Mumbai Maharashtra News Today, 14 July 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला काल (१३ जुलै) पासून सुरुवात झाली. त्यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यापासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली. काल ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यातही ठाकरेंवर जोरदार प्रहार केले. उद्धव ठाकरेंनी घेतलेली पोहरादेवीची शपथ खोटी असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतोय. यावरून संजय राऊतांनीही टीका केली आहे. दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. खातेवाटपाचंही घोंगडं भिजत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसंच, दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. पावसासंदर्भातील ताजे अपडेट्स जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Live News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
चंद्रपूर: अखिल भारतीय काँग्रेस समितीने अखेर काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती केली आहे.
चंद्रपूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय मत्स्यपालन मंत्रालयाच्या वतीने एका अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मनमाड: प्रति गोदावरी एक्स्प्रेस म्हणून धावणाऱ्या दादर-मनमाड एक्स्प्रेसला आकर्षक रंगसंगतीचे एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.
नागपूर: मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दाम्पत्याच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.
मालेगाव: नव्याने बांधकाम झालेल्या मालमत्तांसाठीच्या घरपट्टी करामध्ये मालेगाव महापालिकेतर्फे वाढ करण्यात आली आहे. घरपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या कृतीस राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.
नागपूर : महापरीक्षा संकेतस्थळावरून झालेल्या २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाला असून या पदभरतीला तीन वर्षांनी नवे वळण मिळाले आहे. यामुळे राज्यातील हजारो तलाठ्यांची नोकरी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलिबाग- अलिबाग वेश्वी येथील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. तलावातून तब्बल १.७५ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला असून, या वर्षी तलावात १७ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा होऊ शकणार आहे. त्यामुळे वेश्वी, सह आसपासच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान गाडीत बसून पावसाचा अनुभव अनेक प्रवाशांना येऊ लागला आहे. अनेक गाड्यांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. याचबरोबर गाड्यांमध्ये अस्वच्छता असून, झुरळे झाल्याच्या तक्रारीही होत आहेत. आधीच गाड्यांना होणारा विलंब दिवसेंदिवस वाढत असताना आता प्रवाशांना प्रवासातही त्रास होऊ लागला आहे.
मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार आगमन केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.
Due to water logging, Andheri Subway is closed, while traffic is diverted to Vile Parle bridge &Captain Gore Marg S.V road.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 14, 2023
पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे,वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. #MTPTrafficUpdates
पश्चिम बंगालबाबत भाजपाच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपाचा पराभव होतो, हे पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिले. भाजपाची खरी चिंता हीच आहे. लोक शहाणपणाने वागले तर हुकूमशाहीचा पराभव सहज होतो. पश्चिम बंगालात ते दिसले. ममता बॅनर्जी बंगालचे युद्ध जिंकल्या, असे शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’त म्हटलं आहे.
अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पण, अजित पवारांच्या बंडाची कुणकूण लागली होती, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतलेली पोहरादेवीची शपथ खोटी असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. परंतु, हा तर पोहरादेवीचा अपमान आहे. हे सर्व खोटारडे लोक पोहरादेवीला खोटे पाडतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.