Mumbai Maharashtra News Today, 14 July 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला काल (१३ जुलै) पासून सुरुवात झाली. त्यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यापासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली. काल ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यातही ठाकरेंवर जोरदार प्रहार केले. उद्धव ठाकरेंनी घेतलेली पोहरादेवीची शपथ खोटी असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतोय. यावरून संजय राऊतांनीही टीका केली आहे. दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. खातेवाटपाचंही घोंगडं भिजत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसंच, दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. पावसासंदर्भातील ताजे अपडेट्स जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Live News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात बबली वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी पर्यटकांना वेड लावले आहे. या दोन बछड्यांच्या ‘मस्ती की पाठशाळा ‘चे छायाचित्र पर्यटकांनी टिपले आहे. यामध्ये दोघेही धमाल मस्ती करताना दिसल आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून पाचवीच्या २२.३१ तर आठवीचा १५.६० टक्के लागला आहे. निकालात कोल्हापूर जिल्हा प्रथम तर गडचिरोली जिल्हा सर्वात शेवटी आहे.
सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला विरोध केला जात असून जिल्हा परिषद शाळेत बेरोजगार डीएड, बीएड युवकांना नियुक्त करावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने शिक्षक मंत्री यांच्याकडे केली आहे.
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अकराशेहून अधिक पदांचा निकाल आहे. कौशल्य चाचणी आणि इतर परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.
विविध नामांकित कंपन्यांच्या तसेच डेअरीच्या पिशव्यांमधील दुधात भेसळ करुन तसेच बनावट कंपनीच्या नावाचा वापर करून अवैधरित्या भेसळयुक्त व रसायनयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी यंत्रणांनी संयुक्त कारवाई करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी केल्या आहेत.
अलिबाग – खड्ड्यात गेलेल्या मुंबई गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पहाणी करण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल तर डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात काम करता यावे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप सत्तेसाठी हपापलेली दिसतेय. राज्यात फोडाफोडीचेच राजकारण चालले आहे. राज्यातील राजकारणाची सद्यःस्थिती घाणेरडी आणि किळसवाणा प्रकार आहे. महाराष्ट्रानं असं राजकारण पाहिलंच नव्हतं. सद्यःस्थितीतील या घाणेरड्या राजकारणाची महाराष्ट्राला किळस आली आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्या नावाचे खोटे पत्र आणि खोटा आदेश दाखवून फसवणूक केली. तांबे यांनी ॲड. चैतन्य भंडारी यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतली. भंडारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. प्रविण सागडे यांनी तांबे यांच्या बाजूने निकाल देत ओसवालविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे शहर पोलीस ठाण्याला दिले.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भातशेतीचा हंगाम सुरू झाला आहे. भात रोपे उखळणी, लागवडीसाठीची दिवसाची मजुरांची मजुरी ४०० रुपये आहे. या मजुरी बरोबर दोन वेळचे भोजन आणि संध्याकाळी घरी जाताना मजुराला श्रमपरिहारासाठी आणखी बिदागी द्यावी लागते. मजूर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करतो.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला साथ देणाऱ्या ५० पैकी एकाही आमदाराचा पराभव होऊ देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असला तरी काही आमदारांचे ‘उद्योग’ तसेच मतदारसंघातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्या समोर असेल.
नागपूर : शेतीच्या हिश्शे वाटणीवरून कुटुंबात होणारे वाद, त्याला लागणारे हिंसक वळण, न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे यावर तोडगा म्हणून परस्पर सामंजस्याने ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल खात्याने सूरू केलेली ‘सलोखा’ योजना गावपातळीवर सकारात्मक परिणाम घडवून आणताना दिसते.
डोंबिवली येथील पश्चिम भागातील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालया समोर एका दुकानात गस्तीवर असलेल्या एका ६० वर्षाच्या ज्येष्ठ रखवालदाराला याच भागातील एका दारुड्याने डोक्यात, अंगावर दगडी फेकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत रखवालदार गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम काॅंक्रीटीकरणाचे काम सूरु असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पावसाळी दौरा काढून महामार्गावरील खड्यांची समस्या जाणून घेतली. शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी मंत्री चव्हाण पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आले.
मुंबई: गेल्या दोन – तीन दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र ,मुंबईत शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर धरला.मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.
भंडारा: रागाच्या भरात घरून निघून आलेली एक अल्पवयीन मुलगी भंडारा बस्थानकावर बसून होती. ती एकटी असल्याचे पाहून तिला फुस लावून मित्राच्या रूमवर नेत तिच्यावर दोन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना भंडारा शहर परिसरात घडली.
नागपूर : सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन आला आहे. यातून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ शेअर करणे, व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र अशा पोस्ट केल्याने आयुष्यभरासाठी नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते.
प्रतिस्पर्ध्यावर टीका केली नाही, तर राजकारणात टिकून राहणं जवळपास अशक्यच. पण विरोधकांचे वाभाडे काढताना अनेकदा भले भलेही पायरी सोडून खाली उतरतात. कलंक या शब्दावरून गेले काही दिवस गदारोळ सुरू असला, तरी अशा वादाची ही पहिली वेळ नाही आणि कलंक हे आजवरचं सर्वांत असभ्य विशेषणही नाही. शारीरिक व्यंगांवरून, खासगी जीवनावरून, वर्तनातील विरोधाभासांवरून किंवा कधीकधी काहीही संबंध नसतानाही अनेकांना असभ्य, अश्लील विशेषणांचा मारा सहन करावा लागला आहे.

नाशिक: सागरमाला उपक्रमांतर्गत शुष्क बंदराचा विकास करण्यासाठी निफाड येथील नियोजित जागा हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश केंद्रीय जहाज व बंदरेमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणला (जेएनपीटी) दिले आहेत.
वाशीम: परळी येथील पोलीस कोठडीत युवकाच्या मृत्यू संबंधी दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बोराळा येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता विश्वास कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अनु. जाती, जमाती, मुस्लिम समुदायातील युवकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, आळंदी येथे वारकरी संप्रदायावर लाठीचार्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सेवेमधून बडतर्फ करावे, काटा येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावी.
अकोला : यंदा मोसमी पाऊस लांबणीवर पडल्याने खरीप हंगामातील पेरणीला दिरंगाई झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन पीक नियोजन करण्यासाठी डॉ. पंजाबरावर देशमुख कृषी विद्यापीठाने कपाशी, ज्वारी आणि सोयाबीनच्या पेरणीसंदर्भात शिफारशी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कपाशी व ज्वारीचे २० टक्के जादा बियाणे वापरावे लागणार आहेत.
भंडारा: काँग्रेस सोबत हातमिळवणी करून भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील विद्यमान जि. प. उपाध्यक्ष संदीप टाले आज सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत.
पुणे : शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून नवा वाद उभा राहिला आहे. प्रभारी म्हणून काम करणारे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ब्लाॅक अध्यक्षांच्या नियुक्त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. पूर्णवेळ अध्यक्षांना ब्लाॅक अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार आहेत, प्रभारी अध्यक्षांना नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
बुलढाणा : बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. महिलेसोबत असलेल्या व्यक्तीकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर हे घृणास्पद कृत्य केले. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात तळ ठोकला.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. येत्या ३-४ दिवसांत दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे मुंबई विभाग संचालक सुनील कांबळे यांनी दिली.
#WATCH | Mumbai | If you see, for the past 3-4 days, it has been raining in all the districts. In some places, the intensity is more and in others, it is less. But in the coming 3-4 days, there is a possibility of heavy rainfall in South Konkan and North Konkan. When it comes to… pic.twitter.com/Bq5fKO2eL6
— ANI (@ANI) July 14, 2023
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १५२ हून अधिक तर महायुतीच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचे तर लोकसभेसाठी महायुतीच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक महाअभियान बैठकीत जाहीर केले आहे. भाजपच्या विधानसभेत बहुमताहून अधिक जागांचे उद्दिष्ट हे शिंदे – पवार गटासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.
पुणे: उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्वतंत्रपणे पाणी योजना राबविली जात आहे. मात्र, या दोन्ही गावांची मिळून नगर परिषद करण्याची अधिसूचना जाहीर झाली आहे.
व्यभिचारी राजकारण मी करणार नाही. मला ते जमत नाही. आणि यालाच राजकारण म्हणत असतील तर त्या राजकारणासाठी मी नालायक आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नागपूर: उपराजधानीत ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅन योग्यता तपासणीविना धावत असल्याचा प्रकार जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आला होता.
पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागात लिंगभेदाला छेद देत तृतीय पंथियांचादेखील समावेश करण्यात आला आहे. मुख्य प्रवाहात त्यांनादेखील सामावून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. एक संतसाहित्याचे अभ्यासक आणि उत्कृष्ठ किर्तनकार तृतीयपंथी राजू ऊर्फ सान्वी डोईफोडे हे सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.