Mumbai Maharashtra News Today, 14 July 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला काल (१३ जुलै) पासून सुरुवात झाली. त्यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यापासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली. काल ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यातही ठाकरेंवर जोरदार प्रहार केले. उद्धव ठाकरेंनी घेतलेली पोहरादेवीची शपथ खोटी असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतोय. यावरून संजय राऊतांनीही टीका केली आहे. दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. खातेवाटपाचंही घोंगडं भिजत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसंच, दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. पावसासंदर्भातील ताजे अपडेट्स जाणून घ्या.

Live Updates

Mumbai Live News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

20:34 (IST) 14 Jul 2023
आमदाराने फैलावर घेतल्याने अधिकाऱ्याला भोवळ; जिल्हा नियोजन समिती बैठकीत राष्ट्रवादीचा कुरघोडीचा प्रयत्न

नाशिक: १२ कोटींचा नियतव्यय मंजूर असताना नांदगाव मतदारसंघातील एकाही गावासाठी निधी न दिल्याच्या कारणावरून आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांना जबाबदार धरत फैलावर घेतले.

सविस्तर वाचा...

20:22 (IST) 14 Jul 2023
बुलढाणा : सामूहिक अत्याचारप्रकरणी पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही! लेखी जवाब चक्रावून टाकणारा…

बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. महिलेसोबत असलेल्या इसमाकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर हे घृणास्पद कृत्य केले. पीडित महिले सोबत असलेल्या इसमाने याबाबत  बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे.

सविस्तर वाचा

20:22 (IST) 14 Jul 2023
“ज्यांना घर सांभाळता येत नाही त्यांनी…”, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेले असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी यातून बाहेर पडावे. ज्याला घर सांभाळता येत नाही ते कधीच मोठे होऊ शकत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वाचा

20:21 (IST) 14 Jul 2023
संजय राठोड यांचे अन्न व औषध प्रशासन खाते काढून महत्व कमी केले, समर्थक नाराज

दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना झाल्यानंतर धोक्यात आलेले संजय राठोड यांचे मंत्रिपद नंतरच्या घडामोडीत कायम राहिले. मात्र, त्यांच्याकडील महत्वाचे अन्न व औषध प्रशासन खाते काढण्यात येऊन त्यांना मृद व जलसंधारण खाते देण्यात आले.

सविस्तर वाचा

20:10 (IST) 14 Jul 2023
बुलढाणा: आठ नराधमांचा महिलेवर सामूहिक बलात्कार; आरोपींची ओळख पटली

बुलढाणा: मलकापूर मार्गावरील राजूर घाटातील सामूहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेतील आठ आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी तीन पथके गठित रवाना करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

19:37 (IST) 14 Jul 2023
कल्याणमधील औषध विक्रेता महिलेची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक

कल्याण: येथील पूर्व भागातील काटेमानिवली भागात राहत असलेल्या एका औषध विक्रेता महिलेची भामट्यांनी वस्तु घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ऑनलाईन माध्यमातून दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा...

19:34 (IST) 14 Jul 2023
अजित पवारांना अर्थ खाते मिळताच जिल्ह्यातील शरद पवार समर्थकांचा ‘यू टर्न’; चार जणांची ‘घरवापसी’

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील सर्वच बड्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. तर दोनच दिवसांआधी राष्ट्रवादीच्या काही आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना भेटून ते शरद पवारांचे समर्थक असल्याचे स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

19:19 (IST) 14 Jul 2023
छगन भुजबळांना धमकी प्रकरणात आरोपीची अटक बेकायदा; जामिनावर मुक्तता

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 14 Jul 2023
नागपूर : कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘सुरज’ही मावळला; आणखी एका चित्त्याचा मृत्यू

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी ‘सुरज’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. आतापर्यंत आठ चित्ते मृत्युमुखी पडले आहेत. भारतात एकीकडे ‘चांद्रयान ३’ मोहिमेचे यश साजरे केले जात असताना चित्ता प्रकल्पाचे अपयश मात्र ठळकपणे समोर येत आहे.

सविस्तर वाचा

18:44 (IST) 14 Jul 2023
विक्रोळीत संरक्षक भिंत खचल्यामुळे चार घरे कोसळली

मुंबई: विक्रोळीमधील पार्कसाईट परिसरात शुक्रवारी सकाळी संरक्षक भिंत खचल्याने चार घरे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

सविस्तर वाचा...

18:44 (IST) 14 Jul 2023
नागपूर : कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘सुरज’ही मावळला; आणखी एका चित्त्याचा मृत्यू

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी ‘सुरज’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. आतापर्यंत आठ चित्ते मृत्युमुखी पडले आहेत. भारतात एकीकडे ‘चांद्रयान ३’ मोहिमेचे यश साजरे केले जात असताना चित्ता प्रकल्पाचे अपयश मात्र ठळकपणे समोर येत आहे.

सविस्तर वाचा

18:30 (IST) 14 Jul 2023
सतेज पाटील सोबत आले तरच मित्र – हसन मुश्रीफ

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये सतेज पाटील सोबत आले तरच मैत्री राहील.

सविस्तर वाचा...

18:14 (IST) 14 Jul 2023
शासन आपल्या दारीसाठी दाखले प्रलंबित; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा आरोप

बेकायदेशीर पद्धतीने महाराष्ट्रावर लादले गेलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने जनतेच्या पैशांचा बेदरकारपणे चुराडा करण्याचा सपाटा लावला आहे. शासन आपल्या दारीमुळे दाखले प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. हा कार्यक्रम सरकारने ताबडतोब बंद करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

18:11 (IST) 14 Jul 2023
“समान नागरी कायदा सर्वांसाठी महत्वाचा कारण…”, नीलम गोऱ्हे यांचे मत

समान नागरी कायदा सर्व धर्मातील स्त्री-पुरूषांसाठी दत्तक विधान, मालमत्ता, विवाह यादृष्टीने महत्वाचा आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या उपनेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते, त्यानुसारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करीत असल्याने शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

17:57 (IST) 14 Jul 2023
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे किती खाती?

राज्यात खातेवाटप झाले असले तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडे अनेक खाती आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय,पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केले विभाग असणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत.

17:52 (IST) 14 Jul 2023
बुलढाणा : सिंदखेडराजातील कार्यकर्ते आमदार शिंगणेंसोबतच! जिल्हाध्यक्ष काझीही मैत्री जपणार

बुलढाणा : आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांच्या सोबत जाण्याच्या निर्णयाचे सिंदखेड राजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन केले आहे. तसेच आम्ही आमदार शिंगणेसोबतच असल्याचे जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा...

17:49 (IST) 14 Jul 2023
कोल्हापूर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी; १० हजार रुपये दंडाची शिक्षा

कोल्हापूर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी न्यायालयाने सुनावली.

सविस्तर वाचा...

17:38 (IST) 14 Jul 2023
चिंचोटी धबधब्याखाली बुडून तिघांचा मृत्यू, २४ तासात दोन दुर्घटना

नायगाव येथील चिंचोटी धबधब्या जवळील नदीत बुडून मागील २४ तासात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर शुक्रवारी दोन तरुणांचा मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात वसईत झालेला हा ८ वा बळी आहे.

सविस्तर वाचा

17:32 (IST) 14 Jul 2023
समृद्धीवर ‘स्मार्ट-सिटी’ निर्मितीच्या हालचाली! प्रशासकाची नियुक्ती

बुलढाणा: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातानंतर सुरक्षिततेच्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळासह संबधित यंत्रणा खडबडून जागा झाल्या आहे.

सविस्तर वाचा...

17:24 (IST) 14 Jul 2023
अमरावतीमध्ये काँग्रेसच्या पवित्र्याने ठाकरे गटासमोर पेच

राजकारणात अनेक मातब्‍बर चेहरे देणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही पेचप्रसंग निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या अमरावती दौऱ्यादरम्‍यान काँग्रेसनेही या मतदार संघावर दावा ठोकला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे अनंत गुढे हे तीन तर आनंदराव अडसूळ हे दोन वेळा खासदार होते.

सविस्तर वाचा

17:18 (IST) 14 Jul 2023
हॉटेलसमोर लघुशंका करण्यास मनाई केल्याने एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं, थरारक घटनेचा सीसीटीव्ही VIDEO

नवी मुंबईतील तुर्भे येथे एका हॉटेल बार समोर ग्राहक म्हणून आलेल्या टोळक्यातील एकाने हॉटेल बाहेर लघु शंका करत असल्याचे पाहताच व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला जाब विचारत अडवले. त्यावर त्यालाच मारहाण करीत त्याच्या अंगावर गाडी घातली.

सविस्तर वाचा

17:12 (IST) 14 Jul 2023
टोमॅटो लागवड, दराविषयीचा अहवाल मागवला; वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार

राज्यात टोमॅटोचे भाव अचानक वाढल्याने  वस्‍तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्‍याचा निर्णय कृषी आयुक्‍तालयाने घेतला असून  हा अहवाल प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबतची वस्तुस्थिती लवकरच स्पष्ट होणार आहे. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

सविस्तर वाचा

17:11 (IST) 14 Jul 2023
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अजित पवारांच्या अडचणी वाढणार – उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांचे मत

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडावर उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी मत व्यक्त केले. अजित पवार यांच्यासमोर कोणत्या अडचणी येऊ शकतात यावर त्यांनी चर्चा केली.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 14 Jul 2023
घुबडाला इतर पक्षी हाकलून का लावतात? जाणून घ्या…

नागपूर: ‘ते’ लक्ष्मीचे वाहन.. उत्कृष्ट जैविक नियंत्रक म्हणून त्याची ख्याती.. तो शिकारी गटातील पक्षी.. तरीही घुबडाला इतर पक्षी विरोध करतात.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 14 Jul 2023
‘एचटीबीटी’वरून शेतकरी, सरकारी यंत्रणा पुन्‍हा आमने-सामने! शेतकरी संघटेनचा सविनय कायदेभंग

अमरावती: देशात प्रतिबंधित असलेल्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्याची लागवड छुप्या मार्गाने दरवर्षी वाढत असतानाच शेतकरी व शासकीय यंत्रणांमध्‍ये संघर्ष होण्‍याची चिन्‍हे आहेत.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 14 Jul 2023
‘किया’ मोटर्सची डिलरशिप देण्याच्या नावाखाली आठ लाखांचा गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

अनंतपूर येथील ‘किया’ मोटर्स इंडिया लिमिटेडची डीलरशिप देण्याचा बनाव करून व्यापार्‍याला आठ लाख ३६ हजार रुपयाने गंडा घालण्यात आला.  याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. संदीप प्रेमचंद छाजेड ४८, रा. धामणगाव रोड, यवतमाळ), असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 14 Jul 2023
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचे काय झाले? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी युती करणार नाही असे वक्तव्य केले होते. मात्र राष्ट्रवादीचा एक गट आता त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 14 Jul 2023
भंडारा : भोलानाथ पावला! शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळाली…

भंडारा : ‘सांग.. सांग.. भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…?’ हे गीत बालकांच्या मुखातून पावसाळ्यात ऐकायला मिळायचे. बालकांचे म्हणणे देवाने ऐकले व खरोखरच पाऊस येवून शाळेभोवती तळे साचले आणि शाळेला सुट्टी मिळाल्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील विरली / बु. गावात १२ जुलै रोजी पहावयास मिळाला.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 14 Jul 2023
कडोंमपाची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

नागरीकांच्या सोयीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेने मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमधील सर्व नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना मालत्ता कर, पाणी देयक भरणा करता यावा या उद्देशाने प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 14 Jul 2023
कोणाला कोणतं खातं मिळालं?

अजित पवार - वित्त आणि नियोजन

छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

दिलीप वळसे पाटील - सहकार खातं

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य

अतुल सावे - गृहनिर्माण मंत्री,

संजय राठोड -मृद आणि जलसंधारण

अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विकास

धनंजय मुंडे - कृषीमंत्री

आदिती तटकरे- महिला आणि बालविकास मंत्री

अनिल पाटील - मदत आणि पुनर्वसन

https://twitter.com/ANI/status/1679806371615891456?s=20

Maharashtra Live Blog

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Live News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर