यकता असल्याने तिला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
संजय राऊत म्हणाले, जे लोक तिकडे (महायुतीत) गेलेत ते केवळ दोन गोष्टींसाठी गेले आहेत. पहिलं म्हणजे त्यांच्यावर जे आरोप होते, पुरावे होते, ईडी सीबीआयचा तपास सुरू होता ती प्रकरणं दाबण्यासाठी आणि दुसरं म्हणजे बंगले आणि सुरक्षा मिळावी यासाठी ते लोक तिकडे गेले आहेत. या दोन गोष्टींसाठी हे लोक तिकडे गेलेत.
अकोला: शहरातील रणजीत इंगळे हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दिल्ली येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
चंद्रपूर : राज्य शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे डी.एड, बी.एड धारक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची थट्टा केली जात आहे.
“…हा कलंकच, याला मर्दानगी म्हणता येत नाही”, ठाकरे गटाची देवेंद्र फडणवीसांवर टीका
शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा 'कलंक' या उल्लेखाचं समर्थन केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, “सत्य असे की, महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणायचे काम फडणवीसांनी केले. त्यांचे मास्टर स्ट्रोक म्हणजे काय? हाताशी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून हे मास्टर स्ट्रोक. ज्या दिवशी दिल्लीची सत्ता जाईल त्याक्षणी या मास्टर स्ट्रोकचे काय होईल? यंत्रणांची दहशत माजवून चाणक्यगिरी चालली आहे. याला मर्दानगी म्हणता येत नाही. हा कलंकच आहे. फडणवीस म्हणतात, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?’ देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिंधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच. कुणाकुणाची नावे घ्यायची? आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा, भुजबळ – हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर या आजारावर एखादा उपचार करूनच घ्या. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा असे एकंदरीत तुमचे धोरण दिसते”, असा हल्लाबोलही करण्यात आला.